असगरअली इंजिनिअर
असगरअली इंजिनिअर (जन्म : सालुंबर-राजस्थान, १० मार्च १९३९; - सांताक्रुझ-मुंबई, १४ मे, २०१३) हे एक सुधारणावादी भारतीय लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि इस्लामचे उदारमतवादी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध होते. उदारमतवादी इस्लामच्या मांडणीसाठी ते जगभर ख्यातकीर्त होते. बोहरा धर्मगुरूविरोधात बंड करून त्यांनी बोहरी पंथीयात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठी चळवळ राबवली. त्यांनी प्रोग्रेसिव्ह दाऊदी बोहरा चळवळीचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात डॉ. मोईन शाकीर आणि प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी काम केले. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मुस्लिम ओबीसी चळवळीत ते बराच काळ सक्रिय होते. मराठी मुसलमानांच्या जातिपाती त्यांनी देशभरात नेल्या. मुस्लिम ओबीसी चळवळीतून जातआधारित मराठी मुसलमानांची रचना करून समाजासाठी शासकीय सवलतीची मागणी करण्यात आली. असगरअली इंजिनिअरमुळे मराठी मुसलमानांचे प्रश्न देशपटलावर आले. त्यातूनच उत्तरेत पसमांदा आंदोलन उभे राहिले.
पार्श्वभूमी
संपादनअसगरअली व्यवसायाने ते इंजिनिअर होते. मुंबई महापालिकेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठी सन १९७२ साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ समाजकार्य स्वीकारले. १९८०मध्ये त्यांनी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी आणि सेक्युलॅरिझम'ची स्थापना केली. १९८०पासून त्यांनी ‘द इस्लामिक परस्पेक्टिव्ह’ या नियतकालिकात लेखन सुरू केले. भारत आणि दक्षिण आशियातील सांप्रदायिक आणि सांप्रदायिक आणि जातीय हिंसाचारावर त्यांनी विषेश कार्य केले आहे. दंगली संपुष्टात आणण्यासाठीचे विशेष माॅड्यूल त्यांनी विकसित केले होते. इस्लामच्या शांती संदेशावर व सांप्रदायिक सौहार्दावर त्यांनी जगभर व्याख्याने दिली.इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांची एकूण ५२ पुस्तके प्रकाशित झाली.. धार्मिक सलोख्यासाठी त्यांना १९९०मध्ये ‘दालमिया’ पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना तीन मानद डॉक्टरेट्सनेही सन्मानित करण्यात आले आहे. असगरअली इंजिनिअर यांनी जगभर विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. २०११मध्ये ‘अ लिव्हिंग फेथ : माय क्वेस्ट फाॅर पीस, हार्मनी अँड सोशल चेंज’ या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले होते. या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद मे २०१३ साली 'लिव्हिंग फेथ' प्रकाशित झाला. माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे.
प्रकाशित पुस्तके
संपादन- आधुनिक जगाचा इस्लाम (२०१०)
- ‘अ लिव्हिंग फेथ : माय क्वेस्ट फाॅर पीस, हार्मनी अँड सोशल चेंज’ (अात्मचरित्र, मराठी, २०१३)
- ओरिजन अँड डेव्हलपमेंट ऑफ इस्लाम : अन् एस्से ऑन इट्स सोशियो इकोनॉमिक ग्रोथ (१९९०)
- सुफीझम अँड कम्युनल हार्मनी
- Islam and Its Relevance to Our Age. Published by Institute of Islamic Studies, 1984.
- On developing theory of communal riots. Published by Institute of Islamic Studies, 1984.
- Islam and Revolution. Published by Ajanta Publications, 1984.
- Islam and Muslims: a critical reassessment. Published by Printwell Publishers, 1985.
- Islam in South and South-east Asia. Published by Ajanta Publications, 1985. ISBN 81-202-0152-3.
- Indian Muslims: A Study of Minority Problems in India. Published by Ajanta Publications (India), 1985.
- Communalism in India, by Asgharali Engineer, Moin Shakir. Published by Ajanta Publications (India), 1985. ISBN 81-202-0153-1.
- The Role of minorities in freedom struggle. Institute of Islamic Studies (Bombay, India). Published by Ajanta Publications, 1986.
- Ethnic conflict in South Asia. Published by Ajanta Publications, 1987.
- Status of women in Islam. Published by Ajanta Publications (India), 1987. ISBN 81-202-0190-6.
- The Shah Bano controversy, Orient Longman, 1987. ISBN 0-86131-701-7.
- The Muslim communities of Gujarat: an exploratory study of Bohras, Khojas, and Memons. Published by Ajanta Publications, 1989. ISBN 81-202-0220-1.
- Religion and Liberation. Published by Ajanta Publications (India), 1989. ISBN 81-202-0264-3.
- Communalism and communal violence in India: an analytical approach to Hindu-Muslim conflict. Published by Ajanta Publications (India), 1989.
- Communal Riots in Post-independence India. Published by Orient Blackswan, 1991. ISBN 81-7370-102-4.
- Secular crown on fire: the Kashmir problem. Published by Ajanta Publications, 1991. ISBN 81-202-0311-9.
- Mandal Commission controversy. Published by Ajanta Publications, 1991. ISBN 81-202-0312-7.
- Rights of Women in Islam. Sterling Publishers, 1992.
- Communalisation of politics and 10th Lok Sabha elections, by Asgharali Engineer, Pradeep Nayak. Published by Ajanta Publications, 1993.
- The Bohras. South Asia Books, 1994. ISBN 0-7069-7345-3.
- Kerala Muslims: a historical perspective. Published by Ajanta Publications, 1995.
- Lifting the veil: communal violence and communal harmony in contemporary India. Sangam Books, 1995. ISBN 81-7370-040-0,.
- Problems of Muslim Women in India. Published by Institute of Islamic Studies, 1995.
- Rethinking Issues in Islam. Sangam Books Limited, 1998. ISBN 0-86311-768-6.
- Competing nationalisms in South Asia: essays for Asghar Ali Engineer, by Paul R. Brass, Achin Vanaik, Asgharali Engineer. Published by Orient Blackswan, 2002. ISBN 81-250-2221-X.
- Islam in India: The Impact of Civilizations. Shipra Publications, 2002. ISBN 81-7541-115-5.
- The Gujarat Carnage. Orient Longman, 2003 ISBN 978-81-250-2496-5.
- The Qurʼan, women, and modern society. Published by New Dawn Press Group, 2005. ISBN 1-932705-42-2.
- The State in Islam: Nature and scope. Hope India Publications, 2006. ISBN 81-7871-102-8.
- Islam in Contemporary World. Sterling Publishers, 2007. ISBN 1-932705-69-4.
- Islam in Post-Modern World. Hope India Publications, 2009.