मुजफ्फर हुसैन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मुजफ्फर हुसैन (२० मार्च, १९४५:बिजोलिया, राजस्थान - १३ फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र)हे एक मराठी विचारवंत पत्रकार आणि लेखक होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे विविध भाषांतील वृुत्तपत्रांकरिता त्यांनी लेखणी चालवली.
मुजफ्फर हुसैन यांचे वडील राजवैद्य होते. राजस्थानातील संस्थानी राजवट संपल्यावर त्यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील नीमच येथे आले. तेथील काॅलेजातून त्यांनी उज्जैन विश्वविद्यालयाची पदवी घेतली आणि एल्एल.बी.साठी ते मुंबईत आले. लाॅ काॅलेजात असतानाच त्यांचा कल पत्रकारितेकडे वळला.
मुजफ्फर हुसैन यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा
- अल्पसंख्याक वाद : एक धोका
- इस्लाम आणि शाकाहार
- इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन
- धुमसती मुंबई
- लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान
(अपूर्ण)
पुरस्कारसंपादन करा
- पद्मश्री (२००२)