विकिपीडिया:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?

वस्तुत: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अनुसार 'शुद्ध’ नव्हे, ‘प्रमाण’ लेखन - लेखनाच्या बाबतीत सर्वत्र आणि विशेषत: अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात प्रमाण लेखनाला शुद्धलेखन संबोधले जाते. त्याऐवजी प्रमाण लेखन असे संबोधण्यात येईल, असे म्ह्टले आहे. म्हणजे प्रमाण लेखन आणि प्रमाणेतर लेखन अशी शब्द योजना उपयोगात आणणे अभिप्रेत असावे.यातूनही काही प्रश्न निर्माण होतातच. जसे - प्रमाणलेखन म्हणताना कोणती भाषा प्रमाण मानायची? पुण्यात बोलली जाणारी, की महाराष्ट्रात अन्यत्र बोलली जाणारी? याचा निर्णय लावणे कठीण आहे; परंतु शुद्धलेखन या शब्दामागे अमंगल,अपवित्र असा अर्थ अभिप्रेत नाही. या शब्दाचा कोशगत अर्थ पाहिला, तर तो 'लेखनविषयक नियमानुसार केलेले लेखन'असाच आहे, त्यामुळे सर्वत्र वापरात असलेला शुद्धलेखन हा शब्द चुकीचा समजणे गैर आहे.

विशिष्ट ठिकाणचे अशुद्धलेखन नजरेस आणावयाचे असेल तर 'विशिष्ट ठिकाणचे अशुद्ध लेखन' येथे जा व तशी नोंद करा किंवा शुद्धलेखनाचे महत्व येथे जा. खाली दिलेली तार्किक उत्तरे तुमच्या मनातील भावनिक उद्रेकाचे किती समाधान करतील याची शाश्वती नाही; आपल्याला ह्या प्रश्नाच्या तार्किक चर्चेपेक्षा जर आपण लेखनात दुरुस्ती करून शुद्ध करून देणारे उत्साही मराठी बांधव असाल आणि मराठी विकिपीडियाचा अशुद्धलेखनाचा भार हलका करावयास हातभार लावायचा असेल तर, आपल्याला मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे? हा लेख वाचा.शुद्धलेखनविषयक मराठी विकिपीडियातील कोणताही लेख आपले समाधान करू शकला नसेल आणि आपल्याला काही वेगळे मांडायचे असेल तर ते 'माझ्या प्रश्नाचा रोख' येथे स्पष्ट करावे.

मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?

संपादन

या लेखाचा उद्देश अशुद्धलेखनाचे समर्थन असा नाही तर अशुद्धलेखन का घडते आहे याच्या कारणांची मीमांसा करणे हा आहे. विकिपीडिया मूलत: हे गृहीत धरते की प्रत्येकाकडे काहीनाकाही ज्ञान आहे आणि विकिपीडिया हे प्रत्येकास सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे एक मुक्त स्थळ आहे.

समाजात तुमच्या अवतीभवती ज्या टक्केवारीने अशुद्धलेखन होते त्याच टक्केवारीने विकिपीडियात होते. विकिपीडिया हा अशुद्धलेखनाचा स्रोत नाही. मराठी विकिपीडियास शुद्धलेखन चांगले ठेवून दर्जा चांगला घडवून हवा आहे. विकिपीडियात दिसणारे अशुद्धलेखन हे मुख्यत: दोन प्रकारे होते. पहिले लेखनातील चुका, दुसरे मराठी लिहिणार्‍या संगणक प्रणालीशी वापरकर्त्याचा पूर्ण परिचय झालेला नसल्यामुळे काही सुविधा उपलब्ध असून त्यांची कल्पना नसणे, तसेच बर्‍याचदा काही संगणकप्रणाली हिंदी भाषेस समोर ठेवून बनलेल्या असल्यामुळे मराठीकरिता आवश्यक अश्या काही सुविधांची कमतरता असणे. अजून एक महत्त्वाची अडचण म्हणजे विकिपीडिया संपादनाकरिता विकिची एक स्वत:ची विकिभाषाप्रणाली आहे. तिच्यात कळफलकावरील विविध सोप्या चिन्हांचा उपयोग केला जातो. हीच चिन्हे मराठी लिहिणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये वापरलेली असली तर तांत्रिक असुविधेमुळे किंवा त्याबद्दलच्या अनभिज्ञतेमुळेसुद्धा शुद्धलेखनाचे प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह वेगवेगळ्या विभागातून करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशुद्धलेखन म्हणजे काय?

संपादन

अशुद्धलेखन म्हणजे काय? जे लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध समजले जात नाही ते लेखन म्हणजे अशुद्धलेखन. मराठी शुद्धलेखनाचे काही टप्पे आहेत. मराठी शुद्धलेखन या संकल्पनेचे एक मूळ संस्कृतातील पाणिनी व्याकरणाला मानले जाते. पाणिनीच्या व्याकरणानंतर जे त्या व्याकरणाच्या नियमात बसते ते शुद्ध आणि बसत नाही ते अशुद्ध हा स्वाभाविक नियम बनला. अशा स्वरूपाच्या व्याकरण व्यवहाराला आदेशात्मक व्याकरण म्हणले जाते."मराठी व्याकरण"च्या व्याकरणकार लीला गोविलकर यांच्या मते शुद्धलेखनाचे सार्वजनिक व्यवहारात महत्त्व आहे, पण फक्त आदेशात्मक व्याकरण म्हणजे भाषेचे व्याकरण नव्हे; आणि व्याकरणविषयक नियम शिकून शुद्धलेखन जमतेच असेही नव्हे.

'मराठी लेखन-कोशा'त कोशकार अरुण फडके पान ४४ वर दाखवून देतात की महामंडळाने घालून दिलेले शुद्धलेखनविषयक नियमही सर्वबाजूने परिपूर्ण नाहीत. ते म्हणतात "शुद्धलेखन आणि आजची परिस्थिती: शिक्षण, लेखन आणि मुद्रितशोधन या तीन घटकांचा शुद्धलेखनविषयक परिस्थितीचे बरे-वाईट करण्यात मोठा वाटा असतो..., महामंडळाच्या शुद्धलेखन नियमांपैकी मर्यादित नियमच शाळा व महाविद्यालय स्तरावर शिकवले जातात...,मुळात महामंडळाचे हे १८ नियम अपुरे पडतात,त्यात पुन्हा जे आहेत ते सगळे शैक्षणिक आयुष्यात कधी शिकवले जात नाहीत. अशा परिस्थितीत समाजाकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे..लेखन आणि मुद्रितशोधन या दोन बाबींचा विचार एकत्रितपणे करता येईल..लेखक व मुद्रितशोधक दोघेही गेल्या विसेकवर्षात शिक्षण घेतलेले असतील तर या दोघांचे शुद्धलेखन चांगले नसण्याचीच शक्यता जास्त असते... या परिस्थितीत 'दोष ना कुणाचा' हे मान्य केले तरी 'पराधीन' मात्र आत्ताची आणि येणारी पिढी आहे."(संदर्भ:मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान १९)

डॊ.लीला गोविलकर पुढे म्हणतात "मराठी भाषा ही इंग्रजी-संस्कृत पेक्षा वेगळी भाषा आहे‌. संस्कृत-इंग्रजी व्याकरणांचा प्रभाव मराठी भाषेच्या व्याकरणाचे वेगळे व्यक्तिमत्त्व दाबून टाकू पहातो."*...व्याकरणाने भाषेतील एकाच रूपाला मान्यता देणे म्हणजे भाषेच्या विविधतेला,तिच्या स्वाभाविक विकासाला अडथळा करण्या सारखे आहे....त्यामुळे धड ना आदेशात्मक, धड ना वर्णनात्मक अशी मधली-मधली स्थिती या व्याकरणांची झाली आहे व त्यामधूनच शुद्धाशुद्धबद्दल मते मांडली गेली आहेत.

शुद्ध व अशुद्ध हे शब्द या गोंधळात भर घालणारे आहेत....प्रत्येक भाषेमध्ये नियम तयार होत असतात...पाळले जात असतात...वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत की उजव्या यांच्या संबधीच्या नियमांसारखे आपणच ठरवलेले असतात... 'ने' हा शुद्ध 'णे' हा प्रत्यय वाईट असे नसून त्याचा प्रसार किती व कोणत्या समाजामध्ये या गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात... शुद्धाशुद्धाचा विचार करताना डॉ. ग्रामोपाध्ये म्हणतात,की भारतामध्ये व्याकरणशास्त्राची सुरुवात झाली, ती अपभ्रष्ट शब्दांपासून संस्कृत शब्द वेगळे ठेवण्याच्या कल्पनेमधून; म्हणजे शुद्धाशुद्धाच्या दृष्टिकोनातून होय..(पान३४) (ह्या ग्रंथातील ऊहापोह अत्यंत सविस्तर आणि वाचनीय आहे. मराठी व्याकरणविषयाची गोडी असलेल्या व्यक्तींनी वाचावाच असा ग्रंथ आहे)

वस्तुत: मराठी भाषेच्या आद्य मोडी लिपीत अक्षरांच्या गोलाकार सुबकतेला महत्त्व होते परंतु र्‍हस्व-दीर्घ आणि व्याकरणशुद्धतेबद्दल फारसे महत्त्व नव्हते. छपाईयंत्राच्या वापरापासून देवनागरी लिपीचा वापर सुरू झाला. मराठीचे शालेय शिक्षण व छपाईकरिता लागणारी ब्रिटिश शासनाची मान्यता देणारा ब्रिटिश आधिकारी मेजर कँडी हा शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल आत्यंतिक आग्रही होता. पुण्यातील उच्चभ्रू किंवा सभ्य व्यक्तींचे मराठी उच्चार ती प्रमाण मराठी असे त्याचे मत होते. तत्कालीन प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांनासुद्धा भिन्न मते असलेले स्वत:चे मराठी व्याकरणविषयक पुस्तक फक्त स्वत:च्याच खर्चाने नव्हे तर शासकीय रोषाची भीती स्वीकारून प्रसिद्ध करावे लागले होते.

मराठी शुद्ध/अशुद्धलेखनाचा इतिहास

संपादन

...पेशवे कालापर्यंत आणि नंतरही मराठीचे गद्यलेखन मोडी लिपीत करण्याचा प्रघात होता.मोडी लिपीत विरामचिन्हांचा वापर करण्याची पद्धतच नव्हती....'ई'काराचे लेखन दीर्घ करायचे आणि 'उ'काराचे लेखन र्‍हस्व करायचे असा संकेत होता....मुद्रण सुरू झाल्यापासून पहिल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये लेखकांनी बरेच स्वातंत्र्य घेतलेले दिसते.पण इ.स. १८४७ मध्ये मेजर कँडी हा ब्रिटिश अधिकारी शिक्षणखात्याचा प्रमुख बनल्यापासून सर्वच चित्र पालटले...सर्व अधिकार मेजर कँडीकडेच असल्यामुळे तो सांगेल त्या प्रमाणे लेखकांना आपल्या पुस्तकात लेखनाच्या व व्याकरणाच्या दुरुस्त्या कराव्या लागत, ज्यांना हे मान्य नव्हते त्यांची पुस्तके मंजूर होत नसत. त्यामुळे कित्येक लेखकांनी आपल्या मनाविरुद्ध मेजर कँडीचे आदेश निमूटपणे पाळले असे दिसून येते.... मेजर कँडीने १८४७ ते १८७७ असे तीस वर्षे काम केले. शुद्धलेखन आणि व्याकरणविषयक सर्वच बाबतीत तो दक्ष असे. त्याने निर्माण केलेली नियमबद्धता शालेय पाठ्यपुस्तकातून अंमलात आल्यामुळे नव्याने शिकणार्‍या प्रत्येकावर मेजर कँडीकृत नियमांचाच पगडा बसू लागला. एखादी व्यक्ती अधिकारपदाच्या जोरावर भाषेला कसे वळण देऊ शकते याचे मेजर कँडी हे एक उत्तम उदाहरण होय. मराठीच्या व्याकरणाची व लेखनाची भाषा निश्चित करताना मेजर कँडीने पुणे प्रांतात बोलली जाणारी मराठी हीच प्रमाण मानली होती तरी मराठी भाषेने त्याचे म्हणणे काही प्रमाणात स्वीकारले, तर काही प्रमाणात नाकारले.... बरोबर काय, चूक काय हे ठरवताना त्याने हडेलहप्पी केली असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.

(संदर्भ: मराठी भाषेचा इतिहास डॉ. ग. ना. जोगळेकर (पान १८८))

* निम्न लिखीत परीच्छेद मराठी विश्वकोशातून भारतीय कॉपीराईट अधिनियम, १९५७ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार मराठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क गैरव्यावसायिक वापरासाठी खुले असलेल्या संस्थळावरुन घेण्यात आला आहे. मराठी विकिपीडियावरील अशा वापरासाठी विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे नमुद संकेतांचे अनुपालन अपेक्षित आहे. (विशेषत: प्रतिलेख अधिकतम असंपादीत कॉपीपेस्ट मराठी विश्वकोशातून आयात मजकुर ४००० बाईट किंवा दोनपरिच्छेद पेक्षा अधिक असू नये.) या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय, पूर्ण प्रताधिकारमुक्त होण्यासाठी ह्या आयात मजकुराचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर संदर्भात नमुद करुन हा साचा येथून काढावा. केवळ उदाहरणासाठी

महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई यांचे (संस्थळ दुवा) आणि भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ (कलम २१ ला अनुसरून) अन्वये सदर मर्यादीत मजकुर गैरव्यावसायिक उपयोगासाठी खुला आहे. कसे दिसेल याचे उदाहरण. हा मजकुर 'केवळ 'गैर-व्यावसायिक उपयोगासाठी मराठी विश्वकोशमंडळ आणि विश्वकोशातील संबंधीत लेखकाचे संदर्भार्थ नामोल्लेख करून आपण वापरण्यास पुर्नवितरीत करण्यास मुक्त असण्याची शक्यता असू शकते. (पण असा कोणताही वापर आपल्यात आणि विकिपीडिया अथवा त्याच्या कोणत्याही घटकाशी कोणताही करार निर्मित करत नाही विकिपिडीया उत्तरदायकत्वास नकार लागू)

* निम्न लिखीत परीच्छेद मजकुर मराठी विकिपीडियाच्या नियमीत परवान्यांतर्गत येण्यासाठी काय करावे लागेल ?

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा अन्वये सदर मजकुरात एखाद्या लेखकाने किमान स्वरूपाचे बदल करून स्व-जबाबदारीवर पुर्नलेखन केल्यास असा मजकुर महाराष्ट्र राज्यशासन अथवा महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ यांच्या कोणत्याही जबाबदारी शिवाय पण त्यांचे संदर्भ नमुद करून भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ च्या कलम ५७ मध्ये अनुस्यूत मूळ लेखकांच्या नामोल्लेखाचे आणि त्यांच्या रेप्युटेशन आणि ऑनरला धकका न लाविता असा मजकुर महारष्ट्रराज्य विश्वकोश मंडळाच्या मराठी विश्वकोशाचे कॉपीराईट मालक महाराष्ट्र शासन यांच्या कडून प्रताधिकार मुक्त होणे अभिप्रेत असल्याचे कळते.

ज्या अर्थी मराठी विकिपीडिया आणि इतर विकिप्रकल्पांवरचा मजकुरास मुख्यत्वे Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अधिक वरच्या स्तराची मुक्तता देणे अभिप्रेत असते ज्यात पुर्नवापरकर्त्या व्यक्तीस व्यावसायीक उपयोगासही अडथळा नसतो (असे का ? दुवा) विकिपीडियाच्या मुल्यव्यवस्थेस अनुसरून सदर निम्नलिखीत परिच्छेदास (मूळ लेखकाची कोणतीही बदनामीस कारण होणार नाही अशा पद्धतीने) लेखनात किमान बदल करून असे लेखन कॉपीराइटमुक्त करण्याच्या मराठी विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्रशासन सौजन्याने पुरस्कृत शासकीय सवलतीचा लाभ करून द्यावा. जेणे करून पूर्णत: प्रताधिकार मुक्त झालेला मजकुर विवीध भाषी विकिपीडियातून अनुवादीत करण्यास आणि इतर दृकश्राव्यादी माध्यमातून अथवा मराठी सोशल नेटवर्कींग संकेतस्थळांवरून पुर्नप्रसारीत होण्यातील अडथळे कमीत कमी होतील.

* मराठी विश्वकोशा शिवाय इतर मजकुरास अशा विनंत्या मराठी विकिपीडियावर ग्राह्य होण्याची शक्यता कमी का असेल ?
  • मराठी विकिपीडिया मजकुरात बदल केल्यानंतर मजकुर कॉपीराईट फ्री होण्याची संभावना असल्यामुळे मराठी विश्वकोशाच्या मर्यादीत मुक्त परवाण्याच्या मजकुरास किमान स्वरूपाची तात्कालीक मान्यता देते. विकिपीडिया प्रकल्पातील मजकुर सहसा मुक्त सांस्कृतिक काम आणि Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अभिप्रेत असल्यामुळे मराठी विश्वकोशातून येणाऱ्या मजकुरास दिला जाणारा अपवाद इतर मजकुरांना दिला जाण्याशी शक्यता कमीतकमी असेल आणि अशा कोणत्याही वेगळ्या केससाठी मराठी विकिपीडिया प्रचालक मंडळ आणि समुदाय सहमतीने निर्णय वेगवेगळे असतील

हा सद्य साचा म.शा. ची मंजुरी प्राप्त झाल्यास ढोबळ स्वरूपाचे केवळ उदाहरणार्थ प्रत्यक्ष मान्यता मिळाल्यास मजकुराचे अंतीम स्वरूप मान्यते वर आणि मराठी विकिपीडिया सदस्य सहमतीस अनुसरून सुधारीत केले जाईल आणि दृश्य रचना वाचकास सुलभ अशा पद्धतीने बदलली जाईल."

* उत्तरदायकत्वास नकार

मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर माहिती आणताना सुयोग्य परवाना साचे लावणे, सुयोग्य पद्धतीने संदर्भ देणे; अथवा मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या वापरापुर्वी, मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या आणि त्याच्या कॉपीराइट परवान्याची शहानिशा करून घेणे याची जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची व्यक्तीश: असते.

मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे

येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती सहसा मुक्त स्वरूपात उपलब्ध केली जाते, मराठी विश्वकोसातून येणारा मजकुर तसेच छायाचित्रांच्या वापरावर अधिक मर्यादा/विशीष्ट बंधने असू शकतात की जी ज्याची त्याने स्व-जबाबदारीवर पाळावयाची असतात हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबधित इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.

तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही. [श १]

.... ....विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पानाकडे. ..... ....पहा साहाय्य:मराठी विकिपीडियावरचे मराठी विश्वकोश मजकुर पुर्नवापर साहाय्य पान ((*)) [ मराठी विश्वकोश संस्थळावरील पुर्नवापर आणि कॉपीराइट मार्गदर्स्न दुवा]

  1. ^ इंग्लिश: You are being granted a limited license to copy anything from this site; it does not create or imply any contractual or extracontractual liability on the part of Wikipedia or any of its agents, members, organizers or other users., मराठी: तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही.



***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

मराठीची लेखनपद्धती गेल्या बाराशे वर्षांपासून प्रचलित असली, तरी इंग्रजपूर्व काळात तिचे स्वरूप यादृच्छिक होते. इंग्रजी राजवटीत मात्र मुद्रणकला, शिक्षणप्रसार, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, व्याकरणग्रंथांची निर्मिती, वृत्तपत्रे आणि इतर नियतकालिके इत्यादींच्या परिणामांतून मराठी लेखनाचे प्रमाणीकरण झाले आणि त्या अनुषंगाने मराठीचे शुद्धलेखन अस्तित्वात आले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यासारखे व्याकरणकार, मेजर टॉमस कँडी यांच्यासारखे दक्ष भाषाप्रेमी अधिकारी, प्रबोधन कार्याची बांधीलकी स्वीकरलेले वृत्तपत्रकार व लेखक, हे मराठीच्या शुद्धलेखनपद्धतीचे आद्य शिल्पकार होत. एकोणिसाव्या शतकात रूढ झालेल्या या शुद्धलेखनपद्धतीला जुने शुद्धलेखन म्हणतात. तिच्यामध्ये अनुस्वारांचा फारच सुळसुळाट दिसून येतो. स्पष्टोच्चारित अनुस्वार, नासिक्य अनुस्वार, व्युत्पत्तिसिद्ध अनुस्वार, व्याकरणिक अनुस्वार, रूढीने आलेले अनुस्वार असे सर्व प्रकारचे अनुस्वार त्या पद्धतीत होते. संस्कृतातून आलेल्या इ-कारान्त आणि उ-कारान्त तत्सम शब्दांचे लेखन संस्कृतप्रमाणे ऱ्हस्वान्तच होत असे. सामान्यरूपात मात्र त्यांचे लेखन मराठी उच्चाराप्रमणे दीर्घान्त होत असे. रूढीने रुळलेल्या व्याकरणदुष्ट रचना सदोष ठरवून व्याकरणशुद्ध रचनांचा आग्रह धरला जाई. ही लेखनपद्धती दीर्घकाळपर्यंत चालू होती. तिला अधूनमधून विरोध होत असे; पण खरा वाद १८९८ मध्ये सुरू झाला. श्री.साने, श्री. गोडबोले आणि श्री. हातवळणे या तीन विद्वानांनी शुद्धलेखनातील सुधारणेसंबंधाने एक विनंतिपत्रक काढले. लेखन उच्चारानुसार असावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. अनुच्चारित अनुस्वार गाळावेत, तत्सम ऱ्हस्व इकारान्त आणि उकारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत इ. सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यांनी मराठी शुद्धलेखन या नावाचे एक पुस्तकही १९०० मध्ये प्रसिद्ध केले आणि शाळाखात्यातील क्रमिक पुस्तकेही त्या पद्धतीने छापली जावीत, असा प्रयत्न केला. त्यांना काही विद्वानांनी पाठिंबा दिला, पण काहींनी विरोध केला. परिणामतः परंपरावादी व परिवर्तनवादी असे दोन विरोधी गट तयार झाले. त्यांत परंपरावाद्यांची सरशी झाली. तथापि या निमित्ताने शुद्धलेखन-चळवळीत हे जे दोन पक्ष पडले, ते आजतागायत कायम आहेत. १९२८ पर्यंत ही चर्चा तात्त्विक पातळीवर चालली. न.चिं. केळकरांनी १९२८ साली आपल्या टिळकचरित्राचे दुसरा व तिसरा हे खंड एकामागोमाग एक असे प्रसिद्ध केले. ते करताना त्यांनी नवीन परिवर्तनवादी विचारसरणीप्रमाणे अनुच्चारित अनुस्वार गाळले. तेव्हापासून हे विरोधी पक्ष अधिक कृतिशील झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९३० साली आपले नवे नियम प्रसिद्ध केले. ते काही जणांनी स्वीकारले व काहींनी नाकारले. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाच्या क्षेत्रात दुहेरी व्यवस्था निर्माण झाली. पुढे मुंबई विद्यापीठाने २ जानेवारी, १९४७ रोजी आपले नियम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले. १९५३ साली महाराष्ट्र साहित्य परिषदेने शुद्धलेखनाच्या संदर्भात निर्माण झालेल्या अराजकातून मार्ग काढण्यासाठी एक शुद्धलेखन समिती स्थापन केली. या समितीने काही सुधारणा सुचविल्या; पण वाद मिटला नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले (१९६०) आणि मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात आले. या महामंडळाने १९६१ साली आपली १४ कलमी शुद्धलेखन नियमावली प्रसिद्ध केली आणि २० सप्टेंबर, १९६२ रोजी महाराष्ट्र शासनाने एका ठरावाने महामंडळाच्या या नियमावलीला मान्यता देऊन मागील सर्व नियम रद्द केले.[]

शासनाच्या या कृतीने मराठी शुद्धलेखनाबाबतच्या वादावर कायमचा पडदा पडला, असे नाही. अनेक विद्वानांनी या नियमावलीविरुद्ध आपली मते व्यक्त केली आहेत आणि त्यांनी स्वतःचे लेखन स्वतःच्या पद्धतीने केलेले आहे. यासंबंधात प्रा. वसंत दावतर परंपरावादी आहेत. प्रा. अरविंद मंगरूळकर आणि प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांना त्यांची मते मान्य नसली, तरी ते शासकीय नियमावलीच्या बाजूनेही नाहीत. डॉ. वि.भि. कोलते यांनी ऱ्हस्व-दीर्घ भेदच दुर्लक्षित करा, अशी टोकाची भूमिका घेतली. श्रीमती सत्त्वशीला सामंत आणि श्री. दिवाकर मोहनी यांनी शासकीय नियमावलीतील त्रुटी आणि विसंगती यांवर बोट ठेवून नवीन सुधारणा सुचविल्या आहेत. ही सर्व चर्चा साधारणपणे अनुच्चारित अनुस्वार, ऱ्हस्व-दीर्घ भेद, समासान्तर्गत तत्सम ऱ्हस्वान्त शब्दांचे लेखन, व्यंजनान्त शब्दांचे लेखन इ. मुद्यांवर केंद्रित झाली आहे. शुद्धलेखनाच्या जोडीने भाषिक प्रदूषणासंबंधीही मराठीत पूर्वीपासून आजतागायत अखंडपणे चर्चा होत राहिली आहे. वि.दा.सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री. के. क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, में. पु. रेगे यांनी या संदर्भात आपापली मते मांडली आहेत. या सर्व चर्चांमधून एवढेच निष्पन्न होते, की मराठीच्या शुद्धलेखानाचा वाद अद्याप चालू आहे. []

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे

संपादन

‘महाराष्ट्र सारस्वत’ ग्रंथकर्ते विनायक लक्ष्मण भावे यांच्या मते, मृत व नियमांनी जखडलेल्या संस्कृत भाषेच्या अनुरोधाने किंवा संमतीने जिवंत मराठी शब्दांची रूपे ठरवताना व त्यांचे खोटे ‘शुद्धलेखन’ बनवताना घालमेल होते.[]

मराठीतील शुद्धलेखनाचा भर 'इ' आणि 'उ' ह्यांच्या र्‍हस्व- दीर्घ लेखनावरच अधिक आहे,हे शुद्धलेखनाचे नियम पाहता स्पष्ट होते... व्यावहारिक पातळीवर अडचण म्हणजे जर लेखनातून ही (दीर्घ ई दीर्घ ऊ) चिन्हे घालवून टाकली,तर वीहीर किंवा विहिर ,नदि,मि,तु असे पाहण्याची सवय करावी लागेल. ती सवय करण्यापेक्षा ही चिन्हे कायम ठेवावीत पण त्यासाठी त्यांना वर्ण म्हणण्याचा आग्रह मात्र शास्त्रपूत नव्हे, असे गोविलकरांचे मत आहे.[संदर्भ: मराठीचे व्याकरण-डॉ.लीला गोविलकर:(पृष्ठ ६१-६७)]. (ही चर्चा खूपच प्रदीर्घ आहे, संपूर्ण देणे अवघड आहे, त्यामुळे हा विभाग अपूर्ण आहे. शक्य झाल्यास पूर्ण करण्यास मदत करा).

मराठीतील ऱ्हस्वदीर्घ हे अर्थभेद करणारे नाहीत आणि कुठे ऱ्हस्व स्वर यावा आणि कुठे दीर्घ स्वर यावा हे सोबतच्या वर्णांच्या सापेक्षतेने त्या स्वराचे स्थान कोणते ह्यावरून ठरते. त्यामुळे इकारउकारांच्या ऱ्हस्वदीर्घभेदाकरता वेगळ्या चिन्हांची आवश्यकता नाही असे मत सदाशिव आठवले ह्यांनी (‘रसिक’ दिवाळी अंक, १९८३; ललित मासिक, एप्रिल १९८४ पृ. ६२;) पूर्वी मांडलेले आहे. ललित मासिकातील गमभन ह्या सदरात त्याविषयीचे आपले वेगळे मत पंतोजी ह्या टोपणनावाने कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी नोंदवलेले आहे (ललित मासिक, फेब्रुवारी १९८४ पृ. ५१-५२; जून १९८४ पृ. ४२-४३). मराठी लेखननियमांवरील संस्कृताचा प्रभाव ह्या विषयावर डॉ. वि. भि. कोलते ह्यांनीही आपली परखड मते व्यक्त केली आहेत. इकारउकारासाठी एकच चिन्ह असावे अशी सूचना त्यांनीही १९६७ साली भोपाळ येथे भरलेल्या अ. भा. मराठी-साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात केली आहे.[]

अवधूत परळकर त्यांच्या मुलाखतीत म्हणतात, "शुद्धलेखनाची दहशत निर्माण करण्याला माझा विरोध आहे. शुद्धलेखनाला घाबरून मराठी लिहिण्यापासून कोणी परावृत्त होत असेल तर शुद्धलेखनाचा आग्रह धरणं मला क्रिमिनल वाटते. भाषा आपले विचार व्यक्त करण्यासाठी आहे. व्याकरणामुळे अभिव्यक्तीवर दडपण येत असेल तर व्याकरण सोपे करायचे प्रयत्न झाले पाहिजेत. शुद्धलेखनाचे नियम पाळण्याची अपेक्षा धरावी. पण ते कुणी पाळले नाहीत तर त्याला तुच्छ लेखू नये. त्याची अडचण समजून घ्यावी. क्रीडांगण मधला क्री अनेकजण ऱ्हस्व काढतात. गल्लोगल्लीतल्या क्रीडा मंडळांच्या बोर्डावर क्री ऱ्हस्वच लिहिलेला असतो. पण म्हणून त्या मंडळाच्या कार्याकडे, कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. मराठी भाषा बहुजनांपर्यंत न्यायची असेल तर व्याकरणाच्या बाबतीत कठोर धोरण स्वीकारून चालणार नाही. भाषा टिकवायची आहे की व्याकरण हे एकदा ठरवावं.[]

डॉ. आनंद यादव यांच्या मते "भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असत नाही. ते असते किंवा नसते इतकेच. भाषेतून एकमेकांशी संवाद होणे महत्त्वाचे असते,‘‘ डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मतानुसार , ""सांस्कृतिक धोरण तयार करताना "शुद्धलेखन‘ हा शब्दच काढून टाका, असे राज्य सरकारला सुचवले आहे. कारण भाषा शुद्ध, अशुद्ध यावरून धार्मिक, सांस्कृतिकतेची झालर व्यक्त होते. "लई‘, "बी‘ हे शब्द अधिकृत म्हणून स्वीकारले जावेत.‘‘ त्यांच्या मते, वेलांटी, उकार इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणात संस्कृतवर अवलंबून राहणे हे मराठीच्या स्वातंत्र्याचीही आणि विकासाचीही हानी करणारे आहे. शुद्धलेखन या शब्दाऐवजी प्रमाणलेखन हा शब्द वापरणे, हा बदल किरकोळ स्वरूपाचा मानता कामा नये. त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहिले पाहिजे.[][]

डॉ. वसंत काळपांडे यांच्या मतानुसार, खरी गरज आहे ती मराठीच्या तज्ज्ञांनी स्वत:च्या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्याची. त्यांनी मराठीला लिपी, शुद्धलेखन आणि व्याकरण या कर्मकांडात बंदिस्त करून ठेवले आहे. वास्तविक पाहता (मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, लेखक, कवी यांच्यासह) बहुतेक जण नियमांची तमा न बाळगता त्यांना योग्य वाटेल तसेच लिहीत किंवा बोलत असतात. भाषेच्या अशा तथाकथित "नियमबाह्य‘ वापरामुळे त्यांच्या व्यवहारात कोणतीही अडचण आल्याचे आढळत नाही. नियमांचा जाच होतो तो शाळेत शिकणाऱ्या मुलांनाच. अनावश्‍यक कर्मकांडांत आणि नियमांत अडकून पडल्यामुळे मराठीच्या सौंदर्याचा आस्वादच त्यांना घेता येत नाही. अभिव्यक्तीतही याच बाबींचा अडसर होतो. मराठीची लिपी, उच्चार, शुद्धलेखन, व्याकरण, इत्यादींबाबत उदार धोरण स्वीकारण्याची गरज भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना. गो. कालेलकर, डॉ. वि. भि. कोलते आणि प्रख्यात व्याकरणकार द. न. गोखले यांच्यासारख्या तज्ज्ञांनी विशद केलेलीच आहे. आजचे भाषातज्ज्ञ मराठीला अनावश्‍यक कर्मकांडांच्या बाहेर काढतील अशी आशा आहे. []

अगदीच उच्चारणानुसार केलेल्या लेखनामुळे होणार्‍या चुका

संपादन
बर्‍याचदा नियम माहीत नसल्यामुळे अगदी उच्चारणानुसारी लेखन करून लोक मोकळे होतात. तर काही वेळा महामंडळाच्या नियमाबाबत मतभेद असल्यामुळेपण वेगळे लेखन केले जाते. काही वेळा बदलेल्या नियमांची दखल न घेता जुन्या नियमांनुसार लेखन केले जाते. सध्याच्या नियमांमध्ये पूर्वीपेक्षा अनुनासिकांचा वापर कमी केला आहे, याची कल्पना नसल्यामुळे तसेच कोकणीसारख्या बोलीभाषेतील उच्चारणाच्या आग्रहामुळेही वेगळे लेखन केले जाते.

प्रमाणभाषा मराठी ही बोलीभाषेतील मराठी नसल्यामुळे होणार्‍या चुका

संपादन

असंख्य लोक उच्चारणानुसार लेखनाकरिता आग्रही नसतात परंतु त्यांच्या भागात बोलल्या जाणार्‍या बोलीत प्रमाणभाषेपेक्षा उच्चार वेगळे असतात.

शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्‍या व्यक्तीनाच प्रमाण नियमांची कल्पना नसल्यामुळे होणार्‍या चुका

संपादन

मराठी भाषातज्ज्ञांमध्ये असलेल्या असहमतीमुळे होणार्‍या चुका

संपादन

संस्कृतातून येणारे तत्सम शब्द कोणते याची कल्पना नसल्याने होणार्‍या चुका

संपादन

मराठीएतर भाषकांकडून लेखनात होणार्‍या चुका

संपादन

मराठी मुले अमराठी शाळातून शिकल्यामुळे होणार्‍या चुका

संपादन

अमराठी शाळांतून सहसा मराठी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जात नाही. तिला दुय्यम भाषेचा दर्जा दिला गेल्याने समग्र मराठी व्याकरण मुलांना शिकवले जात नाही व शुद्धलेखनाच्या चुका होतात.

परभाषेतील शब्द मराठीत होणार्‍या चुका

संपादन

नियमांच्या कक्षेबाहेरील शब्द व त्यांची रूपे

संपादन

"परंतु या कोशात दाखवलेले शब्द व त्यांची रूपे यांचे संपूर्ण नियमन करण्यास महामंडळाचे हे अठरा नियम अपुरे पडतात.त्यांमुळे नियमांच्या कक्षेबाहेरील शब्द व त्यांची रूपे यांकरिता विचारात घ्याव्या लागलेल्या बाबी पुढीलप्रमाणे:-

१) रेफापूर्वीचे(रफारापूर्वीचे) इकार व उकार.

२) 'इक','य','त्य' हे प्रत्यय लागून तयार होणारे काही साधित शब्द/

३) अ-कारान्त,आ-कारान्त,ई-कारान्त,ऊ-कारान्त,ए-कारान्त,ऐ-कारान्त आणि ओ-कारान्त अशा पुल्लिंग, स्त्रिलिंगी, व नपुसकलिंगी नामांचे एकवचनाचे सामान्यरूप, अनेकवचन आणि अनेकवचनाचे सामान्यरूप करण्याची सर्वसाधारण पद्धत, यांतील उदाहरणात्मक अपवाद.

४) तृतीयेचा 'ए',पंचमीचा 'ऊन', आणि सप्तमीची 'ई' हे विभक्तिप्रत्यय काही अ-कारान्त,आ-कारान्त नामांना लावणे.

५) काही अ-कारान्त नामांची - विशेषतः ग्रामनामांची - आणि स्वीकृत इंग्रजी शब्दांची - एकवचनी सामान्यरूपे.

६) दीर्घान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.

७) य-कारान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.

८) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा नामांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन

९) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा विशेषणांचे सामान्यरूप आणि त्यांची विशेष्यानुसार बदलणारी रूपे.

१०) विशेषणांची सामान्यरूपे आणि विशेष्यानुसार बदलणारी रूपे.

११) 'ईय'(कुटुंबीय,परकीय) असा शेवट असलेल्या शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन.

१२) सर्वनामांची विभक्तिरूपे." ( संदर्भ : मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान ४४)

अयोग्य न्याहाळक(ब्राउजर) वापरल्यामुळे दिसणार्‍या आभासी चुका

संपादन

आपला न्याहाळक(ब्राउजर) योग्य नसेल किंवा योग्य तांत्रिक पद्धतीने सज्ज नसेल तरीही आपल्याला येथील शुद्धलेखन पण अशुद्ध असल्याचा आभास घडू शकतो. खास करून आपल्याला सर्वच अपेक्षित जोडाक्षरे तुटक दिसतात तर र्‍हस्व वेलांटी अपेक्षित अक्षराऐवजी भलतीकडेच दिसते.

मराठी लेखनाच्या संगणक प्रणालीतील त्रुटी आणि वापरणार्‍यांची अनभिज्ञता

संपादन

काही वेळा मराठी लेखनाच्या संगणक प्रणालीत त्रुटी असतात तर काही वेळा वापर करणार्‍यास एखादे अक्षर त्या प्रणालीत कसे लिहावे याची कल्पना नसते. त्याशिवाय अचानक नवीन संगणकप्रणाली वापरताना मराठीत एकूणच भारतीय भाषांकरिता कळफलकांचे प्रमाणीकरण नसल्यामुळेही समस्या उद्भवतात जसे, बराहा मध्ये ज्ञ हे अक्षर j~J असे लिहिले जाते. हेच अक्षर गमभन प्रणालीत द+न+य ने येते, तर हिंदी भाषक तज्ज्ञ प्रणाली बनवताना द+न+य चे 'ग्य' करतात व 'ज्ञ'करिता अक्षरच उरत नाही. मराठीत संगणकावर प्रथमच लिहिणार्‍यांना रफार कसे लिहावेत याची कल्पना नसते. उदाहरणार्थ, या लेखाची सुरूवात करताना वापरलेल्या प्रणालीत एक रफार मिळालाच नाही. चुकांची खालील यादी पहा व आपल्या अनुभवातून तीत भर घाला.


  • व्यंजनानंतर घाईत अ अक्षर टंकित न केल्याने चुका उद्भवतात.
  • 'र्‍ह', तसेच 'र्‍य' कसे टंकित करावे हे माहीत नसेल तर डॅश चे चिन्ह देऊन '-ह', व'-य' सारखा चुकीचा प्रयत्न केला जातो.
  • चुकीने हिंदीकरिता असलेले नुक्तायुक्त अक्षर वापरले जाते.
  • दंडचिन्ह | तसेच विसर्ग चिन्ह : मराठी संगणक प्रणाली व विकिपीडियाच्या विकिप्रणालीत दोन्हीकडे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जातात त्यामुळे चुका उद्भवतात.
  • डोक्यावर चंद्र असलेला 'अ' act सारखे शब्द टंकताना चुकीचा प्रयत्न केला जातो.
  • पाऊण 'य' न मिळाल्याने ट्य...ढ्यसारखी जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.

माझ्या प्रश्नाचा रोख

संपादन

कृपया केवळ भावनिकतेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोण ठेवून उपाययोजना कशा स्वरूपाच्या असाव्यात याबद्दलच्या सूचनांचे स्वागत असेल. आपण मराठी विकिपीडियावर नवीन असाल तर आपला स्वत:चा विकिपीडियाचा अनुभव जसा जसा वाढेल आणि नवीन जे काही सुचेल ते या विभागात नोंदवण्यास विसरू नये.

हेसुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ कल्याण वासुदेव काळे. "कल्याण वासुदेव काळे-१". मराठी विश्वकोश. खंड १७. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. ७१२४.
  3. ^ कल्याण वासुदेव काळे. "कल्याण वासुदेव काळे-१". मराठी विश्वकोश. खंड १७. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. ७१२४.
  4. ^ http://www.esakal.com/saptarang/dr-sadanand-mores-article-sapatarang-29094
  5. ^ http://sushantmhane.blogspot.in/2010/11/blog-post.html
  6. ^ http://www.sahityasanskruti.com/node/32
  7. ^ http://balmitra.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5047220650604158801&SectionId=22&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&NewsDate=20130218&Provider=-&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%20(%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE)
  8. ^ http://balmitra.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4966606711496243905&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20120724&Provider=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%86.%20%E0%A4%B9.%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%87&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87
  9. ^ http://balmitra.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5445298290909546330&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20120501&Provider=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%20%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87,%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80...