इस्लाम धर्म
इस्लाम धर्म हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे 190 कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या 24.4 टक्के) आहे. लोकसंख्येनुसार (ख्रिश्चन धर्मांनंतर) जगातील हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील 20 कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. मुस्लिम किंवा मुसलमान म्हणजे इस्लामिक धर्माचे अनुयायी.[१]
मुसलमानांचा असा विश्वास आहे की त्यांचा पवित्र कुरआन हा देवाचा संदेश आहे ज्यांचा अर्थ प्रेषित मुहंमद (स) यांच्याकडे आहे.आपण विचारू शकतो की, एक धर्म आहे जो देवाच्या एकतेला आणि मानवजातीच्या एकतेला शिकवते, आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे? हे नक्कीच इस्लामचे शिक्षण आहे. खरं तर, इस्लामचा असा अर्थ आहे की ईश्वराच्या एकतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा हा मूळ संदेश आहे. जो अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविले. इस्लाम देवाच्या एकतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करते. मुसलमान त्यांचे धर्म इस्लामला संबोधतात आणि अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय. मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेला एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून स्वतःमध्ये शांती आहे. इस्लामवासी एक, चिरंतन देवावर विश्वास ठेवतात, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आहे आणि अस्तित्वात असलेले सर्व. अरबीमध्ये, देव अल्लाह म्हणून ओळखला जातो. पवित्र कुरान हे इस्लामचे उघड आणि पवित्र शास्त्र आहे
इस्लाम शिकवणूकसंपादन करा
इस्लाम शिकवणूक असी आहे की मनुष्य शुद्ध आणि निर्दोष जन्माला येतात. कोणीही इतरांच्या पापांची जबाबदारी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. क्षमाशीलतेचे दरवाजे नेहमीच उघडतात ज्यांनी पश्चात्ताप केला आहे.
इस्लामची तत्त्वेसंपादन करा
- अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
- मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
- दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
- आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
- आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)
कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे शरणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी कुरआन उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुरआन व मुहंमद पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहंमद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज यहुदी व ख्रिस्ती धर्मा या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शिया व सुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहंमद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्त चौथ्या खलीफाला मानणारे शियापंथीय बनले.
इस्लामवरील पुस्तकेसंपादन करा
- इस्लाम ज्ञात आणि अज्ञात (अब्दुल कादर मुकादम)
- इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम (प्रा. फकरुद्दीन बेन्नूर)
- इस्लाम एक ऐतिहासिक शोध (मूळ लेखक डॉ. मोहम्मद युनूस, मराठी अनुवाद-मृदुला देशपांडे)[२]
- आधुनिक जगाचा इस्लाम (डाॅ. असगरअली इंजिनिअर)
- इस्लाम आणि शाकाहार (मुजफ्फर हुसैन)
- इस्लाम का पैगाम (हिंदी, विनोबा भावे)
- इस्लामचे अंतरंग (डाॅ. श्रीरंग गोडबोले)
- इस्लामचे ऐतिहासिक योगदान (मूळ इंग्रजी लेखक - मानवेंद्रनाथ रॉय; मराठी अनुवाद - फ्रा. सुभाष भिंगे)
- इस्लामचे धर्मनिष्ठ खलीफा (मूळ लेखक डाॅ. माजिद अली खान; मराठी अनुवाद - डाॅ. मीर इसहाक शेख)
- इस्लामचे विचारवैभव (अनिस चिश्ती)
- इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन (मुजफ्फर हुसैन)
- Islam - Maker of the Muslim Mind (शेषराव मोरे)
- इस्लाम - समज आणि गैरसमज (प्रभा श्रीनिवास)
- इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात (मूळ इंग्रजी लेखक - डॉ. शरद हेबाळकर; मराठी अनुवादक - डाॅ. सच्चिदानंद शेवडे)
- इस्लामी संस्कृती (साने गुरुजी)
- ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा (निळू दामले)
- गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (मूळ लेखक-महमूद ममदानी, मराठी अनुवाद-मिलिंद चंपानेरकर)[३]
- जिहाद : निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धान्त (अनुवादित; मूळ लेखक - सुहास मजुमदार, सहअनुवादक - शरद मेहेंदळे, डाॅ. श्रीरंग गोडबोले )
- धास्तावलेले मुसलमान (दादूमिया)
- भारतीय मुसलमान : शोध आणि बोध (सेतुमाधवराव पगडी)
- भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास : १८५८ ते १९४७ (मूळ पुस्तक The Indian Muslims लेखक - राम गोपाल; मराठी अनुवाद - कमल पाध्ये)
- मध्ययुगीन मुस्लिम विद्वान (सरफराज अहमद)
- महात्मा आणि मुसलमान (प्रा. यशवंत गोपाळ भावे)
- मुस्लिम मनाचा शोध (शेषराव मोरे)
- मुस्लीम जगत-एक दृष्टिक्षेप (डाॅ.प्रमोद पाठक)
- मुस्लीम बलुतेदार (तमन्ना इनामदार)
- मुस्लीमद्वेष मोहीम : वस्तुस्थितीच्या शोधात (स.मो. दहिवले)
- मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत (विलास सोनवणे)
- सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान (रफिक झकेरिया)