सरफराज अहमद (लेखक)
सरफराज अहमद महाराष्ट्रातील महत्त्वाचे इतिहास अभ्यासक आहेत. ते मध्ययुगीन इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] त्यांनी आत्तापर्यंत ५ पुस्तके लिहिली आहेत. तर काही पुस्तकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. सफराज अहमद हे मराठीत लिहिणारे लेखक आहेत.[२] मराठीशिवाय ते हिंदी, उर्दू आणि इंग्रजीतही लेखन करतात.
सरफराज अहमद | |
---|---|
जन्म |
५ नोव्हेंबर, इ.स. १९८३ सोलापूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
सरफराज अहमद बहुचर्चित हैदर अली टिपू सुलतान स्थापित सल्तननत ए खुदादाद या पुस्तकाचे लेखक आहेत. आत्तापर्यत या पुस्तकाचे पाच आवृत्त्या प्रकाशित झालेले आहे. २०१८ साली पुण्यातील डायमंड प्रकाशनाने याची बहुचर्चित पाचवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.[३] मध्ययुगीन मुस्लिम विद्वान हे त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले महत्त्वाचे पुस्तक आहे. ते मुक्तशब्द, परिवर्तनाचा वाटसरू, साप्ताहिक शोधन, सत्याग्रही विचारधारा, नजरिया, अक्षरनामा[४] इत्यादी सामिक व वेबपोर्टलवर नियमित लेखन करतात. मध्ययुगीन इतिहासाचे वस्तुनिष्ठ लेखन व्हावे व इतिहास अभ्यासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी सोलापूरला ॲड. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरची स्थापना केली आहे. स्थापनेपासून ते संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.[५]
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
प्रकाशित पुस्तके
संपादन- इतिहासाशी इमान आहे कुठे? (२०१३)
- भारतीय इतिहासलेखन विपर्यास (२०१४)
- मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास (२०१४)
- सल्तनत-ए-खुदादाद (टिपू सुलतान याच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर संशोधनपूर्वक लिहिलेला ग्रंथ). (२०१५)
- मध्ययुगीन मुस्लिम विद्वान (२०१८)
- सामाजिक समतेचा प्रवाह (२०१९) [६]
- ^ TwoCircles.net. "How a research centre in Solapur is trying to remind Indians of their common, secular history – TwoCircles.net" (इंग्रजी भाषेत). 2019-11-25 रोजी पाहिले.
- ^ "'मुस्लिमांनी वर्तमानासह इतिहासाचेही आकलन भक्कम करावे'". 2019-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Samajik Samatecha Pravah : Prof. Fakrooddin Bennur Smrutigrantha: Buy Samajik Samatecha Pravah : Prof. Fakrooddin Bennur Smrutigrantha by Dr. Suryanarayanan Ransubhe, Prof. Fakrooddin Bennur at Low Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-25 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "अयोध्येत राममंदिर पाडून बाबरी मसजिद बांधल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासाच्या साधनात कुठेच आढळत नाही!". www.aksharnama.com. 2019-11-25 रोजी पाहिले.
- ^ "इक्बालांचे चिंतन". 2019-11-25 रोजी पाहिले.
- ^ TV9 Marathi, [https://www.youtube.com/watch?v=dPcKSpmxwtc पà¥�णे | महाआघाडीचे चेहरा बहà¥�मतानं ठरेल : सà¥�शीलकà¥�मार शिंदे-TV9], 2019-01-22 रोजी पाहिले replacement character in
|title=
at position 6 (सहाय्य)