कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात.

पुरुष केंद्रस्थानी मानून काढलेल्या कुटुंबवृक्षातील नात्यांची नावे

कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडिल, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.

एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडिल) हा कुटुंबाचा प्रमुख असतो.एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावे लागेल.

कुटंबातील भूमिकासंपादन करा

कुटुंबसंस्थेतील विविध नातेसंबंधंची नावे व त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे,

 • आई - स्त्रीलिंगी पालक
 • वडील - पुल्लिंगी पालक
 • मुलगा - पुल्लिंगी अपत्य
 • मुलगी - स्त्रीलिंगी अपत्य
 • भाऊ - पुल्लिंगी (समान पालक असलेले) भावंड
 • बहिण - स्त्रीलिंगी (समान पालक असलेले) भावंड

पालकांचे पालक, त्यांचे पालक ह्या नातेसंबंधांची नावे पुढीलप्रमाणे,

मुलांची मुले, त्यांची मुले, ह्या नातेसंबंधांची नावे पुढीलप्रमाणे,

 • नातू - मुलाचा किंवा मुलीचा मुलगा
 • नात - मुलाची किंवा मुलीची मुलगी
 • पणतू - नातवाचा किंवा नातीचा मुलगा/मुलगी

पालकांच्या भावाबहिणींच्या नातेसंबंधांची नावे पुढीलप्रमाणे,

लांबच्या भाऊबहिणींच्या नातेसंबंधांची नावे,

भाऊबहिणींच्या पत्नी/पतीच्या नातेसंबंधांची नावे,

भाऊबहिणींच्या मुलांच्या नातेसंबंधांची नावे,

 • भाचा/भाची - जवळच्या/लांबच्या बहिणीचा/ची मुलगा/मुलगी
 • पुतणा/पुतणी - जवळच्या/लांबच्या भावाचा/ची मुलगा/मुलगी

पत्नी/पतीकडिल नातेसंबंधांची नावे

(मेहुण्याची पत्नी व नंडेचा पती ह्यासाठी नाव उपलब्ध नाही)

मुलांच्या पती/पत्नीच्या नातेसंबंधांची नावे

हे ही वाचासंपादन करा