बरहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बरहा हा मूळ कन्नड शब्द असून त्याचा अर्थ 'लिखाण' असा होतो. बरहा ही भारतीय भाषांत सहज लेख लिहिण्याकरता बनवलेली सोपी संगणक प्रणाली आहे. ही संगणक प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे जसे की विविध दस्तऐवज (Word Application), इंटरनेट आणि संकेतस्थळांवर लिहीणे, इ-मेल लिहिणे, संगणकावरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो.
मूळ लेखक | शेषाद्रिवासु चंद्रशेखरन |
---|---|
सद्य आवृत्ती |
१०.१०.१५२ |
विकासाची स्थिती | सद्य |
संगणक प्रणाली | विंडोज एक्सपी व त्यापुढील |
संचिकेचे आकारमान | ६.१४ एमबी |
भाषा | इंग्लिश |
सॉफ्टवेअरचा प्रकार | दस्तऐवज संपादक |
परवाना |
मोफत (काही सुविधांविना) विकत ( ![]() |
संकेतस्थळ | बरहा.कॉम |
भाषा संपादन करा
यात देवनागरी लिपीतील मराठी, आसामी, हिंदी भाषा, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, मणिपुरी तसेच गुरुमुखी लिपीतील पंजाबी, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड इत्यादी भाषांतून लेखन करता येते.
सुविधा संपादन करा
बरहा विविध सुविधांचा व संगणक प्रणालींचा संच उपलब्ध करून देते.
- बराहा एक स्वतंत्र दस्तऐवज संपादक (document editor) आहे. यात दस्तावेज संपादित करण्याच्या मूलभूत आवश्यक सुविधांचा समावेश आहे.
- बराहा डायरेक्ट (Baraha Direct)ने दुसऱ्या प्रणालीत मजकूर (Text) थेट (direct) टंकलिखित (type) करता येतो. जसे की विकीपीडिया, मायक्रोसॉफ्टचे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट इ., इमेल्स, मेसेंजर वगैरे.
बराहामध्ये मराठी कसे लिहावे संपादन करा
मुख्य पान: बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
इतर सुविधा संपादन करा
बरहा मध्ये एक बरहापॅड नामक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध भाषांत लेखन करू शकतो.