बायबल

ज्यू धर्म आणि ख्रिश्चन मधील पवित्र पुस्तके संग्रह
Biblia (es); Biblían (is); Ikpa Mbuban (ann); Библи (os); مقدس کتاب (ps); LiBhayibheli (ss); Bibel (ksh); بائبل (ur); Bíblia (oc); Bible (gpe); Bibbia (sc); বাইবেল (as); Bible (cs); Biblija (bs); Bible (fr); Biblija (hr); Абиблиа (ab); ବାଇବେଲ (or); Bibla (frp); Библија (sr); Bibel (lb); Bibelen (nb); Ráámmát (smn); Библь (xal); Povitr Pustok (gom); Biblia (ast); Bibel (nds); Библия (ba); Bibliya (gag); Bibia (lmo); Bibla (sq); کتاب مقدس (fa); Bible (dag); Wina'am Gbauŋ (kus); 聖書 (ja); Biblia (ia); Baibûl (ha); الكتاب المقدس (arz); Bibel (na); Biblia (la); पवित्र बैबिल् (sa); Paipala (haw); ਬਾਈਬਲ (pa); Bibe (wa); Bible (en-ca); لإنجيل (ary); Біблія (be-tarask); Biblii (vep); Bibele (ts); Biblia (pag); Bibbia (lij); Biebel (stq); Bup Kudus (iba); གསུང་རབ། (bo); Bibele (nso); Bibbia (co); Teōāmoxtli (nah); Bibliya (bcl); Baibul (pcm); Bibe (pcd); Biblia (ro); Tohitapu (to); Kitaabka quduska (so); Библи (bxr); Baibel (tpi); Bébia (eml); Biblo (io); ຄຳພີໄບເບີລ (lo); 성경 (ko); Bíblian (fo); Biblio (eo); Baibel (ho); Ma'heónemôxe'êstoo'o (chy); Biblëjô (csb); Séng-gĭng (cdo); बाइबल (anp); Biblija (dsb); ביבל (yi); Biblija (hsb); Kinh Thánh (vi); Bibiliya (rn); Bhaibheri (sn); Bible (sco); Библи (mn); Sèng-keng (nan); Pipiria (ty); ಬೈಬಲ್ (kn); Biblíya (ln); 聖經 (gan); Tupã ñe'ẽngue ryru (gn); Bibulu (bm); መጽሐፍ ቅዱስ (am); İncil (diq); बाइबल (mai); Biblia (lad); 'O le Tusi Pa'ia (sm); Bibla (rm); Bibl'ye (nrm); Kitaaba (om); Biblu (guw); ព្រះគម្ពីរ (km); ܟܬܒܐ ܩܕܝܫܐ (arc); Bible (nov); Bibel (bbc); Bíbélì (yo); Bib (vo); Biibël (wo); Biblija (sl); Bibliya (tl); Biblia (pl); ബൈബിൾ (ml); bijbel (nl); Biibili (kl); Биибилийэ (sah); Biblia (gl); Αγία Γραφή (el); Biblijo (szl); Bible (en-gb); Kpa̱m A̱lyiat A̱gwaza (kcg); Biblia (sk); Біблія (uk); Injil (tk); Библиясь (mdf); Bibel (gsw); Muqaddas Kitob (uz); Таурат және Інжіл (kk); Библија (mk); Bibel (bar); ꠀꠡꠝꠣꠘꠤ ꠇꠤꠔꠣꠛꠣꠁꠘ (syl); Bíblia (ext); Biblia (cbk-zam); बाइबल (awa); IBhayibheli (zu); ᮃᮜ᮪ᮊᮤᮒᮘ᮪ (su); Ai Vola Tabu (fj); 聖經 (lzh); Ombibeli (kj); Библия (koi); သမ္မာကျမ်းစာ (my); 聖經 (yue); Библия (ky); Sṳn-kîn (hak); Baebol (bi); IBhayibhile (xh); Bibel (de-ch); Beibl (cy); Աստվածաշունչ (hy); 聖經 (zh); bibel (fy); Biblii (olo); Biwwel (pdc); Bíblia (tet); Biblia (ay); መጽሓፍ ቅዱስ (ti); ශුද්ධවූ බයිබලය (si); Syesiw (szy); बाइबिल (hi); 圣经 (wuu); Raamattu (fi); Paipera (mi); Bibia (pms); Biblija (sms); Bybel (vls); Biewel (pfl); Biblia Ayia (rup); คัมภีร์ไบเบิล (th); Kai nua Cemas (pwn); Biblija (sh); Біблія (rue); Baibolo (tum); Bibia (vec); Bibiliya (rw); Kice Manito masinahikan (atj); Biblie (fur); বাইবেল (bpy); Библия (bg); Bibbja (mt); Baibuli (lg); Biblia (kg); Ombimbeli (ng); Baiboly (mg); Bibeln (sv); Dyuspa Simin Qillqa (qu); Biebel (li); Akwụkwọ Nsọ (ig); Таврот ва Инҷил (tg); Bible (sg); Biblia (ilo); ئىنجىل (ug); 聖經 (zh-hant); বাইবেল (bn); Biblia (an); Beibel (pap); Yn Vible (gv); Swnggingh (za); Bibel (kw); ꦄꦭ꧀ꦏꦶꦠꦧ꧀ (jv); Библи (cv); ބައިބަލް (dv); Labib (gcr); Bibelen (nn); Bible (en); Alkitab (id); Bebele (st); Bibliyá (war); Библия (kv); Bībele (lv); Bybel (af); ბიბლია (xmf); Bibliya (ceb); Wɛ̈t de Nhialic (din); Bíblia (pt-br); Baibulo (ny); Biebel (zea); Bibbia (nap); Povitr Pustok (gom-latn); Încîl (ku); Alkitab (min); Bibbia (scn); Библия (av); کتێبی پیرۆز (ckb); விவிலியம் (ta); သၠပတ်သမ္မာ (mnw); Piibli (vro); Tibibelt (kab); Bèibel (srn); an Bíobla (ga); Biblia (hu); બાઇબલ (gu); ביבליה (he); Biblia (eu); Աստուածաշունչ (hyw); Вївлїꙗ (cu); کیتاب موقدس (azb); Biblia (ee); Bibel (de); Библи (ce); Біблія (be); Bíblia (ca); biebel (nds-nl); Sura Ni'amoni'ö (nia); बाइबल (ne); بائبل (pnb); Alkitab (ms); Baebele (tn); बाइबल (dty); Bible (ie); Baɓ́ò (bas); Библия (tt); Bivhili (ve); Bibl (br); Seyso(Sinsman Ke Utux Kayal) (tay); Biibbal (se); Biibel (frr); الكتاب المقدس (ar); Bíblia (mwl); బైబిల్ (te); Bibbia (it); बाइबल (new); Kitâb-ı Mukaddes (tr); Bib (ht); Piibel (et); Bibliya (az); 圣经 (zh-cn); Baibl (jam); बाइबिल (bho); Библи (mrj); बायबल (mr); Bíblia (pt); Biblioþēce (ang); Bėblėjė (sgs); Библия (ru); Biblija (lt); Biblia (lfn); Bibelen (da); ბიბლია (ka); Biblia (ki); Twere Kronkron (tw); Biblia ya Kikristo (sw); Bìoball (gd); Bibia (lld); 聖經 (zh-hk); 聖經 (zh-tw); بائبل (sd); الکتاب (ms-arab); बायबल (gom-deva); ಬೈಬಲ್ (tcy); 圣经 (zh-hans); Kitab Mugadas (bew) conjunto de libros sagrados judeocristianos que conforman el Antiguo y Nuevo Testamentos (es); masinahikan e arimotcikatek miro tipatcimowin e itatisokemakak aiamihewinik itekera (atj); canonical collection of religious texts (en-gb); kpa̱m á̱za̱za̱rak nkwaa̱mbwat mi̱ Khwiyahuda ma̱ng Khwikristi (kcg); Yahudiliğin ve Hristiyanlığın kutsal metinlerini oluşturan kitapların kanonik bir koleksiyonu (tr); Soratra Masina azo tamin'ny Tsindrimandrin'Andriamanitra (mg); собрание священных книг в иудаизме и христианстве (bxr); compilacion de tèxts sacrats del crestianisme e del judaïsme (oc); 유대교와 기독교의 신성한 책의 수집 (ko); христиан дінінің киелі делінген кітаптарының жиынтығы (kk); kolekto de sanktaj religiaj libroj kaj en judismo kaj kristanismo (eo); sbírka posvátných textů v křesťanství a judaismu (cs); sveta knjiga kršćana i Jevreja (bs); ꠗꠞ꠆ꠝꠞ ꠙꠥꠕꠤꠘ ꠀꠞ ꠛꠁꠀꠁꠘ꠆ꠔꠞ ꠡꠋꠇꠟꠘ (syl); খ্রিস্ট ধর্মগ্রন্থ (bn); ensemble de textes sacrés pour les juifs et les chrétiens (fr); zbirka svetih knjiga kršćanstva i judaizma (hr); ज्यू धर्म आणि ख्रिश्चन मधील पवित्र पुस्तके संग्रह (mr); zběrka zwjatych spisow židowstwa a křesćanstwa (hsb); bộ sưu tập các văn bản tôn giáo trong Do Thái giáo và Kitô giáo (vi); kanoniko nga urnong dagiti relihioso a testo (ilo); колекција светих књига у јудаизму и хришћанству (sr); coleção de livros canônicos do cristianismo que formam o Antigo e Novo Testamento (pt-br); Helleg Schrëft vun de Chrëschten (lb); samling med religiøse skrifter (nb); Xristianlığın Müqəddəs Kitablar toplusu (az); 猶太教、基督教經典 (lzh); collection of sacred books in Judaism and Christianity (en); مجموعة من النصوص الدينية من اليهودية والمسيحية (ar); hollad skridoù a zo sakr d'ar relijionoù yuzev ha kristen (br); ကျမ်းဂန် (my); zsidó és keresztény szent könyvek gyűjteménye (hu); kristautasunaren, judaismoaren, samaritanismoaren eta rastafarismoaren idazki sakratuak (eu); собрание священных книг в иудаизме и христианстве (ru); Sammlungen von heiligen Schriften des Judentums und des Christentums (de); përmbledhje tekstesh fetare (sq); مجموعه‌ای از نوشته‌های دینی و مقدس آیین‌های یهودی و مسیحی (fa); 猶太教和基督教經典 (zh); Pirtûka pîroz a xristiyaniyê (ku); ユダヤ教とキリスト教の聖典の宗教書集 (ja); כתבי הקודש של היהדות ושל הנצרות (he); Scriptura Sancta Christianorum (la); ईसाईयों का पान्थिक ग्रन्थ (hi); kristittyjen ja juutalaisten pyhien kirjojen kokoelma (fi); holy book of the christians (en-ca); இது யூதர் கிறிஸ்தவர்களின் புனித நூல் ஆகும். (ta); insieme dei testi sacri per la religione ebraica e cristiana (it); збор сьвятых кнігаў хрысьціянства і юдаізму (be-tarask); textos religiosos do judaísmo e do cristianismo, livro sagrado dos cristãos (pt); ชุดคัมภีร์ในศาสนายูดาห์และศาสนาคริสต์ (th); ईसाइन् (मसीहिन्) कय पवित्रतम धर्मग्रन्थ (awa); zbirka svetih spisov judovstva in krščanstva (sl); kristluse ja judaismi pühakirjade kogum (et); den kristne kirkes kanoniske bøger (da); zbierka obsahujúca knihy, ktoré kresťanstvo pokladá za sväté (sk); kitab suci agama Kristen (id); zbiór świętych ksiąg judaizmu i chrześcijaństwa (pl); يھوديت ۽ مسيحت ۾ مذھبي متنن جو مجموعو (sd); verzameling heilige geschriften van het Joden- en Christendom (nl); tallimaniutip aammiutut Kristianimutoqutt tassaaputoq (kl); samling av heliga skrifter inom judendom och kristendom (sv); збор давньых реліґійных тексту (rue); conjunt de textos sagrats del cristianisme (ca); conxunto de libros sagrados no cristianismo e no xudaísmo (gl); колекція священних книг в іудаїзмі та християнстві (uk); Η Παλαιά και η Καινή Διαθήκη (el); versameling heilige boeke in Judaïsme en Christendom (af) Sagradas Escrituras, Santa Biblia, La Biblia, Sagrada Escritura, Escrituras Sagradas, La Santa Biblia, Santas Escrituras (es); Szentírás (hu); shinˋ gin+ (hak); Bible (ms); die Heilige Schrift, Buch der Bücher (de); Bíobla, an Bíobla Naofa (ga); Սուրբ Գիրք, Կտակարան (hy); 圣经, 新舊約全書, 新旧约全书 (zh); A̱za̱za̱rak Kpa̱m A̱lyiat A̱gwaza, A̱lyiat A̱gwaza, Baibut (kcg); Kutsal Kitap (tr); کتاب مقدس, مقدس بائبل (ur); Baiboly Masina (mg); Den Heliga Skrift (sv); הביבליה, הביבלייה (he); Judaeo-기독교 성경, 기독교 경전, 성서, 거룩한 성경, 거룩한 경전 (ko); Paipera Tapu (mi); Holy Bible (en-ca); Písmo svaté, svatá písma, Biblia sancta, Biblia, Biblí (cs); Sacra Bibbia (it); Torah, Tanakh, Sainte Bible (fr); Alkitab (jv); Сьвятая Біблія, Сьвятое Пісаньне, Сьвятая Бібля (be-tarask); Bíbélì Mímọ́ (yo); Swjate pismo, Biblia (hsb); Kinh Thánh Kitô giáo, Thánh thư, Thánh Kinh, Lời Chúa (vi); Библия, Ютэо-Христианская Библия, Христианские священные писания, Священная Библия, Священное Писание (bxr); Biblia (sms); Holy Bible (en-gb); Света Библија, Свето писмо, Јудаео-хришћанска Библија, Хришћанско писмо (sr); Sveto pismo (sl); Biblia Santua, Eskritura Santuak, Eskriturak, Idazteuna (eu); Bíblia Sagrada, Santa Bíblia (pt-br); Bíblia Sagrada, Sagradas Escrituras, Santa Bíblia, A Bíblia (pt); พระคัมภีร์ศักดิ์สิทธิ์, พระคัมภีร์ไบเบิล-คริสเตียน, พระคัมภีร์คริสเตียน, พระคัมภีร์ไบเบิล (th); Sèng-chheh (nan); ユダヤ-キリスト教の聖書, キリスト教経典, 聖書の (ja); Alkitab (su); Pühakiri (et); ख्रिस्ति, ख्रीस्ट धर्म, एसु (new); ꠀꠡ꠆ꠝꠣꠘꠤ ꠇꠦꠔꠣꠛꠣꠁꠘ, ꠛꠣꠁꠛꠦꠟ, ꠁꠘ꠆ꠎꠤꠟ ꠡꠞꠤꠚ, ꠔꠃꠞꠣꠔ ꠡꠞꠤꠚ (syl); Torah (oc); Holy Bible, Christian scriptures, The Bible, The Holy Bible, Holy Scriptures, God's Word, Judaeo-Christian Bible, Christian scripture (en); النصوص الكتابية, كتاب المقدس, الكتاب (ar); Βίβλος (el); Pyhä Raamattu (fi)

बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हणले जाते. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू) लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा (शुभवर्तमाने - गॉस्पेल्सचा) संच आहे. बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ ख्रिस्ती श्रद्धेची व जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. सर्वप्रथम प्रकाशित झालेला व सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला हा ग्रंथ होय [].[ संदर्भ हवा ] इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत.[][ संदर्भ हवा ] भाषांतराच्या बाबतीतही बायबलची इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा सर्वाधिक भाषांत भाषांतरे झाली आहेत.[] [ संदर्भ हवा ] आज संपूर्ण जगात मुख्य भाषा व बोलीभाषा मिळून एकूण ५००० भाषा आहेत. त्यातील २१०० भाषांत आणि बोलीभाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर झाले आहे; हे भाषांतराचे काम निरंतर चालूच आहे.बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाची आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आहे.

बायबल 
ज्यू धर्म आणि ख्रिश्चन मधील पवित्र पुस्तके संग्रह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारधर्मग्रंथ,
collection of literary works
उपवर्गsources of law
गट-प्रकार
वापरलेली भाषा
भाग
धर्म
पासून वेगळे आहे
  • Scripture
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
गतेनबेर्ग बायबल
बायबल

बायबलमधील मुख्य विभाग

  • जुना करार: जुना करार आपणास यहुदी (निवडलेल्या) लोकांच्या जीवनात देवाने (ख्रिस्त येण्यापूर्वी) काय कार्य केले त्याचा संपूर्ण इतिहास कथन करतो. विश्वाच्या निर्मितीपासून ते निवडलेल्या यहुदी लोकांच्या इतिहासाची कथा जुन्या करारात सागितली आहे.
  • नवा करार: नवा करार आपणास येशूचा जन्म, त्याचे जीवन, त्याची शिकवण, दुःखसहन, क्रुसावरील मृत्यू व पुनरुत्थान यांचा इतिहास तसेच आद्य ख्रिस्ती मंडळीचा इतिहास कथन करतो.

बायबलची निर्मिती क्रमाक्रमाने होत गेली आहे. इजिप्तमध्ये गुलामगिरीत असलेल्या इस्रायली समाजाला देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली बाहेर काढले. आपले निवडलेले लोक म्हणून देवाने त्यांचा स्वीकार केला. त्याने त्यांच्या बरोबर करार केला; त्यांना हक्काच्या भूमीचे वचन दिले. त्यानंतरच या समाजाला धर्मशास्त्र (तोरह किवा पंचग्रंथ) मिळाला. या धर्मशास्त्रात इस्रायलच्या कुलपुरुषाचा इतिहास आणि धार्मिक व सामाजिक जीवनासंबंधीच्या नियमांचा अंतर्भाव होता. पंचग्रंथाला पुढे ज्ञानविषयक साहित्याची व संदेष्ट्यांच्या लिखाणाची जोड मिळाली.

ख्रिस्ती धर्म हा येशू या व्यक्तीभोवती केंद्रित झाला होता. ख्रिस्ती लोकांसाठी ख्रिस्त हा साकार झालेला प्रत्यक्ष परमेश्वर आहे. त्याच्या प्रेषितांना ख्रिस्तानुभव आला होता. इसवी सन ३० ते ५० या काळात प्रेषित मौखिकरीत्या ख्रिस्ताच्या विचारांचा प्रचार करीत होते. इसवी सन ४९ साली जेरुसलेमची धर्मसभा झाली आणि यहुदी नसलेल्यासाठी ख्रिस्ती धर्माचे दरवाजे उघडले गेले. सुंतेचा प्रश्न निकालात काढला गेला. पॅलेस्टाईनच्या सीमा ओलांडून ख्रिस्ती धर्म पश्चिम आशिया, ग्रीस, रोमपर्यंत पसरला. दूरस्थ ख्रिस्ती लोकांना येशूची शिकवण लेखी रूपात देणे आवश्यक झाले. सुरुवातीला पौलाने पत्रे लिहून ती गरज भागवली.

हळूहळू प्रेषितही काळाच्या पडद्याआड होऊ लागले. त्यामुळे येशूची शिकवण आणि आठवणी यांचे लेखी संग्रह तयार होऊ लागले. उपलब्ध संग्रहांतून साहित्याची निवड करून चार शुभवर्तमानकारांनी आपली शुभवर्तमाने रचली. तसेच पाखंडी मताचा प्रतिवाद करण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन झाले. ज्या लेखनाचे नाते प्रेषिताबरोबर (प्रत्यक्षदर्शी व्यक्ती) किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तीबरोबर होते त्यांचे साहित्य अस्सल (प्रेरित) म्हणून स्वीकारले गेले.  बाकीचे नाकारण्यात आले. अशा प्रकारे नव्या कराराची रचना सिद्ध झाली.

येशूने मानवी देह धारण केला, त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले. तो मरण पावला. त्याला पुरले. त्याचे पुनरुत्थान झाले. शिष्यांना त्याचे दर्शन झाले. तो काळाच्या अंती जगाचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे.” (प्रेषितांचा विश्वास अंगिकार ही प्रार्थना - Nicene Creed) ही पहिल्या शतकातील ख्रिस्ती समाजाची श्रद्धा होती. या श्रद्धेशी सुसंगत असलेले लेखन आणि शिकवण ही अधिकृत आणि त्या श्रद्धेशी विसंगत ते अनधिकृत, असा निकष तयार करण्यात आला. धर्मशिकवण देताना संत क्लेमेंट (इसवी सन ९६) व संत आयरेनियस (इसवी सन १८०) यांनी हाच निकष प्रमाण मानला. निकषासाठी ग्रीक भाषेत कॅनोन (Kanon), असीरियन भाषेत कानू (Qanu) , हिब्रू भाषेत कानेह (Qunah) असे शब्द असून मापनसूत्र असा त्याचा अर्थ आहे. युसेबियस (इसवी सन २६०-३४०) हा पॅलेस्टाईनमधील सिझेरियाचा बिशप होता. त्याने दहा भागात चर्चचा इतिहास लिहिला आहे. त्याने चार शुभवर्तमानांतील संदर्भाची यादी तयार केली, तसेच नव्या करारातील पुस्तकांची त्याने अधिकृत, वादग्रस्त, आणि बनावट अशा तीन गटांत विभागणी केली. (इसवी सन ३०३).[]

कॅथोलिक व प्रोटेस्टंट बायबल मधील प्रमाणित पुस्तके

  • कॅथोलिक बायबलमध्ये आलेक्झान्द्रिया प्रमाणित एकूण ७३ पुस्तके आहेत.
    1. जुना करार: ४६ पुस्तके (प्रथम संहिता ३९ पुस्तके + द्वितीय संहिता किवा ॲपोक्रिफा ७ पुस्तके. ).
    2. नवा करार – २७ पुस्तके
  • प्रोटेस्टंट बायबलमध्ये पॅलेस्टाईन प्रमाणित एकूण ६६ पुस्तके आहेत.
    1. जुना करार - ३९ पुस्तके
    2. नवा करार – २७ पुस्तके

कॅथोलिक बायबलमधील जुन्या करारातील पुस्तकांची यादी

कॅथोलिक बायबलमधील जुन्या करारातील पुस्तकांची यादी (प्रथम संहिता ३९ पुस्तके व द्वितीय संहिता ७ पुस्तके, एकूण ४६ पुस्तके )
जुना करार- प्रथम संहिता (३९) जुना करार - द्वितीय संहिता (७)
नियमशास्त्राची (तोराह) पुस्तके (५) ऐतिहासिक पुस्तके (६) संदेष्ट्यांची पुस्तके (१५)(नबिईम) पवित्र लेख (१३)(खतुविम) ॲपोक्रिफा
१. उत्पत्ती १.यहोशवा १. यशया १. स्तोत्रसंहिता १. तोबित
२. निर्गम २.शास्ते २. यिर्मया २. नीतिसूत्रे २. यहुदिथ
३. लेवीय ३.शमुवेल ३. यहेज्केल ३. ईयोब ३. शलमोनाचा ज्ञानग्रंथ
४. गणना ४.शमुवेल ४. होशेय ४. दानीएल ४. बेनसिराची बोधवचने
५. अनुवाद ५.राजे ५. योएल ५. एज्रा ५. बारुख
६.राजे ६. आमोस ६. नहेमिया ६. मक्काबी १
७. ओब्दिया ७. इतिहास १ ७. मक्काबी २
८. योना ८. इतिहास २ तसेच एस्तेर या पुस्तकाची ग्रीक भाषेतील वाढीव प्रत , बारुख पुस्तकाची पुरवणी :- (यिर्मया प्रवक्त्याचे पत्र) , शिवाय दानिएल पुस्तकाच्या पुरवण्या :-

(तीन युवकांचे गीत, सुसान्ना, बाल आणि अजगर)

टिप : कॅथोलिक बायबलमध्ये या विभागात एकूण ७ पुस्तके नसून १२ पुस्तके छापली जातात याचे कारण वर दर्शविल्याप्रमाणे ही पुस्तके मुख्य पुस्तकाची पुरवणी म्हणून न छापता वेगवेगळी दाखवली आहेत.

९. मिखा ९. गीतरत्न
१०. नहूम १०. रुथ
११. हबक्कुक ११. विलापगीत
१२. सफन्या १२. उपदेशक
१३. हाग्गय १३. एस्तेर
१४. जखऱ्या
१५. मलाखी

कॅथोलिक नव्या करारातील पुस्तकांची यादी

कॅथोलिक नव्या करारातील पुस्तकांची यादी (२७ पुस्तके)
शुभवर्तमाने (४) ऐतिहासिक पुस्तक (१) संत पौलाची पत्रे (१३) विश्वव्यापी पत्रे (८) साक्षात्कार ग्रंथ (१)
  1. मत्तय,
  2. मार्क,
  3. लुक,
  4. योहान
प्रेषितांची कृत्ये सामान्य पत्रे
  1. रोमकरास पत्र
  2. करीथकरास पत्र १
  3. करीथकरास पत्र २
  4. गलतीकरास पत्र
  5. इफिसकरास पत्र
  6. फिलिपेकरास पत्र
  7. कलस्सेकरास पत्र
  8. फिलेमोनास पत्र
  9. थेस्सलनीकरास पत्र १
  10. थेस्सलनीकरास पत्र २

पाळकीय पत्रे

  1. तीमथ्याला पत्र १
  2. तीमथ्याला पत्र २
  3. तीताला पत्र
  1. इब्री लोकास पत्र
  2. याकोबाचे पत्र
  3. पेत्राचे पहिले पत्र
  4. पेत्राचे दुसरे पत्र
  5. योहानाचे पहिले पत्र
  6. योहानाचे दुसरे पत्र
  7. योहानाचे तिसरे पत्र
  8. यहुदाचे पत्र
योहानाला झालेले प्रकटीकरण
कॅथोलिक बायबल जुना करार = ४६ पुस्तके, नवा करार = २७ पुस्तके, एकूण = ७३ पुस्तके

प्रोटेस्टंट बायबल मधील पुस्तकांची यादी (जुना व नवा करार)

प्रोटेस्टंट बायबल मधील पुस्तकांची यादी (जुना करार = ३९ पुस्तके, नवा करार = २७ पुस्तके, एकूण = ६६ पुस्तके)
जुना करार (हिब्रू बायबल) -- एकूण ३९ पुस्तके नवा करार -- एकूण २७ पुस्तके
नियमशास्त्राची (तोराह) पुस्तके (५) ऐतिहासिक पुस्तके (६) संदेष्ट्यांची पुस्तके (१५) (नबिईम) पवित्र लेख (१३)(खतुविम) शुभवर्तमाने (४) ऐतिहासिक पुस्तक (१) पौलाची पत्रे (१३) विश्वव्यापी पत्रे (८) साक्षात्कार ग्रंथ (१)
१. उत्पत्ती १.यहोशवा १. यशया १. स्तोत्रसंहिता १. मत्तय प्रेषितांची कृत्ये १. रोमकरांस पत्र १. इब्री लोकांस पत्र योहानाला झालेले प्रकटीकरण
२. निर्गम २.शास्ते २. यिर्मया २. नीतिसूत्रे २. मार्क २. करिंथकरास पत्र १ २. याकोबाचे पत्र
३. लेवीय ३.शमुवेल ३.यहेज्केल ३. इयोब ३. लुक ३.करिंथकरास पत्र २ ३. पेत्राचे पहिले पत्र
४. गणना ४.शमुवेल ४. होशेय ४. दानीएल ४. योहान ४. गलतीकरास पत्र ४. पेत्राचे दुसरे पत्र
५. अनुवाद ५.राजे ५. योएल ५. एज्रा ५. इफिसकरास पत्र ५. योहानाचे पहिले पत्र
६.राजे ६. आमोस ६. नहेमिया ६. फिलीपेकरास पत्र ६. योहानाचे दुसरे पत्र
७. ओब्दिया ७. इतिहास १ ७. कलस्सेकरास पत्र ७. योहानाचे तिसरे पत्र
८. योना ८. इतिहास २ ८. फिलेमोनास पत्र ८. यहुदाचे पत्र
९. मिखा ९. गीतरत्न ९. थेस्सलनीकरास पत्र १
१०. नहूम १०. रुथ १०. थेस्सलनीकरास पत्र २
११. हबक्कुक ११. विलापगीत

११. तीमथ्याला पत्र १

१२. सफन्या १२. उपदेशक

१२. तीमथ्याला पत्र २

१३. हाग्गय १३. एस्तेर १३. तीताला पत्र
१४. जखऱ्या
१५. मलाखी
प्रोटेस्टंट बायबल - जुना करार = ३९ पुस्तके, नवा करार = २७ पुस्तके, एकूण = ६६ पुस्तके

यहुदी समाज आणि बायबल (जुना करार) : ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा यहुदी समाजात मोशेचे धर्मशास्त्र (तोराह - ग्रंथपंचक), संदेष्ट्यांचे लेखन ( नबीईम ), व अन्य धार्मिक साहित्य (खतुविम), प्रचलित होते. आरंभीच्या यहुदी ख्रिस्ती लोकांसाठीसुद्धा हे पवित्र ग्रंथ होते. कारण येशू स्वतः आणि त्याचे अनुयायी धर्माने यहुदी होते. मात्र ते याला जुना करार असे संबोधित नव्हते. कारण तेव्हा नव्या कराराचे लेखन, संपादन व संकलन पूर्ण झाले नव्हते. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांचा बायबल हा धर्मग्रंथ अस्तित्त्वात आला. ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्मग्रंथात यहुद्यांच्या धर्मग्रंथाचा (जुना करार) समावेश केला. मात्र यहुद्यानी आपल्या धर्मग्रंथात ख्रिस्ती पुस्तकांचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मते नवा करार अधिकृत नाही. येशू हा ख्रिस्त किवा मसीहा आहे. हे त्यांनी स्वीकारले नाही. यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकाला आता जुना करार असे संबोधित नाहीत तर आधुनिक पंडित त्याला "हिब्रू बायबल" असे म्हणतात.[]

यहुदी धर्मशास्त्राचे स्वरूप (हिब्रू बायबल)  : यहुदी लोकांचे धर्मशास्त्र म्हणजे जुना करार, यात ३९ पुस्तके असली तरी, एकूण २४ गुंडाळ्या होत्या. खालील तक्ता पहा :

१. नियमशास्त्र - तोराह (Torah - Law) - उत्पती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद एकूण ५ गुंडाळ्या

२. संदेष्टे - नाबिईम (Nabiim - Prophets)

(अ.). आधीचे - यहोशवा, शास्ते, शमुवेल, राजे एकूण ४ गुंडाळ्या

(ब.) नंतरचे - यशया, यिर्मया, यहेज्केल, होशेय ते मलाखी, १२ संदेष्ट्यांची एक गुंडाळी एकूण ४ गुंडाळ्या

३. धार्मिक पवित्र लेख - खतुविम (Kethubim - Hagiographha)

(अ.) काव्य - स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, इयोब - एकूण ३ गुंडाळ्या

(ब. ) सणाच्या गुंडाळ्या - गीतरत्न, रुथ, विलापगीत, उपदेशक, एस्तेर - एकूण ५ गुंडाळ्या

(क.) ग्रंथ - दानीएल, एज्रा, नहेम्या, इतिहास, - एकूण ३ गुंडाळ्या

तानक असा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रू बायबलचे तीन मुख्य विभाग आहेत. ग्रंथपंचक (तोराह – TORAH), संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM), आणि पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM). वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी प्रचलित झाला.

वरील तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे यहुदी धर्मशास्त्राचे १. नियमशास्त्र, २. संदेष्ट्यांची पुस्तके व ३. धार्मिक लेख असे तीन विभाग होते. ख्रिस्ताने या तीन विभागांचा नव्या करारात उल्लेख केला आहे. (पहा, नवा करार, लुककृत शुभवर्तमान २४:४४, मत्तय ५:१७). शमुवेल, राजे, इतिहास यांची दोन दोन पुस्तके असली तरी प्रत्येकी एक एक गुंडाळी होती. जुन्या कराराच्या अनुक्रमणिकेत असलेले होशेय ते मलाखी या बारा संदेष्ट्यांची एकच गुंडाळी होती. एज्रा व नहेम्या ही दोन पुस्तके मिळून एक गुंडाळी होती.[]

अनधिकृत पुस्तके : ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन २०० या चारशे वर्षाच्या कालावधीत यहुदी व ख्रिस्ती लेखकांनी धार्मिक विषयावर बरेच लेखन केले. त्यापैकी काही लेखनाला अपोक्रिफल (गुप्त) लेखन म्हणजे अनधिकृत साहित्य असे म्हणले जाते. या लेखनाचा यहुदी, कॅथोलिक किवा प्रोटेसटट बायबलमध्ये समावेश नाही. या लिखाणात दृष्टान्त व साक्षात्कार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. जगाचा अंत व इतिहासाचे शेवटचे पर्व असा यातील लेखनविषय आहे. परमेश्वर व दुष्ट शक्ती (सैतान) यांचा अखेरचा संग्राम या लिखाणात वर्णिला आहे. त्यांतील काही अनधिकृत पुस्तके खालीलप्रमाणे

(अ.) यहुदी अनधिकृत पुस्तके : १. एसद्रासचे पुस्तक, २. मक्काबीचे तिसरे पुस्तक, ३. आदम आणि एवेचे पुस्तक, ४. यशयाचे हौताम्य, ५. हनोखाचे पुस्तक, ६. बारा कुलपतींचे (पेत्रीआर्क) इच्छापत्र, ७. संदेष्टी सिबलची संदेशवाणी, ८. मोशेचे स्वर्गारोहण, ९. बारुखाची पुस्तके, इत्यादी. यहुदी लोकांना ही पुस्तके वंदनीय नसली तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांकडे पाहिले जाते.

(आ.) ख्रिस्ती अनधिकृत पुस्तके : इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर आणि दुसऱ्या शतकात काही अनधिकृत ख्रिस्ती साहित्य लिहिले गेले.[ संदर्भ हवा ] त्यांची यादी खालीलप्रमाणे :

१. द गाॅस्पेल ऑफ द नाझरीन (इसवी सन १८० पूर्वी), २. द गाॅस्पेल ऑफ द हिब्रू, अरेमिकमधून ग्रीकमध्ये भाषांतरित (दुसऱ्या शतकाच्या शेवटी), ३. द गाॅस्पेल ऑफ इजिप्तिशियन (इसवी सन १५० नंतर), ४. द गाॅस्पेल ऑफ द एबोनाइट्स, ग्रीक भाषेत (इसवी सन १५० पूर्वी), ५. द गाॅस्पेल ऑफ पीटर (इसवी सन १५० पूर्वी), ६. द गाॅस्पेल ऑफ थाॅमस (इसवी सनाचे दुसरे शतक) .

येशू ख्रिस्ताचे बालपण व दुःखद अंत यासंबंधी माहिती यात सागितली गेली. त्यावेळच्या ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक समजुतीचे प्रतिबिब या पुस्तकात दिसून येते. याशिवाय काही काल्पनिक व अतिरंजित शुभवर्तमाने या काळात रचली गेली. ती अशी :

१. द प्रोटो गोस्पेल ऑफ जेम्स - प्रभू येशूच्या बालपणाविषयी ग्रीक भाषेतील पुस्तक (इसवी सन १५० च्या दरम्यान), २. द गाॅस्पेल ऑफ स्यूडो मॅथ्यू , लाटिन भाषेत लेखन (इसवी सन ५-६ शतक), ३. द डाॅर्मिशिअन ऑफ द व्हर्जिन (पवित्र मरीयेचे स्वर्गउन्नयन), ४. द हिस्ट्री ऑफ जोसेफ द कारपेंटर - योसेफ सुताराचा इतिहास - अरेबिक, लाटिन आणि कॉप्टिक भाषात. (इसवी सन चवथ्या शतकापूर्वी), ५. द अरेबिक गोस्पेल ऑफ द चाईल्डहूड, ६. द गोस्पेल ऑफ निकादेमुस, ७. द अक्ट्स ऑफ पायलट, ८ द डीसेंट इन टू हेल, ९. द गोस्पेल ऑफ बसिलीदेस, १०. द गाॅस्पेल ऑफ मार्सिओन, ११. द गाॅस्पेल ऑफ ट्रूथ, १२ द गाॅस्पेल ऑफ फिलिप, १३. द गाॅस्पेल ऑफ ज्यूडास इत्यादी.[ संदर्भ हवा ]

तसेच काही प्रेषितांच्या नावावर पुढील अनधिकृत पुस्तके लिहिली गेली. १. संत जॉन (इसवी सन २०० पूर्वी), २. संत पाॅल (इसवी सन २०० पूर्वी), ३. संत पीटर (इसवी सन १८०-१९०), ४. संत थाॅमस (इसवी सन १५०), तसेच फिलिप, बर्नाबास व थादेउस या संतांच्या प्रवासाच्या आणि चमत्काराच्या नोंदी असलेली पुस्तके.

याशिवाय पुढील अनधिकृत पत्रे लिहिली गेली. : १. द थर्ड एपिसल टू द करिन्थनियस, २. द लेटर ऑफ द अपोसल (इसवी सन १५०-१८०), ३. द एपिसल टू द लओदेसियांस, ४. द एपिसल टू द अलेक्झान्द्रियस, ५. द कॉरास्पोन्डोस ऑफ पौल विथ सेनेका, ६. द एपिसल टू बर्नाबास (इसवी सन १३० नंतर), ७. द केरिग्मा ऑफ पीटर, ८. द केरिग्मा ऑफ पौल इत्यादी. "द गॅस्पेल ऑफ जुदास"च्या चर्मपत्रांचा शोध १९७० साली इजिप्तच्या एका थडग्यात लागला. त्यानंतर ते हरवले आणि २००० साली पुन्हा सापडले. त्यात जुदासला खलनायक असे न दाखवता त्याची उजळ प्रतिमा रेखाटली आहे. बायबलचे अभ्यासक फादर डॉक्टर रुई द मिनेझिस सागतात, " ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात सुमारे ६० शुभवर्तमाने अस्तित्त्वात होती. ख्रिस्ती धर्ममंडळाने त्यातून मत्तय, मार्क लुक व योहानाची शुभवर्तमाने अधिकृत म्हणून स्वीकारली आहेत." []

जुना करार व नवा करार हे परस्परावलंबी व परस्पर पोषक असे दोन भाग आहेत. जुन्या करारात नव्या कराराविषयी पूर्वअपेक्षा, पूर्वआश्वासने, व पूर्वछायाही दिसून येतात. भावी चागल्या गोष्टींची छाया जुन्या करारात सापडते (नवा करार : इब्री लोकास पत्र : १०:१). नव्या करारात जुन्या कराराची भाकिते व आश्वासने सफळ व पूर्ण होतात. नवा करार समजण्याकरिता जुन्या कराराची पार्श्वभूमी समजली पाहिजे. जुन्या करारावर नवा करार अधिष्ठित आहे. ते अविभाज्य असे घटक आहेत.[ संदर्भ हवा ]

बायबलच्या मूळ भाषा : बायबल पुढील भाषेत लिहिले गेले :

हिब्रुूही एक अत्यंत प्राचीन सेमेटिक भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली व वाचली जाते. सहाव्या शतकाच्या अंतापर्यंत ही यहुदी लोकांची भाषा होती.

अरेमिक - आर्मेनिया व पर्शिया या देशातील यहुदी लोक ही भाषा बोलत. हीच भाषा येशूची बोलीभाषा होती.

ग्रीक – ही भाषा लाटिन भाषेप्रमाणे आर्य किवा इंडो युरोपिअन भाषा असून आलेक्झान्द्रियाच्या अधिपत्याखालील, पश्चिम आशियात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ही भाषा बोलली जात असे.

जुन्या करारातील ३९ पुस्तके हिब्रू भाषेत लिहिली गेली होती. (प्रथम संहिता) . जुन्या करारातील ७ पुस्तके (द्वितीय संहिता) ग्रीक व अरेमिक भाषेत लिहिली गेली होती.. नव्या करारातील २७ पुस्तके ग्रीक भाषेत लिहिली गेली होती. देवाने प्रेरीत केलेल्या ४० किवा त्यापेक्षा अधिक लेखकांनी बायबलचे लेखन केले. त्यातील बहुतेक लेखक यहुदी होते. पालेस्तीन (इस्राएल), बाबिलोन (इराक), मिसर (इजिप्त), रोम आणि करिंथ अशा वेगवेगळ्या ठिकाणी बायबल लिहिले गेले.देशप्रेम व धर्मशिक्षण शिकविण्यासाठी, तसेच मुक्तिदात्याबद्दल (मसीहा) माहिती देण्यासाठी बायबल लिहिले गेले.

यहुदी धर्मशास्त्राचे प्रमाणीकरण

•इसवी सन ९० साली इस्राएल देशातील यामनीया या ठिकाणी यहुदी धर्मपंडितांनी एक धर्मसभा आयोजित केली. या धर्मसभेत हिब्रु बायबल (जुना करार) मधील ३९ पुस्तकांना मान्यता देण्यात आली.

हिब्रु बायबलच्या प्रमाणीकरणाचे निकष : ख्रिस्ताच्या जन्माच्या अनेक शतके आधी पालेस्तिनमधील यहुद्यांनी (परूशी लोकांनी) जुन्या करारातील पुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी पुढीलप्रमाणे निकष तयार केले.

•ग्रंथपंचकाच्या (मोशेचे नियमशास्त्र) कसोटीवर ही पुस्तके उतरावयास हवी.

•ही पुस्तके संदेष्टा एज्रा याच्या कालावधीच्या आधी लिहिली गेलेली असावीत.

•ही पुस्तके हिब्रु भाषेत लिहिलेली असावीत.

•ही पुस्तके पालेस्तिन देशात लिहिली गेली असावीत.

ख्रिस्ती बायबलचे प्रमाणीकरण : नवा करार लिहिला जात असताना (इसवी सन ५० ते १०० या कालावधीत) अनेक धर्मपुस्तके लिहिली गेली. अशा वेळी कोणती पुस्तके प्रेरित म्हणून मानली जावी याबद्दल गोंधळ निर्माण झाला. इसवी सन ३९३ मध्ये हिप्पो येथील ख्रिस्ती धर्मसभेत प्रेरित धर्मपुस्तकांची यादी करण्यात आली. आणि हिच पुस्तके बायबलमध्ये समाविष्ट करण्यात आली. इसवी सन १५४६ मध्ये ट्रेंट येथील धर्मसभेत (कौन्सिल ऑफ ट्रेंट) या पुस्तकांवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले.

बायबलच्या काही प्राचीन प्रती :- (जुना करार) - प्राचीन जुन्या कराराच्या प्रती गुंडाळ्याच्या स्वरूपात तयार करीत. पपायरस म्हणजे लव्हाळयाच्या लगद्यापासून तयार केलेला जाडाभरडा कागद. गुंडाळ्या करण्यासाठी हा कागद वापरीत. कोरड्या हवामानात या गुंडाळ्या बरेच दिवस टिकत असत. कधी कमावलेल्या जनावरांच्या चामड्यावरसुद्धा गुंडाळ्या तयार करीत. गुंडाळी म्हणजे नकाशासारखा दोन दांड्यांमध्ये बसवलेल्या कागदावर लिहिलेला मजकूर. वरून खाली नव्हे तर, उजवीकडून डावीकडे गुंडाळी उलगडत व त्यावरील मजकूर वाचला जात असे.

(१) मृत सागर गुंडाळ्या (Dead Sea Scrolls) :- (बायबलच्या सर्वात प्राचीन प्रती.) इसवी सन १९४७ मध्ये इस्रायलमधील यरीहोनजीक कुम्ररान येथे मोहंमद अबू धीब नावाच्या एका बदाऊनी मेंढपालाला मृत समुद्रानाजीक एका गुहेत काही प्राचीन गुंडाळ्या सापडल्या व साऱ्या जगातील पवित्र शास्त्राचे अभ्यासक, विद्वान यांचे लक्ष तेथे वेधले गेले. या पवित्र शास्त्राच्या गुंडाळ्या मातीच्या भांड्यात घालून ठेवलेल्या आढळल्या. आतापर्यंत ११ गुहांमध्ये हस्तलिखिते मिळाली आहेत. ही ख्रिस्तपूर्व शेवटचे शतक ते इसवी सन पहिले शतक या काळात लिहिलेली आहेत. चवथ्या गुहेतच ३८२ लेख मिळाले. यापैकी १०० गुंडाळ्या पवित्र शास्त्रासंबंधी आहेत. त्यात पवित्र शास्त्रातील (जुना करार) एस्तेर पुस्तक वगळता हिब्रू पवित्र शास्त्रातील सर्व पुस्तकांचे भाग अगर संपूर्ण पुस्तके आहेत. यांखेरीज अप्रमाणित पुस्तके, दृष्टान्त, साक्षात्कार, भाष्य, टीका, उपकार स्तुतिगीते व पंथीय लिखाण इत्यादी साहित्य सापडले आहे. या गुहानाजिक एका मोठ्या मठाचे अवशेष सापडले असून तेथे एसेनी नावाच्या मठवासीयांची वस्ती होती. या शोधामुळे पवित्र शास्त्रासंबंधी अभ्यासाच्या साधनात मोलाची भर पडली आहे.[]

(२) मासोरेतिक प्रत (Masoretic Text): मूळ हिब्रू जुन्या करारात पूर्वी फक्त व्यंजने होती स्वर नव्हते. यहुदी मासोरातिक पंडितांनी इसवी सनाच्या ६ व्या शतकात हे स्वर शोधून काढले. इसवी सन ६ ते १२ या शतकात काही यहुदी पंडित तिबिर्या व युफ्रायटिस नदीकाठच्या सोरा येथे होते. त्यांनी हिबू मूळ प्रतीमध्ये विरामचिन्हे घातली. व उच्चाराच्या सुलभतेसाठी आरोह अवरोहच्या खुणा तयार केल्या. हे लिखाण व इतर टिपणे या सर्वाना त्यांनी मासारो (रूढी – परंपरा) असे नाव दिले. यावरून मासोरेतिक शब्द आला.

(३) नॅश पपायरस  : - जुन्या कराराची ही प्रत १९०२ साली नॅश (W.L. Nash) यांना इजिप्त येथे सापडली. यामध्ये दहा आज्ञांचा काही भाग (निर्गम २०:२-१७), अनुवाद (५:६-२१) आणि शमा (अनुवाद ६:४). इसवी सन पूर्व १५० ते इसवी सन ६८ या काळात ही प्रत लिहिली गेली.

(४) कैरो गेनिझा प्रत  :- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कैरो, इजिप्त येथील यहुद्यांच्या एका जुन्या सभास्थानात ह्या प्रती सापडल्या. जवळजवळ २,००,००० लिखाणाचे तुकडे तेथे सापडले. इसवी सन ५०० च्या दरम्यान ह्या प्रती लिहिल्या गेल्या.

(५) शोमरोनी ग्रंथपंचक :- अंदाजे इसवी सनपूर्व ५४० ते इसवी सन १०० या कालावधीत शोमरोनी लोक यहुद्यांपासून वेगळे झाले. त्यांनी जुन्या करारातील पहिली पाच पुस्तकेच (ग्रंथपंचक - उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना व अनुवाद) हीच फक्त प्रमाण मानली. यालाच शोमरोनी ग्रंथपंचक असे म्हणतात.

(६) सेप्तुअजिन्त  :- जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. ही जुन्या कराराची सर्वात जुनी भाषांतरित प्रत होय.

नव्या कराराच्या प्राचीन प्रती :- कमाविलेल्या कातड्यावर, चर्मपत्रावर लिहिलेला मजकूर स्वतंत्र पानासारखा एकावर एक रचून तयार होणाऱ्या पुस्तकाला कोडेक्स असे म्हणत. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात गुंडाळ्याऐवजी कोडेक्स स्वरूपात लिखाण होऊ लागले. इसवी सनाच्या चवथ्या शतकापासून कमाविलेल्या कातड्यावर , त्याला व्हेल्लम म्हणत, यावर धर्मशास्त्राच्या प्रती लिहून काढीत. ही कातडी पानासारखी रचून पुस्तक बांधीत . पंधराव्या शतकात छापण्याच्या कलेचा शोध लागेपर्यंत सर्व लिखाण हाताने केले जाई. दुसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत हाताने लिहिण्यात आलेल्या पवित्र शास्त्राच्या संपूर्ण किवा त्रोटक स्वरूपातील चार हजार हस्तलिखित प्रती (Manuscripts) आजही उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रती खालीलप्रमाणे :

(१) कोडेक्स सिनायटिकस  : - ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इसवी सन १८५९ साली सीनाय डोगरावरील सेंट कॅथरीन नावाच्या रोमन कॅथोलिक मठात प्रोफेसर टिशनड्राॅफ यांना सापडली.

(२) कोडेक्स व्हॅटिकनस  :- ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत आज रोम येथील व्हॅटिकन :(पोप यांच्या) पुस्तकसंग्रहालयात आहे.

(३) कोडेक्स आलेक्झान्द्रियानस : - ही पाचव्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे सापडली. ती १६२८ साली कॉन्स्टॅन्टिनोपल येथील एका धर्मगुरूने इग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला भेट म्हणून दिली. आता ती इंग्लंड येथे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन करून ठेवली आहे.

बायबलची भाषांतरे :- •बायबल मधील जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. बायबलच्या अनेक प्राचीन हस्तलिखित प्रती आज उपलब्ध आहेत. या प्राचीन हस्तलिखितांवरून प्रमाणप्रत सिद्ध करून बायबल भाषांतरित केले गेले आहे. इसवी सन १८१५ ते १९९५ या काळात बायबलच्या ३० कोटीहून जास्त प्रती छापून विकल्या गेल्या होत्या. जगामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी ३३७ भाषांत संपूर्ण बायबल उपलब्ध आहे. बायबलमधील कमीत कमी एक पुस्तक जगातील २१०० भाषांत उपलब्ध आहे. बायबलखेरीज इतर कोणत्याही ग्रंथाचे भाषांतर इतक्या भाषांत झालेले नाही.

बायबलची काही प्राचीन भाषांतरे :-

१. सेप्तुअजिन्त भाषांतर (Septuagint ) : - जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २७० ते २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. सत्तर यहुदी पंडितांनी हे भाषांतर केले म्हणून त्याला सेप्तुअजिन्त भाषांतर असे म्हणतात. (ग्रीक भाषेत सेप्टा म्हणजे ७०).

२. शोमरोनी ग्रंथपंचक  : -मोशेची पहिली पाच पुस्तके हिब्रू भाषेतून शोमरोनी भाषेत भाषांतरित करण्यात आली.

३. पेशितो किवा सीरियाक : - संपूर्ण पवित्र शास्त्र सीरियन भाषेत भाषांतरित करण्यात आले. इसवी सन २०० च्या दरम्यान हे भाषांतर केले गेले.

४. व्हलगेट भाषांतर  : - संपूर्ण पवित्र शास्त्र (जुना व नवा करार) याचे लाटिन भाषेत भाषांतर करण्यात आले. इसवी सन ४०० च्या सुमारास संत जेरोम याने पोप दमासस यांच्या आज्ञेवरून हे कार्य बेंथलेहम येथे पूर्ण केले. जवळजवळ एक हजार वर्ष रोमन कॅथोलिक चर्चचे हे प्रमाणभूत पवित्र शास्त्र होते.[]

बायबलची काही मराठी भाषांतरे  :-

(१) ख्रिस्तपुराण - मराठीला बायबलची रसाळ तोंडओळख फादर थाॅमस स्टीफन यांनी १६१६ सालीच “ख्रिस्तपुराण” या ग्रंथाद्वारे करून दिली होती. या ग्रंथात १७१६२ ओव्या असून आजही हा ग्रंथ मराठीतील एक अभिजात साहित्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. तथापि “ख्रिस्तपुराण’ हे पारंपारिक बायबल नसून त्याचा कथाविषय बायबल आहे एवढेच.

(२) डॉक्टर विल्यम कॅरी यांचे भाषांतर - डॉक्टर विल्यम कॅरी यांनी इसवी सन १८०४ साली पंडित वैजनाथ यांच्या सहकार्याने बायबलच्या भाषांतराला प्रारंभ केला. इसवी सन १८०५ मध्ये कॅरी यांनी बंगालमधील सेरामपूर येथे संत मत्तयचे शुभवर्तमान मोडी लिपीत प्रसिद्ध केले. मराठीतील पहिल्या छापील पुस्तकाचा मान संत मत्तयच्या या पुस्तकाला मिळतो. इसवी सन १८०७ साली कॅरी यांनी मराठीत नवा करार प्रसिद्ध केला. डॉक्टर विल्यम कॅरी यांनी चाळीस भारतीय भाषांत बायबलचे भाषांतर केले.

(३) पंडिता रमाबाईंचे भाषांतर - (प्रोटेस्टंट आवृत्ती) बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. हिब्रू व ग्रीक भाषा शिकून बायबलचे मातृभाषेत भाषांतर करणाऱ्या रमाबाई या जगातील एकमेव स्त्री भाषांतरकार आहेत.

(४) सुबोध बायबल ; फादर फ्रान्सिस दिब्रिटो (२०१०) - फादर फ्रान्सिस परेरा या भाषांतराबद्दल म्हणतात” आधुनिक युगातील माणसाला समजेल असा बायबलचा मराठी भावानुवाद सुबोध बायबलच्या रूपाने मराठी जगताला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले आहे. ह्या बायबलची आवृत्ती अन्य आवृत्त्यांपेक्षा निराळी आहे. ते शब्दशः भाषांतर नसून भावानुवाद आहे. “ यातील विविध माहितीदर्षक अभ्यासपूर्ण टिपा बायबल अभ्यासाला खूपच मदत करतात.[ संदर्भ हवा ]

(५) बायबल : देवाचा पवित्र शब्द - (प्रोटेस्टंट आवृत्ती)  : हा २०१२ साली प्रसिद्ध झालेला बायबलचा भावानुवाद असून त्याचे भाषांतरकार अनिल दहिवाडकर हे आहेत. ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे यांनी हा भावानुवाद प्रसिद्ध केला आहे. भरपूर माहितीदर्षक टिपा, चित्रे, नकाशे यामुळे हा ग्रंथ बराच माहितीदार झाला आहे.

(६) बायबल सोसायटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेले "पवित्र शास्त्र" (कॅथोलिक आवृत्ती) या संपूर्ण बायबलची सतत पुनर्मुद्रणे होत आहेत. (वितरण - जीवन दर्शन केन्द्र, गिरिज, वसई, महाराष्ट्र).

याशिवाय ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर यांनी नव्या करारातील चार शुभवर्तमानांचे इंग्रजीवरून अप्रतिम मराठी भाषांतर केले आहे. (बायबल : नवा करार, भाषांतर व मुक्तचिंतन, २००८). तसेच पुण्याच्या जीवनवचन प्रकाशनाने १९८२ साली "पवित्र शास्त्र - सुबोध भाषांतर ही संपूर्ण बायबलची सुगम मराठी आवृत्ती प्रसिद्ध केली. तिचे चागले स्वागत झाले.[]

जुना करार : पार्श्वभूमी

विविध समाजगट - हिब्रू हे सेमेटिक वंशाचे लोक होते. हिब्रू लोकांचे कालांतराने निरनिराळे समाजगट तयार झाले. ते खालीलप्रमाणे होत.

हिब्रू : हेबेर, हबिरू, किवा अपिरू या भटक्या जमातीचे हे लोक. हिब्रू ही त्यांची भाषा होती. पुढे हिब्रू ही समाजवाचक संज्ञा झाली.

इस्राएली : - अब्राहामाचा नातू याकोब याचे इस्राएल हे दुसरे नाव होय. त्याच्या वंशजांना इस्राएली (इस्रायली) असे नाव पडले.

यहुदी (ज्यू) ; - याकोबाला बारा पुत्र होते. तेच इस्रायेलच्या बारा वंशाचे आदिपिते होत. त्यांच्यापैकी दहा घराणी काळाच्या ओघात नामशेष झाली असे मानले जाते. यहुदा आणि बेंजामिन हीच घराणी मागे उरली. बेंजामिनच्या घराण्याला विशेष महत्त्व नसल्याने यहुदा वंशाचे प्राबल्य प्रस्थापित झाले. यहुदा या शब्दावरूनच इस्राएली लोक यहुदी या नावाने ओळखले जाऊ लागले. बाबिलोनच्या बंदिवासातून परतल्या नंतर हे नाव प्रचारात आले. यहुदी लोक जरी देश विदेशात विखुरले गेले तरी ते कधीही अन्य देशातील लोकांशी मिसळले नाहीत. त्यांनी आपल्या एकेश्वरी श्रद्धेचे व यहुदी धर्माचे निष्ठेने जतन केले.

गालीली लोक : पालेस्ताईनच्या उत्तर भागातील गालील सरोवराच्या परिसरातील हे रहिवासी होते. अन्य राष्टांच्या लोकांबरोबर त्यांची सरमिसळ झाली होती. धार्मिक दृष्टीने कट्टर यहुदी लोक यांना कमी दर्जाचे मानीत. हे लोक मात्र प्रखर राष्टवादी होते.

अदोमी लोक : अब्राहामचा दुसरा नातू व याकोबाचा पुत्र एसाव याचे वंशज म्हणजे अदोमी लोक होत. यांना पूर्णपणे यहुदी समजले जात नव्हते. याहुदा प्रांताच्या दक्षिणेला त्यांचे अल्पकाळ वास्तव्य होते. पालेस्ताईनवर राज्य करणारा थोरला हेरोद (ख्रिस्तपूर्व ४० ते इसवी सन ४) हा अदोमी होता.

शोमरोनी लोक (समारीतन लोक) : इस्राएल या उत्तरेकडच्या राज्याची राजधानी समारीया (शोमरोन) येथे होती. यावरून तेथील लोक समारीतन किवा शोमरोनी या नावाने ओळखले जात. बाहेरून आलेले लोक आणि स्थानिक यहुदी लोक यांच्या मिश्र संकराने अस्तित्त्वात आलेली ही जमात होती. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये इस्राएली लोकांना युद्धकैदी म्हणून असिरीयाला नेण्यात आले, तेव्हा हे शोमरोनी लोक शोमरोन येथेच राहिले . ते मोशेचे धर्मशास्त्र (ग्रंथपंचक - जुन्या कराराची पहिली पाच पुस्तके) मान्य करीत. परंतु जेरुसलेमला तीर्थक्षेत्र समजत नसत. तर गिरीज्जीम पर्वतावर उपासना करीत. कट्टर यहुदी लोक या लोकांना तुच्छ समजत व त्यांच्याशी कोणताही व्यवहार करीत नसत. शोमरोनी लोकही यहुदी लोकांपासून फटकून रहात.

हद्दपार झालेले किवा विखुरलेले यहुदी (डायसपोरा) : पहिल्या शतकात पालेस्ताईनमध्ये यहुदी लोकांची सख्या सुमारे पाच लाख होती. तसेच पालेस्तैनबाहेरही यहुदी मोठ्या प्रमाणात राहत होते. विविध आक्रमणे, युद्ध, व्यापार इत्यादी कारणामुळे हे यहुदी लोक संपूर्ण रोमन साम्राज्यात विखुरले गेले होते. यहुदी लोक जगात कुठेही गेले तरी आपल्या धर्मश्रद्धेशी नेहेमीच एकनिष्ठ राहिल्रे. आपल्या यहुदी धर्माचे त्यांनी कसोशीने जतन केले.

परराष्ट्रीय लोक (पेगन) : पालेस्ताईनचे मुळचे कनानी लोक तसेच तेथे वास्तव्य करून असलेले ग्रीक, रोमन व इतर परदेशी लोक यांना यहुदी लोक परराष्ट्रीय लोक (पेगन) असे संबोधित. हे लोक यहुदी लोकांप्रमाणे एकेश्वरवादी नसून अनेकेश्वरवादी व मूर्तिपूजक होते. कट्टर यहुदी लोक या लोकांशी व्यवहार करीत नसत. जेरुसलेमच्या बाहेर यांची मोठी वस्ती होती.[१०]

जुना करार : अंतरंग : बायबलच्या पहिल्या पुस्तकात (उत्पत्ती) पहिला मानव आदम आणि पहिली स्त्री एवा यांची कथा वर्णन केली आहे. 'द जेरुसलेम बायबलनुसार (पान २०५५) आदम आणि एवा यांचा काळ २० लाख वर्षांहून प्राचीन आहे. शास्त्रीय परिभाषेत तो "पेबल कल्चर"चा काळ होता. ख्रिस्तपूर्व ३१०० ते २१०० या काळात अब्राहामचे पूर्वज मेसोपोटेमिया (तैग्रीस-युफ्रेटिस नद्यांचा प्रदेश - आताचा इराक) येथे वास्तव्य करीत होते. या काळात सीरियापासून पालेस्ताईनच्या सागरी भागापर्यंत इजिप्तच्या साम्राज्याचा अंमल होता.

अब्राहाम हा आपली पत्नी सारा हिला घेऊन ख्रिस्तपूर्व १८५० च्या दरम्यान तत्कालीन उर या ठिकाणाहून (सध्याचा इराक) कनान (सध्याचा इस्राएल) येथे आला. अब्राहाम व सारा यांना मुलबाळ नव्हते. अब्राहामची हागार नावाची दासी होती. तिजपासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. त्यानंतर म्हातारपणी अब्राहामला सारा हिजपासून इसहाक नावाचा मुलगा झाला. सारा आपली सवत हागार हिचा छळ करू लागली. साराच्या छळाला कंटाळून हेगार आपल्या मुलास घेऊन अरबस्तानात निघून गेली.

इसहाक पासून यहुदी जमात व इश्माएल पासून अरबी जमात अस्तित्त्वात आली. इसहाक याला इसाव व याकोब हे दोन पुत्र झाले. पुढे या दोन पुत्रात वितुष्ट निर्माण झाले. याकोबाला लेआ व रेचेल या दोन धर्मपत्नी आणि बिल्हा व जिल्फा या दासीपत्नी होत्या. या चौघीपासून त्याला एक कन्या व बारा पुत्र झाले. त्यांच्यापासून पुढे इस्रायेलची बारा घराणी (बारा वंश) उदयास आले.

योसेफ हा याकोबचा लाडका पुत्र होता. त्याच्या अकरा भावानी मत्सरबुद्धीने त्याला इजिप्तमधील व्यापाऱ्याना विकले. परंतु तेथे त्याचे नशीब उघडले व तो फारो राजाचा मुख्य प्रधान बनला. पुढे कनानमध्ये दुष्काळ पडल्याने याकोब व त्याचे सगळे गणगोत आणि पुत्रपौत्र इजिप्तमध्ये स्थलांतरित झाले. तेथे योसेफाने त्यांना राजकीय आश्रय दिला. (ख्रिस्तपूर्व १७००). तेथे त्यांचा वंशविस्तार होत गेला. ते हिब्रू भाषा बोलत. आणि त्याच नावाने ते तेथे ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांच्या वाढत्या संख्येची भीती वाटून तत्कालीन फारो राजाने त्यांचे छळसत्र आरंभले.

हिब्रू लोकांनी परमेश्वरी आदेशानुसार मोशेच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची मोहीम सुरू केली. (ख्रिस्तपूर्व १२५०). फारो राजाबरोबर प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर परमेश्वराच्या वरदहस्ताने इजिप्तमधून मायदेशी (कनान देशात) परतण्याची त्यांना परवानगी मिळाली. या अविस्मरणीय घटनेची आठवण म्हणून इजिप्तची सीमा ओलांडण्याआधी त्यांनी 'ओलांडण सण' (पासोव्हर) साजरा केला. त्यांच्या मुक्ततेची स्मृती म्हणून हा सण पाळण्यात येऊ लागला. आजही यहुदी लोक हा सण साजरा करतात. मोशेच्या नेतृत्वाखाली हिब्रू लोकांनी वाळवंटातून मायदेशी प्रयाण केले. पुढे सिनायच्या वाळवंटात सिनाय पर्वतावर मोशेला परमेश्वराकडून दहा आज्ञा मिळाल्या. याच त्या प्रसिद्ध दहा आज्ञा होत. हिब्रू लोकांना या दहा आज्ञा पाळणे बंधनकारक केले गेले. मोशेने परमेश्वरी आदेशाने सीनायच्या वाळवंटात दहा आज्ञाच्या दोन दगडी पाट्या ठेवण्यासाठी कराराचा कोश घडविला. तसेच तो कोश ठेवण्यासाठी फिरते मंदिर (निवासंमंडप - Tabernacle) उभारले. मोशेने परमेश्वराच्या एकत्वावर नेहेमी भर दिला आणि अनेकदेवता पूजनाला व मूर्तिपूजेला कसून विरोध केला. एकेश्वरवाद अनुसरणारा व परमेश्वराच्या निराकार अस्तित्त्वावर विश्वास ठेवणारा त्या काळातील हा एकमेव धर्म होता. हिब्रू लोक जवळपास चाळीस वर्ष सीनायच्या वाळवंटात भटकत होते. वतनभूमीत पोहोचण्याआधीच मोशेचे निधन झाले.

मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा (जोशुवा) याने हिब्रू लोकांना कनानभूमीत नेले. (ख्रिस्तपूर्व १२२० ते १२००) तेथील मूळ लोकांना (कनानी व अन्य सहा जमाती) यांचा नायनाट करून तेथे हिब्रू लोक स्थायिक झाले. देशात शत्रूंना नांदू देणे ही भावी संकटाची नांदी ठरू शकते असे त्या काळी समजले जात होते. हळूहळू हिब्रू लोक एकेश्वरी धर्मापासून दूर जाऊ लागले व कनानी लोकांच्या अनेक देवतांची व मूर्तींची पूजा करू लागले. बैला हे वाहन असलेला 'बेल' हा जननाचा देव होता. तर असिरीयन लोकांची 'इस्तार' ही प्रजोत्पादनाची देवता होती. या देवतांच्या ते भजनी लागले. परदेशी स्त्रियांबरोबर लग्ने करू लागले. मिश्र विवाहामुळे व मूर्तिपूजेमुळे राष्ट्र दुबळे होते अशी धार्मिक नेत्यांची धारणा होती. त्यामुळे या दोन गोष्टीना धर्मपुरुषांनी सतत विरोध केला.

यहोशावानंतर शास्त्यांनी (प्रशासक) इस्रायेलचा कारभार पाहिला (ख्रिस्तपूर्व १२०० ते ख्रिस्तपूर्व १०२५).

एका अर्थाने हे शास्ते लष्करी टोळीप्रमुख होते. अथनीएलपासून शामसोनपर्यंत १२ शास्ते झाले. त्यामध्ये दबोरा ही एक महिला होती. अचाट पराक्रम गाजऊन ती अजरामर झाली.

ख्रिस्तपूर्व १०४० मध्ये शमुवेल या महान संदेष्ट्याचा उदय झाला. आजूबाजूच्या प्रदेशात राजेशाही होती. आपल्यालाही राजा मिळावा असा लोकांनी त्याजकडे आग्रह धरला. तेव्हा त्याने शौल याला राजा म्हणून अभिषेक केला. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ७९०). तो इस्रायेलचा पहिला अभिषिक्त राजा होता. शौल स्वभावाने संशयी आणि मत्सरी होता. त्याचा दुर्दैवाने अंत झाला. शौलच्या मृत्यूनंतर दावीद राजासनावर बसला. त्याने चाळीस वर्ष राज्य केले. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ९७०). त्याने इस्रायेलचा विस्तार केला आणि आजूबाजूच्या सर्व शत्रुराष्टांचा बिमोड केला. त्यामुळे इस्राएल ही प्रबळ सत्ता बनली. त्यानंतर दाविदाचा मुलगा शलमोन हा गादीवर बसला. (ख्रिस्तपूर्व ९७० ते ९३३). तो अतिशय ज्ञानसंपन्न आणि विवेकी होता. त्यानेच जेरुसलेमचे प्रसिद्ध मंदिर बांधले. या दोन्ही राजांनी इस्रायेलला वैभवाच्या शिखरावर नेले.

दुभागलेले राज्य : राजा शलमोनाच्या अखेरीस इस्राएल राज्याला उतरती कळा लागली. त्याच्या मृत्युनंतर (ख्रिस्तपूर्व ९३३) अखंड इस्राएल राज्याची दोन शकले झाली. (इस्राएल आणि यहुदा). इस्रायेलचे दहा वंश एकीकडे (उत्तरेकडील राज्य इस्राएल) तर उरलेले दोन वंश दुसरीकडे (दक्षिणेकडील राज्य यहुदा) अशी या अखंड राज्याची विभागणी झाली. ( ख्रिस्तपूर्व ९३१-७२१). शोमरोन ही उत्तरेकडील इस्राएल राज्याची राजधानी झाली तर जेरुसलेम ही दक्षिणेकडील यहुदा राज्याची राजधानी झाली. दुहीमुळे दोन्ही राज्ये कमकुवत होत गेली. याचा फायदा आजूबाजूच्या शत्रूराष्टानी घेतला. दावीद आणि शलमोन यांनी घालून दिलेल्या चागल्या प्रथा यहुदा राज्याने सुरू ठेवल्या. त्यांनी एकेश्वरवादाचे रक्षण केले. जेरुसलेमचे मंदिर हे त्यांच्या एकीचे प्रतिक बनले. धर्मशास्त्र (तोराह - जुना करार) हा धर्मनियमांचा संग्रह संपादित करण्यात आला. यशया आणि मिखा हे यहुदातील महत्त्वाचे संदेष्टे होते. त्यांनी लोकांना सद्बोध केला.

याउलट परिस्थिती इस्राएल राज्यात निर्माण झाली. तेथील राजे मूर्तीपूजा व अनेक देवतापूजनाच्या नादी लागले. राजा धर्माचा रक्षक राहिला नाही. त्यामुळे ही जबाबदारी संदेष्ट्यानी पार पाडली. एलिया, आमोस, होशेय या संदेष्ट्यानी धर्माचे स्वरूप शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना राज्यसत्तेशी संघर्षही करावा लागला. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये असिरीयन साम्राज्याने इस्रायेलवर स्वारी केली आणि इस्राएली लोकांना बंदिवासात नेले. त्या वेळी इस्रायेलचे हे दहा वंश इतिहासातून नामशेष झाले असे समजले जाते.

ख्रिस्तपूर्व ५९७ मध्ये बाबिलोनचा राजा नाबुखद्रेसर याने दक्षिणेच्या यहुदा राज्यावर स्वारी केली आणि हजारो लोकांना बंदिवान करून बाबीलोनला नेले. ख्रिस्तपूर्व ५८७ मध्ये पुन्हा एकदा स्वारी करून वृद्ध व आजारी वगळता बाकी साऱ्यांना बंदिवासात नेले. याच वेळी त्याने जेरुसलेममधील पहिल्या मंदिराचा (शलमोनाचे मंदिर) विनाश केला. (बाबिलोनियन हद्दपारी ख्रिस्तपूर्व ५८७ ते ५३८).

ख्रिस्तपूर्व ५३८ मध्ये पर्शियाचा राजा सायरस (कोरेश) याने नबुखद्रेजरचा पराभव करून बाबीलोनचे साम्राज्य काबीज केले. सायरसने एक आदेश जारी करून इस्राएली लोकांना मायदेशी परतण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले. त्याने त्यांच्या भग्न मंदिराच्या पुन्हा उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले. सायरसने धार्मिक सामंजस्य आणि आंतरधर्मीय सुसंवाद यांचा आदर्श घालून दिला. (सायरस हा झोरास्तीयन म्हणजे पारशी धर्मीय होता).

ख्रिस्तपूर्व ५३८ ते ३३३ पर्यंत पर्शियन साम्राज्याच्या मांडलीकानी इस्रायेलमध्ये कारभार पाहिला. ख्रिस्तपूर्व ५३७ मध्ये भग्न मंदिराच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ झाला. ख्रिस्तपूर्व ४५८ मध्ये विद्वान धर्मशास्त्री एज्रा याचा उदय झाला. त्याने मोशेच्या धर्मशास्त्राच्या आधारे इस्राएली लोकांचे धार्मिक पुनरुज्जीवन केले.

उत्क़्रुष्ट नेतृत्वगुण असलेला नहेमिया हा पर्शियन राजाच्या सेवेत होता. राजाने त्याला जेरुसलेमचा मांडलिक म्हणून नेमले. त्याने बारा वर्ष (ख्रिस्तपूर्व ४४५ - ४३३) कारभार पाहिला. तो उत्क़्रुष्ट संघटक आणि धर्मसुधारक होता. बंदिवासातून परतलेल्या यहुद्याना त्याने पुन्हा अस्मिता प्राप्त करून दिली. त्यानंतर सुमारे १०० वर्ष फारसे काही घडले नाही. याच काळात मलाखी, ओब्दीया, योएल आणि योना या संदेष्ट्यानी संदेश दिले. तसेच याच काळात इयोब, नितीसुत्रे, गीतरत्न, बहुतेक स्तोत्रे, इस्रायेलचा इतिहास, योना, तोबियस, एज्रा, नहेमिया या पुस्तकांचे लेखन झाले.

 
यहुदी मंदिराच्या जागी उभी असलेली डोम ऑफ द रॉक मशिद - जेरुसलेम (Dome Of The Rock - Jeruslem)[११]

ख्रिस्तपूर्व ३३६ मध्ये थोरला आलेझान्ङर याचा उदय झाला. त्याने ख्रिस्तपूर्व ३३१ मध्ये पर्शियन साम्राज्य काबीज केले. ख्रिस्तपूर्व ३३३ मध्ये आलेझान्ङरने सीरिया प्रांत जिकून घेतला. ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये बाबिलोनमध्ये त्याचे निधन झाले. ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत इजिप्तच्या लाजीदेस घराण्याने यहुदा प्रांतावर राज्य केले. ख्रिस्तपूर्व ६३ ते इसवी सन ३१३ या काळात रोमन लोकांनी या प्रांतावर राज्य केले. याच रोमन लोकांच्या कालावधीत प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला. (इसवी सन अंदाजे ४ ते ६ या दरम्यान). अंदाजे इसवी सन ३३ साली ख्रिस्ताला क्रुसावर चढविण्यात आले. त्यानंतर ख्रिस्ताच्या शिष्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतेक रोमन साम्राज्यात केला होता. इसवी सन ७० साली रोमन लोकांनी जेरुसलेमच्या दुसऱ्या मंदिराचा विनाश केला. आणि बहुतेक यहुदी लोक वेगवेगळ्या देशात विखुरले गेले. इसवी सन ३१३ ते ६३६ या कालावधीत इस्रायेलमध्ये बिझान्टाईन राजवट होती. इसवी सन ५७० साली अरेबिया येथे (मक्का शहरात) महंमद पैगंबर यांचा जन्म झाला. त्याने इसवी सन ६१० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली. इसवी सन ६३६ ते १०९९ या काळात अरब (मुस्लिम) लोकांनी इस्रायेलवर स्वाऱ्या केल्या. त्यांनी जेरुसलेम येथील यहुदी लोकांच्या भग्न मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक (DOME OF THE ROCK) ही मशीद बांधली. (इसवी सन ६९१-६९२) यहुदी आणि इस्लाम यांच्या संघर्षाचे मूळ या ठिकाणी आहे.[१२]

मुस्लिम अरबांच्या पवित्र भूमीवरील (इस्राएल) आक्रमणानंतर बरीचशी ख्रिस्ती तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात गेली होती. ती तीर्थस्थाने अरबांच्या हातून मुक्त करण्यासाठी पोप दुसरे अर्बन यांच्या प्रेरणेने कृसेडरची (क्रुसेडर म्हणजे धर्मयुद्धे) पहिली तुकडी इसवी सन १०९९ साली जेरुसलेमला आली. अरब ख्रिस्ती यांच्यातील घनघोर युद्धामुळे जेरुसलेमची पवित्र भूमी रक्ताने भिजली. जवळपास सात धर्मयुद्ध या काळात लढली गेली. इसवी सन१०९९ ते १२९१ या कालावधीत बेझंटाईन राजांनी येथे राज्य केले.

इसवी सन १२९१ साली मामलुक तुर्कांनी पेलेस्तैनवर विजय मिळविला. त्यांनी इसवी सन १५१६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर आटोमन तुर्क आले. सुलतान सुलेमान याने याच काळात जेरुसलेम शहराभोवती तटबंदी उभारली. ती अजूनही शाबूत आहे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे इसवी सन १९१७ साली हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्यांनी देशोधडीला लागलेल्या यहूद्याना मायदेशी परतण्याची मुभा दिली. परंतु त्यांच्यावर जाचक निर्बंधही लादले. १४ मे १९४८ रोजी इस्रायेलचे स्वतंत्र राष्ट अस्तित्त्वात आले. जवळपास २००० वर्षानंतर जगभर विखुरलेले यहुदी येथे परत येऊ लागले. (इस्रायेलची पुनस्स्थापना).

थोडक्यात ख्रिस्तपूर्व ५८७ पासून इसवी सन १९४८ पर्यंत पालेस्तैनवर बाबिलोनियन, पर्शियन, ग्रीक रोमन, बिझान्तैन, अरब मुस्लिम, क्रुसेडर, मामलुक तुर्क, आटोमान तुर्क आणि ब्रिटिश या अनेकविध सत्तांनी राज्य केले.[१२]

इस्राएलच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे :-

ख्रिस्तपूर्व किवा इसवी सन पूर्व - ( BEFORE CHRIST OR B.C.)

१९५० अब्राहामचा इस्राएल भूमीत (कनान देशात) प्रवेश

१२५० देवाचे मोशेला पाचारण

१२१२ इस्राएल जनतेचा इजिप्तच्या गुलामगिरीतून मायभूमीत (इस्राएल मध्ये) प्रवेश.

१२०० पालेस्तिनी लोकांचा वेढा व त्या काळापासून त्याला पालेस्तइन हे नाव.

११०५ शमुवेल भविष्यवाद्याचा जन्म.

१०२५ इस्रायेलचा पहिला राजा म्हणून शौलाचा राज्याभिषेक.

१००४ दावीद राजाची वैभवशाली कारकीर्द.

९६५ दाविदाचा मुलगा शलमोन याच्या राजवटीचा सुवर्णकाळ. पहिल्या मंदिराची उभारणी.

९२२ इस्रायेलचे विभाजन : इस्राएल व यहुदा अशी दोन राज्ये.

८७५ यशया भविष्यवाद्याचा काळ.

७२१ असिरीयन साम्राज्याकडून इस्रायेलचा पाडाव. इस्राएली जनता पुन्हा गुलामगिरीत.

६२६ यिर्मया भविष्यवाद्याचा काळ

५८७ बाबिलोनी सम्राट नबुखाद्रेजर याजकडून यहुदा राज्याचा अंत. जेरुसलेममधील मंदिराचा विनाश. बाबिलोनमध्ये दास्यत्व.

५३८ पर्शियाचा सम्राट सायरस (कोरेश) बाबिलोन काबीज करतो आणि यहुदी लोकांना मायदेशी परतून जेरुसलेममध्ये मंदिर उभारण्याची परवानगी देतो.

३३४ आलेक्झान्देर द ग्रेंट (सिकंदर) पालेस्तीन काबीज करतो.

६४ पोम्पी पेलेस्तीन जिकून घेतो. (रोमन सत्तेखाली पालेस्तीन).

४० पारथीयन राज्यकर्ते पालेस्तीन सर करतात.

३९ पार्थीयन सैन्याचा पाडाव करून हेरोद पालेस्तीन परत मिळवितो.

इसवी सन पूर्व ४ : प्रभू येशूचा जन्म.

ख्रिस्तजन्मानंतर किवा इसवी सना नंतर (A.D.)

इसवी सन ३० येशूचे क्रूसावरील मरण.

७० रोमन सरदार टायटसं जेरुसलेम नगरी व जेरुसलेमचे मंदिर यांचा नाश करतो. यहुदी पुन्हा हद्दपारीत जातात.

१३५ हेद्रीयन पुन्हा जेरुसलेमचा नाश करून तेथे एलिना कापितोलीना ही नगरी वसवतो.

३३० ते ६३४ सम्राट कॉन्स्टन्टाईनख्रिस्ती धर्म स्वीकारतो व पवित्र भूमीत अनेक ख्रिस्त मंदिरे उभारतो.

इसवी सन ५७० मोहंमद पैगंबर यांचा अरेबियातील मक्का येथे जन्म. त्यांच्या द्वारे इसवी सन ६१० मध्ये इस्लामची (मुस्लिम) धर्माची सुरुवात.

६१४ पर्शियन सम्राट खुस्रो पालेस्तीन काबीज करून अनेक ख्रिस्तमंदिरे जमीनदोस्त करतो.

६३६ पालेस्तीन मुस्लिमांच्या ताब्यात. यरुशलेम मुस्लिमांचेही तीर्थक्षेत्र.

६९१ - ६९२ यरूशलेम मधील भग्न यहुदी मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक मशिदीची उभारणी.

१००९ फातीमिद खालिद ख्रिस्त मंदिरे उध्वस्त करतो. क्रुसेड म्हणलेल्या धर्मयुद्दना चेतावणी.

१०९९ क्रुसेडर जेरुसलेम आपल्या ताब्यात घेतात. व तेथे लाटिन साम्राज्य प्रस्थापित करतात.

१२६३ इजिप्तचा मामेलूक सुलतान संपूर्ण क्रुसेड भूमी ताब्यात घेतो.

१५१७ पालेस्तीन तुर्कस्तानच्या ओटोमान राजवटीच्या ताब्यात.

१९१७ पहिल्या महायुद्धाला सुरुवात.

१९२२ पालेस्तीन ब्रिटिशांच्या सत्तेखाली

१९३९ - १९४५ दुसरे महायुद्ध . ६० लाख यहुद्यांना हिटलरने गॅस चेंबर मध्ये कोंडून ठार मारले.

१९४७ पालेस्तीनची फाळणी : इस्राएल व पालेस्तीन अशा दोन राष्टांची निर्मिती.

१९४८ नवे राष्ट्र म्हणून इस्रायेलचा उदय. यहुदी अरब यांच्यात पहिले युद्ध. (२००० वर्षानंतर इस्रायेलची पुनस्स्थापना १४ मे १९४८)

१९५६ इस्राएल इजिप्त युद्ध

१९६७ अरब व इस्राएल यांच्यात सहा दिवसांचे दुसरे युद्ध. (जेरुसलेमचा ताबा यहुद्यांकडे).

१९७३ अरब इस्राएल यांच्यात १६ दिवसांचे तिसरे युद्ध. ( योम किप्पुर युद्ध).

१९७९ इस्राएल इजिप्त यांच्यात समेट [१३]

नव्या कराराची पार्श्वभूमी :-

१. नव्या कराराच्या काळातील राजकीय परिस्थिती : - येशूच्या जन्माच्या वेळी (अंदाजे इसवी सन ४ च्या दरम्यान) पालेस्तीन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. आणि हेरोद हा रोमन सत्तेचा मांडलिक म्हणून त्या प्रदेशावर राज्य करीत होता. हेरोद कारस्थानी परंतु कर्तव्यदक्ष होता. त्याने अनेक कोट किल्ले बांधले. नगरे वसविली. वास्तू, इमारती उभारल्या. मंदिरे आणि नाट्यशाळा बांधण्यासाठी मुक्तहस्ते आर्थिक मदत केली. जेरुसलेमच्या प्रसिद्ध मंदिराची पुनरबांधणी करून (ख्रिस्तपूर्व २० ते ख्रिस्तपूर्व १०) त्याने यहुद्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हेरोदाचे कौटूबिक जीवन अतिशय दुर्दैवी व अस्थिर होते. त्याला एकूण दहा बायका होत्या. मरियम पहिली ही त्याची आवडती पत्नी होती. परंतु हेरोदाची बहिण सलोमी ही तिला पाण्यात पाहत असे. तिने हेरोदाच्या मनात मरियम विषयी विष पेरले. बहिणीच्या नादी लागून हेरोदाने आपली पत्नी मरियम, तिची आई व आपले दोन पुत्र अरीस्तोबोलास आणि आलेक्झान्दर यांची क्रूर हत्या केली. डोरिस या पत्नीपासून झालेला आपला मुलगा अन्तीपातेर याला त्याने आपला वारस नेमले. परंतु तो आपल्या विरुद्ध कट कारस्थान करीत आहे असा संशय येताच त्याने त्यालाही ठार केले.

येशूचा जन्म झाला (इसवीसन पूर्व ४) तेव्हा आपल्याला प्रतीस्पर्धी निपजला आहे अशा समजुतीने हेरोदाने बेंथलेहेम व आजूबाजूच्या प्रदेशातील जी दोन वर्षांची व त्याहून कमी वयाची बालके होती त्यांचा वध करविला. (पहा नवा करार : मत्तय २ : १६). हेरोदाचा क्रूर स्वभाव पाहता ही गोष्ट खरी असावी यात संशय नाही. कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू अतिशय दुखद आणि वेदनादायक होता. आपल्या मृत्यूनंतर कोणी शोक करणार नाही याची त्याला कल्पना होती म्हणून ' माझा मृत्यू होताच जेरुसलेममधील काही प्रतिष्ठित लोकांना पकडून त्यांची हत्या करावी ' असा आदेश हेरोदाने दिला होता.

नवा करार म्हणजे येशूच्या शिष्यानी आणि श्रद्धा ठेवणाऱ्या समुदायाने मागे ठेवलेला एक मौलिक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. एका महान घटनेचा त्यांनी अनुभव घेतला व तो अनुभव इतरांना मिळावा या उच्च आध्यात्मिक हेतूने त्यांनी शुभवार्तामाने (GOSPELS) लिहिली. निरनिराळ्या सूत्रांकडून जमविलेल्या माहितीची त्यांनी प्रामाणिकपणे मांडणी केली. त्यांनी आपला मजकूर काळजीपूर्वक संपादित केला. हे सर्व लेखन जबाबदार व्यक्तींनी केले आहे. त्या काळात शुभवर्तामानाची अनधिकृत पुस्तकेही (APOCRYPHAL GOSPELS) अस्तित्त्वात आली होती. त्या प्रकारचे लेखन त्यांनी कटाक्षाने टाळले. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या करारातील बहुतेक पुस्तके लिहिली गेली होती.[१४]

शुभवर्तामानाच्या लेखकांनी किबहुना संपादकांनी एकाच बैठकित केलेले हे एकटाकी लेखन नाही. त्यंनी त्या काळी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीची जमवाजमव करून त्यांची जुळवाजुळव केली. तसे करताना सर्वच ठिकाणी कालानुक्रम पाळला गेला आहे असे नाही. सोयीनुसार त्यांनी विषयांची वर्गवारी केली आहे. शैली आणि आशय यांचा अभ्यास केला असता योहानाचे शुभवर्तमान भिन्न स्वरूपाचे आहे असे स्पष्ट जाणवते. मत्तय, मार्क आणि लुक यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी योहानाने वगळल्या आहेत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचे आणि स्थळांचे संदर्भ त्याने दिले आहेत. उदा येशूला अटक केल्यानंतर त्याला प्रमुख याजक हन्नाकडे नेण्यात आले, हे त्यानेच नमूद केले आहे.

२. ख्रिस्तकालीन धार्मिक व सामाजिक व्यवस्था :- प्राचीन यहुदी समाजात प्रारंभी नियमांचे जंजाळ नव्हते. दहाआज्ञा म्हणजे जीवन जगण्यासाठी दिलेली दहा सोपी मुल्ये होती. हळूहळू यहुदी समाजात पुरोहितशाहीचा उदय झाला. धार्मिक नीतीनियमांचे अवडंबर माजले. या नियमांना अनेक फाटे फुटत गेले. त्यांचे कर्मकांड निर्माण झाले. यहुदी धर्मात लहानमोठे असे एकूण ६१६ नियम होते. या नियमांचा अर्थ लावणे ही शास्त्री व परुशी लोकांची मक्तेदारी होती. तसे करताना शब्दाचा भावार्थ समजून घेण्याऐवजी त्यांचा कीस काढण्याची प्ररुत्ती वाढीस लागली. उदा. शब्बाथवार म्हणजे शनिवार पवित्र पाळण्याची व त्या दिवशी कुठलेही काम करू नये अशी आज्ञा दिली गेली गेली होती. मानवाने सप्ताहातील एक दिवस विश्रांती घ्यावी व तो दिवस देवाच्या स्मरणात घालवावा असा उद्देश यामागे होता. मात्र शास्त्री व परुशी यांनी या आज्ञेला कर्मकांडाचे स्वरूप दिले.

शब्बाथवारी काय करावे व काय करू नये यासंबंधी अनेक ग्रंथ रचण्यात आले. शब्बाथवारी श्रम करण्यास मनाई होती. श्रम म्हणजे काय ? किती श्रम करणे धर्मसंमत आहे ? कुठल्या प्रकारचे श्रम वर्ज्य आहेत ? याचे कोष्टक तयार झाले. उदा. शब्बाथवारी दिवा उचलून ठेवता येईल का ? सुईत दोरा ओवता येईल काय ? वडिलांना आपले छोटे बाळ उचलता येईल काय ? अशा शुल्लक प्रश्नाबाबत वादविवाद घडू लागले.

प्रारंभी हे नियम माैखिक स्वरूपात होते. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात ते शब्दबद्ध करण्यात आले. आठशे पृष्ठे असलेला त्रेसष्ट आध्यायांचा एक ग्रंथ रचण्यात आला. त्याला 'मिश्नाह' (Mishna) असे म्हणतात. पुढे या त्रेसष्ट आध्यायांवर आणखी भाष्ये लिहिण्यात आली. त्याला ' तालमूद' (Talmud) म्हणतात. जेरुसलेमच्या तालमुद्चे बारा विशाल छापील ग्रंथ व बाबिलोनच्या तालमुद्चे त्रेसष्ट छापील ग्रंथ आज यहुदी समाजात प्रचलित आहेत.

प्रभू येशू व त्याचे शिष्य धर्माने यहुदी होते. परंतु या धार्मिक कर्मकांडाला येशूचा सक्त विरोध होता. शब्बाथवारी परोपकार किवा चागली कार्ये करण्यास विरोध नसावा असे त्याचे मत होते. त्यामुळे कर्मठ धार्मिक कर्मकांडाला येशूने प्रखर विरोध केला. हे नियम अधिक मानवतावादी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. येशूच्या काळी विविध धार्मिक गट अस्तित्त्वात होते. ख्रिस्तपूर्व १७५ ते ख्रिस्तपूर्व १२५ या काळात यहुदी लोकांची हसिदिम आणि हेल्लेणीस्त अशी विभागणी झाली होती. हसिदिम म्हणजे मोशेच्या धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या श्रद्धाळू यहुदी लोकांचा गट आणि हेल्लेणीस्त म्हणजे ग्रीक संस्कृतीचा अवलंब केलेल्या यहुदी लोकांचा गट होय. परुशी आणि एसेनी हे हसिदिम गटाचे तर सदुकी हे हेल्लेणीस्त गटाचे अनुयायी होते. ख्रिस्ताच्या काळात यहुदी समाजात अस्तित्त्वात असलेले प्रमुख समाजगट खालीलप्रमाणे होते.

परुशी  : - परुशी हा शब्द "पेरीशाया" (Perishaya) या अरेमायिक शब्दावरून प्रचलित झाला. हे यहुदी लोकांचे धार्मिक नेते होते. मोशेच्या धर्मशास्त्रावर आधारित धार्मिक समाज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अस्थिर राजकीय वातावरणात धर्मशास्त्र समाजाला एकत्र ठेऊ शकते अशी त्यांची धारणा होती. ते धर्मशास्त्राच्या पालनाच्या बाबतीत अत्यंत आग्रही होते. त्यामुळे धर्मशास्त्राचे कर्मकांड निर्माण झाले. त्यातील कर्मठ परुशी लोकांबरोबर येशूचे अनेकदा खटके उडाले.[१२]

धर्मशास्त्री : - हे लोक धर्मशास्त्राचे अधिकृत भाष्यकार होते. ग्रीक भाषेत त्यांच्यासाठी " ग्रोमातेउस " आणि हिब्रू भाषेत "सोफेर" हे शब्द वापरले आहेत. दीर्घ प्रशिक्षणानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्याला धर्म शास्त्री म्हणून दीक्षा दिली जात असे. त्यानंतर त्यांना धर्मपंडित म्हणून समजले जात असे. धर्मसभेत (सान्हेन्द्रीन) बसण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत असे. मान सन्मानासाठी ते अनेकदा हपापलेले असत. त्यामुळे येशूने अनेकदा त्यांची कानउघडणी केली होती.

सदुकी : - पालेस्तीन मधील श्रीमंत लोकांचे प्रतीनिधित्व करणारा हा धर्मगुरूंचा एक गट होता. योहान हिकार्नस (ख्रिस्तपूर्व १३४ - १०४) याच्या कारकिर्दीत हा गट उदयास आला. समाजातील श्रीमंत लोकांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. ते स्वतःला जुन्या करारातील त्सादोक (Zadok) या याजकाचे उत्तराधिकारी समजत. यावरून त्यांना सदुकी हे नाव मिळाले. ( त्सादोक या हिब्रू शब्दाचा अर्थ नीतिमान असा आहे.). या पंथावर ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. मृतांचे पुनरुत्थान आणि देवदूतांचे अस्तित्त्व यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांच्यात आणि परुशी लोकात सतत खटके उडत. इसवी सन ७० नंतर सदुकी पूर्णपणे नामशेष झाले.

एसेनी : - हा आधात्मिक यहुदी लोकांचा एक गट होता. एसीन या शब्दाचा अर्थ धार्मिक वृत्तीचे असा आहे. हे इस्राएली लोक ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बाबिलोनहून पालेस्तीनला परत आले. मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर कुम्रान येथे वाळवंटात त्यांनी वस्ती केली. नव्या करारात त्यांचा संदर्भ येत नाही कारण पारंपारिक यहुदी समाजापासून हे लोक अलिप्त राहत. जेरुसलेममधील मंदिर, तेथील पारंपारिक उपासना, बलिदान इत्यादी गोष्टी ते नाकारीत. मात्र पवित्र शास्त्राच्या (जुना करार किवा हिब्रू बायबल) अभ्यासाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी लिहिलेल्या जुन्या करारातील अनेक पुस्तकांच्या तसेच त्यांच्या पंथीय साहित्याच्या प्राचीन हस्तलिखित प्रती १९४८ साली कुम्रान येथील गुहेत सापडल्या आहेत. (पहा : मृत सागर गुंडाळ्या किवा Dead Sea Scrolls).

झेलोट : - येशूच्या काळी पालेस्तीन मध्ये झेलोट (Zealot) नावाचा अतिरेकी राष्टवाद्यांचा गट अस्तित्त्वात होता. रोमन लोकांशी सशत्र प्रतिकार करण्यासाठी पहिल्या शतकाच्या प्रारंभी हा जहाल गट अस्तित्त्वात आला. येशूच्या बारा शिष्यापैकी शिमोन हा या गटाचा पूर्वाश्रमीचा सभासद होता.

शोमरोनी लोक : - मत्तय, लुक आणि योहान यांच्या शुभवर्तामानात शोमरोनी लोकांचा संदर्भ येतो. कर्मठ यहुदी व शोमरोनी लोक यांच्यात हाडवैर होते. धार्मिकदृष्ट्या कर्मठ यहुदी या लोकांना पाखंडी व मिश्र रक्ताचे समजत व त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवीत नसत. आज इस्रायेलमध्ये केवळ ३५० शोमरोनी उरले आहेत. शोमरोनी लोकांचे गिरीझिम पर्वतावर एक वेगळे मंदिर होते.

हेरोदीयन लोक : या नावाचा संदर्भ मार्क आणि मत्तय यांच्या शुभवर्तमानात येतो. हेरोडाच्या निष्ठा वंत सैनिकांचा किंवा घरघूती रक्षकांचा हा एक गट होता . येशूला ठार करण्यासाठी त्यांनी परुशी लोकांबरोबर संगनमत केले होते.

येशूचे जीवनकार्य : येशूच्या जन्मापासून इसवी सन ही काल गणना सुरू झाली. इसवी सन या कॅलेंडर (किंवा पंचांग ) याची सुरुवात इसवी सन ५२५ मध्ये एक मठवासी धर्मगुरू डायनेशियस एग्झिगस याने केली. त्या वेळी रोमन कॅलेंडर (किंवा पंचांग ) प्रचलित होते. डायनेशियस एग्झिगस याने रोमन वर्ष ७५४

संदर्भ

  1. ^ a b फादर फिलीप वाझ. (बायबल परिचय) पान क्रमांक १.
  2. ^ फादर फ्रान्सिस दिब्रिटो. (सुबोध बायबल) पान क्रमांक ३१.
  3. ^ फादर फ्रान्सिस दिब्रिटो. (सुबोध बायबल) पान क्रमांक २२.
  4. ^ फादर फ्रान्सिस दिब्रिटो. (सुबोध बायबल ) पान क्रमांक २३.
  5. ^ रेव्ह. एम. आर. सोज्वळ. (पवित्र शास्त्राचा साथी).
  6. ^ फादर फ्रान्सीस दिब्रिटो  : पान क्रमांक २४. (सुबोध बायबल).
  7. ^ पृष्ठ क्रमांक ३७३. (पवित्र शास्त्र शब्दकोश) -.
  8. ^ एम. आर. सोज्वळ. (पवित्र शस्त्राचा साथी ).
  9. ^ फादर फ्रान्सिस दिब्रिटो. (सुबोध बायबल).
  10. ^ सुबोध बायबल (फादर फ्रान्सिस दिब्रिटो) पान क्रमांक ४४/४५.
  11. ^ https://www.lds.org/media-library/images/mount-sinai-egypt-moses-1244104?lang=eng. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ a b c सुबोध बायबल (फादर फ्रान्सिस दिब्रिटो).
  13. ^ इस्राएल (फादर फ्रान्सिस कोरिया).
  14. ^ सुबोध बायबल (फादर फ्रान्सीस दिब्रिटो).