शुद्धलेखनाचे नियम

मराठी भाषेच्या लिखाणात एकवाक्यता येण्यासाठी असलेले नियम
(शुद्धलेखन या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी भाषकांचे राज्य म्हणून सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ वर्षी मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमांना महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत ते पाळण्याचे ठरविले.

मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात.
कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यांसंबंधी माहितीसाठी युनिकोड हे पान पाहावे.

हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत -

नियम १

संपादन

अनुस्वार

नियम १.१

संपादन

स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू लावा.

नियम १.२

संपादन

तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.

  • उदाहरणार्थ : 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

नियम १.३

संपादन

पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.

  • उदाहरणार्थ : 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

नियम १.४

संपादन

अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.

  • उदाहरणार्थ :
    • वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्त्वज्ञान,
    • देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू....

नियम १.५

संपादन

काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

  • उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.

नियम २

संपादन

नियम २.१

संपादन

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.

  • उदाहरणार्थ : संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.

नियम ३

संपादन

नियम ३.१

संपादन

नामांच्यासर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्ययशब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

  • उदाहरणार्थ : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

नियम ३.२

संपादन

आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.

  • उदाहरणार्थ : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४

संपादन

अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ नयेत.

  • या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत.

नियम ५

संपादन

नियम ५.१

संपादन

मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.

  • उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती.
    • इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
      • उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू

नियम ५.२

संपादन

नियम ५.३

संपादन

व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.

  • उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.

नियम ५.४

संपादन

नियम ५.५

संपादन

सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे.

  • उदाहरणार्थ : बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.

साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.

  • उदाहरणार्थ : बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

नियम ५.६

संपादन
  • 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.
    • उदाहरणार्थ :

विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.

नियम ६

संपादन

मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.

नियम ७

संपादन

नियम ७.१

संपादन

मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकारउकार दीर्घ लिहावेत.

  • उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.

तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

नियम ७.२

संपादन

मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकारउकार सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत.

परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व, किंवा दीर्घ लिहावेत.

नियम ८

संपादन

नियम ८.१

संपादन

उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.

  • उदाहरणार्थ : गरीब-गरिबाला, गरिबांना, चूल-चुलीला, चुलींना.

अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.

  • उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.

नियम ८.२

संपादन

मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.

  • उदाहरणार्थ : बेरीज-बेरजेला, बेरजांना, लाकूड-लाकडाला, लाकडांना.
  • उदाहरणार्थ :परीट-पर(रि)टास, पर(रि)टांना

नियम ८.३

संपादन

शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.

  • उदाहरणार्थ :काईल-कायलीला, देऊळ-देवळाला, देवळांना

नियम ८.४

संपादन

पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही)

  • उदाहरणार्थ : घसा-घशाला, घशांना, ससा-सशाला, सशांना

नियम ८.५

संपादन

पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.)

  • उदाहरणार्थ : दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा - मोजाला, मोजांना.

नियम ८.६

संपादन

तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.

  • उदाहरणार्थ : रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना

नियम ८.७

संपादन

मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.

  • उदाहरणार्थ : किंमत-किमतीला, किमतींना; गंमत-गमतीला, गमतींचा

नियम ८.८

संपादन

ऊ-कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.

  • उदाहरणार्थ : गणू-गणूस; दिनू-दिनूला.

नियम ८.९

संपादन

धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात

  • उदाहरणार्थ : धाव-धावू, धावून; गा-गाऊ, गाऊन; कर-करू, करून.

नियम ९

संपादन

पूर हा ग्रामवाचक कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.

  • उदाहरणार्थ : नागपूर, तारापूर, सोलापूर

नियम १०

संपादन
  • 'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत.

नियम ११

संपादन

उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु.

नियम १२

संपादन

एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे. ए-कारान्त करू नये.

  • उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना.

नियम १३

संपादन

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ : 'असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं' अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले

नियम १४

संपादन
  • 'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.
    • उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान'
  • कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
    • उदाहरणार्थ : डिक्शनरी, ब्रिटिश, हाऊस.
  • इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.
    • उदाहरणार्थ : 'एम.ए., पीएच.डी., अमेरिकन, वॉशिंग्टन.

नियम १५

संपादन

केशवसुतपूर्वकालीन पद्यविष्णूशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मूळ लेखनानुसार छापावेत. त्यानंतरचे (केशवसुतचिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन 'अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.

नियम १६

संपादन
  • राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत.

रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.

  • आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा', या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही.

नियम १७

संपादन

नियम १८

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन