मरियम जीना, पूर्वाश्रमीचे नाव रतनबाई पेटिट (फेब्रुवारी २०, इ.स. १९०० - फेब्रुवारी २०, इ.स. १९२९) ही पाकिस्तानचे जनक महंमदअली जीना यांची दुसरी पत्नी होती. यांचा जन्म मुंबईच्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात झाला. वयाच्या १८व्या वर्षी यांनी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या महंमदअलींशी प्रेमविवाह केला.

मरियम जिन्ना

रतनबाई यांची महंमदाली जीनांशी पहिली भेट दार्जिलिंग येथे एका कौंटुंबिक सहलीदरम्यान झाली. जीना हे रतनबाई यांच्या वडिलांचे मित्र म्हणून या सहलीत सहभागी झाले होते. रतनबाई यांच्या वडिलांना रतनबाई व जीना यांच्या प्रेमाची बातमी कळल्यावर त्यांनी या गोष्टीस विरोध केला. त्यावेळी रतनबाई यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी होते. रतनबाईच्या वडिलांनी जीना यांनी त्यांना भेटू नये असा बंदीहुकूम मिळवला. रतनबाई १८ वर्षांच्या झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांचे घर सोडून जीनांबरोबर विवाह केला. यावेळी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला व त्यांचे नाव बदलून मरियम असे ठेवले गेले.

काही काळानंतर मरियम आणि जीना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. इ.स. १९२८ मध्ये मरियम जीनांपासून वेगळ्या राहायला लागल्या. त्यांना आंत्रदाहाचा[] आजार होता. त्यासाठी त्या वेदनाशामक म्हणून मॉर्फिन घेत असत. फेब्रुवारी, इ.स. १९२९ मध्ये मॉर्फिनच्या अतिसेवनामुळे मरियम यांचा मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  • फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट; लॅरी कॉलिन्स, डॉमिनिक लापायर (१९७६); विशाल पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली, पृ. २२४-२२५
  1. ^ आंत्रदाह (इंग्लिश: Ulcerative colitis, अल्सरेटिव्ह कोलायटिस)