गुलकंद हा देशी गुलाबाच्या पाकळ्या, साखर/खडी साखर व आयुर्वेदिक औषधींपासून तयार करण्यात येत असलेले एक औषध आणि खाद्यपदार्थ आहे.

गुलकंद
गुलकंद
प्रकार मुखशुद्धी
उगम भारत
प्रदेश किंवा राज्य आशिया खंड
संबंधित राष्ट्रीय खाद्यप्रकार भारतीय
अन्न बनवायला लागणारा वेळ 60 मिनिटे ते 480 तास
अन्न वाढण्याचे तापमान थंड किंवा सामान्य तापमानात
मुख्य घटक गावरान गुलाब, खडी साखर
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य प्रवाळ पिष्टी

गुलकंद तयार करण्यासाठी मुख्यतः देशी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करतात.

साहित्य

संपादन
 
साहित्य आणि कृती
  1. काचेची बरणी
  2. गावरान गुलाबाच्या कोवळ्या कापलेल्या पाकळ्या
  3. खडीसाखर
  4. प्रवाळ पिष्टी
 
गुलकंद बनवण्यासाठी गुलबपाकळ्या वेगळ्या करताना
  • कृती १

काचेच्या बरणीत एक थर देशी गुलाबांच्या कापलेल्या पाकळ्या व एक थर कुटलेल्या खडीसाखरेचा अशा प्रकारे टाकून ती बरणी झाकण घट्ट लावून उन्हात ठेवतात. यात पाणी टाकण्याची गरज नाही. पाक दिसू लागला कि गुलकंद तयार झाला असे समजावे. पक्व गुलकंद होण्यासाठी याला तब्बल वीस दिवस काचेच्या बरणीत ठेवले पाहिजे. गुलकंद तयार झाला की त्यात प्रवाळ पिष्टी टाकून, चांगले ढवळून हवाबंद काचेच्या बरणीत ठेवावे.

  • कृती २

जर गुलाबाच्या पाकळ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील तर खाडीसाखरेचा पाक करून त्यात गुलाबाच्या कापलेल्या पाकळ्या टाकून मंद आचेवर शिजवले जाते. चांगला तपकिरी काळपट रंग आला की त्याला गॅस वरून उतरवले जाते. थंड झाल्यावर त्यात प्रवाळ पिष्टी टाकून, चांगले ढवळून हवाबंद काचेच्या बरणीत भरले जाते.

उपयोग

संपादन
  • उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करावे.
  • गुलकंद हा सौम्य रेचक आहे.

बाह्य दुवे

संपादन