विकिपीडिया:विकिपीडियातील शुद्धलेखन तपासताना कोणती काळजी घ्यावी?

विकिपीडियातील शुद्धलेखन तपासताना कोणती काळजी घ्यावी? संपादन

  • आपल्याला लेखात काही शब्द निळे आणि काही लाल दिसत आहेत याची नोंद घ्या .
  • शक्यतो संपादन खिडकी उघडल्यानंतर 'झलक पहा' ही कळ दाबा .
  • संपादन करताना पूर्वी निळा असलेला शब्द झलक मध्ये लाल रंगाचा दिसू लागला तर तुमचे कदाचित कुठे तरी चुकते आहे का तपासून घेण्याच्या दृष्टीने खालील सूचना वाचा:-
  • संपादन खिडकी उघडल्या नंतर---

"विकिपीडियातील अंतर्गत दुवे साधारणत: दुहेरी चौकटी कंसांचा वापर करून दिलेले असतात . बाह्य दुवे [दुहेरी चौकटी कंस] असे एकेरी चौकटी कंसात असतात. हे दुवे संपादन" हे लिखाण खाली दिल्याप्रमाणे दिसेल .


शब्दसमूह निळा दिसत असताना दुहेरी चौकटी कंसात दुहेरी चौकटी कंस असा एकच शब्दसमूह असेल किंवा | असे चिन्ह देऊन दुहेरी चौकटी कंसांचा असे दोन शब्द असतील. | या चिन्हाच्या उजवीकडील शब्दसमूहाचे शुद्धलेखन दुरुस्त करताना सहसा तांत्रिक अडचण येत नाही.

पण चौकटी कंसात "|" या दंडचिन्हाचा वापर झाला नसेल अशावेळी त्या शब्दसमूहाचे शुद्धलेखन बदलण्याचे टाळावे. | दंड चिन्ह वापरून दंडचिन्हाच्या उजवीकडे शुद्धलेखन लिहून लेखाचे जतन करावे.लेख जतन केल्यानंतर त्या शब्दसमूहाचा जो मूळ लेख असेल तिथे टिचकी मारून पोहचावे. तुम्हाला त्या लेखाच्या नावातच शुद्धलेखनाची चूक आढळेल.

शीर्षकलेखनात चूक झाली असेल तर विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत या लेखात मार्गदर्शन केल्याप्रमाणे शुद्धीकरणाकरिता पावले उचलावीत.


किंवा | दंडचिन्हाच्या डावीकडील बाजू एखाद्या अस्तित्वातील लेखाचे नाव असण्याची शक्यता असते अशावेळी त्या शब्दसमूहाचे शुद्धलेखन बदलण्याचे टाळावे.