चिंच
चिंच (शास्त्रीय नाव : Tamarindus indica, टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील वनस्पती आहे. चिंच चवीला आंबट असते. झाडे शंभर फुटापर्यंत ही वाढतात.
" | चिंच | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
झाडाला लागलेल्या चिंचा
| ||||||||||
" | शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
जीव | ||||||||||
५० पेक्षा जास्त प्रजाती; |
उपयोग
संपादनखाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.
लागवड
संपादन१ चिंचेच्या लागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती:
- रोपांच्या जाती
- रोपे मिळण्याचे ठिकाण
- खड्ड्याचे स्वरूप व खड्डे भरण्याची पद्धत
- लागवडीचा महिना
- उन्हाळ्यातील पाण्याची गरज
- बाजार पेठेविषयी माहिती
- चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
- चिंचेबंधी महाराष्ट्र सरकारच्या योजना
चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून 9चिंचोक्यांपासून) चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते.. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच पाणी द्देतात..
चिंच जात
संपादनप्रतिष्ठान
संपादनआवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10,c सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर ४० रु. प्रतिकलम दराने उपलब्ध असतात. फोन संपर्क – 02112-254313v किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधून रोपे मिळवता येतात.
चिंचेेला लागणाऱ्या काही किडी आणि त्यांचे नियंत्रण
संपादनचिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही.काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात..
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.[१] चिंच हे पितळेची भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची चटणी खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खाता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.
पहिला चिंच महोत्सव
संपादनऔरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ रोजी सुरुवात झाली.[२]
विलायती चिंच
संपादन'विलायती चिंच', 'फिरंगी चिंच' किंवा 'गोरटी इमली' हा चिंचेचा प्रकार (variety) नसून, एक वेगळी वनस्पती आहे.
गुणधर्म
संपादन- चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.
साहित्य आणि संस्कृतीतील स्थान
संपादन- प्रसिद्ध गीत : चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी ! (गीतकार - ग.दि.माडगूळकर; चित्रपट - मधुचंद्र १९६७, स्वर महेन्द्र कपूर, संगीत एन दत्ता)[३]
संदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2012-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-10 रोजी पाहिले.
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/2841612.cms[permanent dead link]
- ^ http://www.marathijagat.net/chitrapat-geete/set-nine/he-chincheche-jhhad.html[permanent dead link]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |