प्रसन्नकुमार ह्यांचे चर्चा पृष्ठ !

इथे आपण माझ्याशी मुक्तपणे चर्चा करू शकतात! (Talk / Discussion Page of Prasannakumar )

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) ,Upto 31 डिसेंबर २००९
चर्चा ३ (Archive 1) ,Upto 25 July 2010


विकिपीडिया मुक्त आहे

संपादन
मुक्त शब्दाच्या सर्व अर्थांनी मुक्त असणे असणे हे विकिपीडीयाचे एक महत्वपूर्ण गाभासूत्र आहे.सर्व व्यक्ती सहसा चांगल्या हेतुनेच संपादने करतात असा विकिपीडिया संस्कृतीचा विश्वास आहे आणि अनुभवा अंती तो बरोबर आहे असेच सर्वांना आढळून येते.

मराठी विकिपीडियावर मी ५ वर्षापासून कार्यरत आहे ,उत्पातांचा मी सविस्तर अभ्यास करत आलो आहे.एवढ्या सगळ्या वर्षात मराठी येणार्‍या केवळ एका अंकपत्त्यास तात्पुरते प्रतिबंधीत करावे लागले आहे. मराठी बांधवांना या प्रकल्पाचे महत्व माहित आहे त्यामुळे जाणीव पूर्वक उत्पात सहसा घडत नाहीत.

होणार्‍या चुका सहसा नवागत सदस्यांकडून अनावधानाने येथील लेखन संकेतांची कल्पना नसल्याने होतात.चुक लक्षात आणून दिल्यानंतर सहसा पुनरावृत्ती होत नाही.

याही चुकांची संख्या कमी व्हावी म्हणून साईट नोतीस मधून विकिपीडिया:सजगता अभियान चालू केले असल्याचे आपण पाहिले असेल.आणि अशा सजगता सुचनांचे व्यवस्थीत पालन होताना आढळते

त्यामुळे विकिपीडीयातील सर्व पाने सर्व लोकांना अधिकाधीक परिस्थीत लेखनास मुक्त असतील याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पाने सुरक्षीत करणे अथवा एखाद्या सदस्यास संपादनापासून प्रतिबंधीत करणे हे केवळ तात्पुरत्या आणि अपवादात्मक परिस्थितीतच केले जाते/करता येते.

दर्जा राखण्याच्या दृष्टीने एखादे पान तुम्हाला पहार्‍याच्या सुचीत टाकता येते.काही संपादनांवर अधीक लक्ष ठेवण्याची गरज वाटल्यास विकिपीडिया:पहारा आणि गस्त येथे नोंद करावी.

सुरक्षीत करण्याबाबत मुख्य अपवाद मुखपृष्ट आणि मुख्पृष्ठावर प्रदर्शीत होणारे साचे, मिडियाविकि सॉफ्टवेअरचा यूजर इंटरफेस, एवढेच मर्यादीत आहे.मुखपृष्ठ सदरातील लेखसुद्धा केवळ मुखपृष्ठावर असलेल्या काळातच सुरक्षीत असणे अभिप्रेत आहे.

मराठी संकेतस्थळे सारखीपाने जीथे सदयांना विश्वकोशीय संकेतांचे पालन करण्या पेक्षा स्वतःचे संकेतस्थळाची जाहिरात महत्वाची वाटते ती सुद्धा अर्ध सुरक्षीत केली आहे जेणे करून तीथे संपादनकरण्यापूर्वी त्या व्यक्तीचे सदस्य पान असेल आणि त्यांना सुयोग्य सुचना त्यांच्या चर्चा पानावर देता येतील.

पाने कमीतकमी प्रमाणावर सुरक्षीत केली जावीत म्हाणून ती केवळ प्रचालकांनाच (सहसा सहमतीनंतर) सुरक्षीत करता येतात.प्रचालकांनी याबातीत त्यांचे अधिकार कमीतकमी पणेच वापरणे अभिप्रेत असते. त्यामुळेच त्यांना वस्तुतः प्रबंधक नाहीतर प्रचालक हा शब्द वापरला जातो.

या विषयावर अजून काही शंका असतील तर मनमो़कळ्यापणे मांडणे म्हणजे उअत्तरे देता येतील आणि ती मी सहाय्य पाने बनवताना वापरत असतोच

माहितगार १४:३२, २६ जुलै २०१० (UTC)

तुमची पहिली पाच संपादीत पाने

संपादन
मी तुमच्या नोव्हे २००९ मध्ये संपादने केलेल्या पहिल्या पाच पानांचा इतिहासही अभ्यासला मदुरै,नयनतारा,तृषा कृष्णन,असिन तोट्टुंकल,तमिळ लिपी ; यापैकी एकाही पानावर एकदाही उत्पात झालेला नाही हीच सर्वात मोठी पावती नाही काय ? माहितगार १४:४६, २६ जुलै २०१० (UTC)

आपला लेख

संपादन
वर नमुद केल्याप्रमाणे विकिपीडिया मुक्त आहे.येथील कोणताही लेख कोणत्याही विशीष्ट लेखकाचा असणे अभिप्रेत नाही.येथे तुम्ही लिहिलेला मजकूर कोणीही बदलू शकते याची आपल्याला कल्पना असेलच त्यामुळे "माझी संपादने असलेले लेख" असे म्हणणे अधीक सयूक्तीक होईल .माहितगार ०५:२६, २७ जुलै २०१० (UTC)

इथे भाषांतरात सहाय्य हवे आहे

संपादन
helping Again and again? हा परिच्छेद भाषांतरणात आपल्या सव्डीनुसार सहाय्य हवे आहे.माहितगार ०७:२१, २७ जुलै २०१० (UTC)
मुख्य उद्देश आपण प्रचालक पदा साठी वनंती केली आहे त्या अनुषंगाने विकिपीडियाची निती धोरणांशी आपला अधिक जवलून परिअचय व्हावा विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू शी तोंड ओळख व्हावी असा आहे.बाकी भाषांतरे तर सारीच करणे आहेत जेवढे जमेल तेवढा हातभार लावा केलेच पाहिजे असेहि नाही . माहितगार १६:०४, ६ ऑगस्ट २०१० (UTC)

About My A/C On En Wiki

संपादन

Hi Wikipedians, I Prasannakumar,Hereby confirm that user account named Che Prasannakumar(On English Wiki) belongs to me,and I have put a request to change its name as Prasannakumar ,in order to have a Unified account Names on all WikiProjects. Thank you,चे.प्र.कुमार १२:३०, २८ जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:सफर

संपादन
विकिपीडिया:सफर येथे शुद्धलेखन तपासण्यात/सुधारणेत सहाय्य हवे.माहितगार १५:५१, २८ जुलै २०१० (UTC)

जुजबी

संपादन
मीत्रवर्य आपण निर्मिती केलेला लेख जुजबी हा केवळ शब्दाचा अर्थ देतो आहे, त्यामुळे त्याची विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल साशंकता आहे . जुजबी लेखाने काही विश्वकोशीय कार्य अभिप्रेत आहे काय ? शब्दांच्या अर्थ आणि व्याकरण विषयाची जबाबदारी घेण्याकरिता विक्शनरी हा सहप्रकल्प उपलब्ध आहे. जुजबी लेखा पानावर काही विश्वकोशीय लेखन अभिप्रेत नसेल तर तो लेख विक्शनरी सह प्रकल्पावर हलवावा हि नम्र विनंती माहितगार ०६:१७, २ ऑगस्ट २०१० (UTC)

माहितीचौकटींमध्ये कचरा दिसत आहे

संपादन

नमस्कार! आपण केलेल्या गेल्या काही संपादनांमध्ये आपण अभिनेत्यांच्या ज्या माहितीचौकटी वापरल्या आहेत, त्यात काही केरकेचरा राहून गेल्याचे दिसत आहे. उदा.: काही ठिकाणी नुसतेच [[]] अशी चिन्हे दिसत आहेत. कृपया संपादने करताना, जेवढी माहिती भरणे शक्य असेल, तेवढीच भरावी. अन्य माहिती भरली नाही, तरी नंतर भरता येईलच; पण त्या चिन्हांसारखा अनाकर्षक मजकूर/कचरा राहून गेल्यास लेखाची वाचनीयता घटते. कृपया योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५९, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

शुद्धलेखन चिकित्सा

संपादन

नमस्कार!

आपल्या संपादनांमधील शुद्धलेखनाच्या सोप्या चुका टाळण्यासाठी एका सुविधेचा वापर करून बघा :

खेरीज हेही लेख अभ्यासावेत :

काही मदत लागल्यास जरूर कळवणे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५२, १० ऑगस्ट २०१० (UTC)

परभाषक शब्दांच्या देवनागरी लेखनाबद्द्ल लेखनभेद असू शकतात. तुम्ही मांडलेला मुद्दा दखलपात्र जरूर आहे. माझ्या परीने मी काम करतच आहे. परंतु, तुमच्यासारख्या सातत्यपूर्ण सहभाग असलेल्या सदस्यांच्या संपादनांमध्ये सोप्या शुद्धलेखनाच्या चुका टाळाव्यात, यासाठी मी अधूनमधून निरीक्षण करून उपयोगी संदेश देत असतो. कधीकधी टायपो म्हणून चुका होऊ शकत असल्याने, मी काही दिवस संपादनांचे निरीक्षण करून/कल (ट्रेंड) पाहून त्यानुसार गोष्टी सुचवतो. तुमच्या गेल्या संपादनांवरून काही सुधारणा सुचवाव्याश्या वाटतात :
  1. संदर्भदूवे, बाह्यदूवे : ही लेखने चूक आहेत. योग्य लेखनात 'दु' ‍र्‍हस्व आहे. म्हणजेच 'बाह्य दुवे', 'संदर्भ दुवे' ही लेखने योग्य आहेत.
  2. तीला, तीने, तीच्या इत्यादी : 'ती' या सर्वनामाची विभक्तिरूपे चालताना, दीर्घुकाराचे र्‍हस्व उकारात रूपांतर होते. उदा.: 'तिला', 'तिने', तिच्या' इत्यादी.
  3. 'हि एक भारतीय अभिनेत्री आहे' : यात 'ही' असे दीर्घान्त लेखन हवे. बाकी वाक्य ठीक.

या सुधारणा सुचवण्याच्वे कारण, आपला (तुमचा-माझा) अधिकाधिक वेळ माहितीत चांगली भर टाकण्यात जावा, चुका दुरुस्त करण्यात जाऊ नये, एवढीच प्रामाणिक इच्छा. बाकी, आपल्या संपादनांमध्ये उत्तरोत्तर आश्वासक वाटचाल दिसत असल्यामुळे, खूप बरे वाटते.

-संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०१, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

क्षमा असावी, मी चिन्मय नव्हे आपला काही गैरसमज झाला आहे, मी चिन्मयशी ईमेलवर संपर्क करून विक्शनरीकरिता काही लेखनास प्रताधिकारमुक्ततेची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केल्या नंतर संबधीत लेखन विक्शनरीत घेतले एवढेच १५:५१, १४ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्शनरी

संपादन

नमस्कार,

तुम्ही विक्शनरीकडे लक्ष देत आहात हे कौतुकास्पद आहे. तेथे तर संपादकांची विकपीडियापेक्षा वानवा आहे. नवीन मुखपृष्ठाबद्दल माझ्या (सडेतोड) नोंदी -

१. चित्रे नाहीत.

२. भरपूर माहिती आहे.

३. या माहितीची अजून नीट मांडणी व्हावी. आत्ता खूपच गर्दी-गर्दी वाटत आहे.

४. एखाद्या चांगल्याप्रकारे लिहिलेल्या शब्दाचे मुखपृष्ठ सदर करावे म्हणजे विक्शनरी हा प्रकार काय आहे, कसे करावे हे सोदाहरण स्पष्ट होईल.

तसेच काही महिन्यांपूर्वी माहितगार, श्रीहरी, इ. जाणकार मंडळींनी विक्शनरीवर लेख कसे असावे याचा आराखडा तयार केला होता. नवीन अनेक शब्दांचे लेख तयार करण्यापूर्वी जर असलेले लेख या आराखड्यात आणता आले तर ते अतिउत्तम होईल. असे करणे विकिपीडियापेक्षा विक्शनरीवर गरजेचे आहे कारण विक्शनरीवर एकच (किंवा मोजकेच) आराखडे असतील. जर हा आराखडा पक्का बसवला तर सदस्य अजून वेगवेगळे आराखडे तयार करणार नाहीत. यासाठी wikt:mr:विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम हे पान पहावे, तसेच wikt:mr:मुंगी हा शब्दही पहावा.

तुमच्याकडून असाच उपक्रम चालू रहावा अशी आशा. मदत लागली तर मागालच.

अभय नातू १५:१७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

अधिक चर्चा

संपादन

अर्ध्याहून अधिक विक्शनरीज पाहिल्यानंतर चित्रे असावीत असे वाटले नाही,खरतर अपवादानेच एखाद्या विक्शनरीवर चित्रे पहावयास मिळतील हे आपण शोधल्यानंतरही लक्षात येईल-मराठी विकिपीडियाला त्याची अधिक गरज आहे,आणि वारंवारपणे ती बदलली जावी हे अपेक्षा आहे,पण ह्या बाबतीत इतर सदस्यांमध्ये कमालीची अनास्था पहावयास मिळते.

चित्रे हवीत यावर आपले दोघांचे एकमत दिसते आहे.

२. भरपूर माहिती आहे.

>>>हे मात्र अत्यंत आश्चर्यकारक वाटल!आधीचे विक्शनरीचे रूप पाहता हे त्याच्या एक चतुर्थांश असावे असे वाटते,इंग्रजी विक्षनरी किंवा कोणत्याही मोठ्या विक्षनरीवर ह्याहून अधिक दुवे पहावयास मिळतात,मुळात ह्यापूर्वीच्या विक्शनरीच्या पृष्ठावर भारंभार माहिती असणे ह्याचमुळे एका कारणामुळे मी रूप पालटण्याकडे मोर्चा वळविला.ती अधिक प्रमाणात कमी करण्याचा परंतु महत्वाचे दुवे न वगळण्याच्या विचाराअंती एवढीच शिल्लक ठेवली आहे.माझ्या चर्चा पहा.

मी फक्त आत्ताच्या मुखपृष्ठाबद्दल माझे मत कळवले. काय होते याची मला फारशी माहिती नाही. मी विकिपीडियावर जितके योगदान करतो तितके विक्शनरीवर नाही. आत्ताचे पान नुसते लिखाण असल्यासारखे दिसते. विकिपीडियाही एकेकाळी असाच होता. त्यावर चित्रे/आयकॉन घातल्यावर त्याला थोडी कळा आली आहे. माझ्या सूचनेचा रोख तो होता.


३. या माहितीची अजून नीट मांडणी व्हावी. आत्ता खूपच गर्दी-गर्दी वाटत आहे.

>>>गर्दी वाटत आहे? हा प्रश्न आपल्याला ह्या आधी पडला नाही ह्याचे आश्चर्य वाटते,असो आपल्याला नक्की काय अपेक्षीत आहे कळू शकले नाही.

पुन्हा एकदा - आधी काय होते यावर माझी टिप्पणी नव्हती. तुम्ही माझे मत मागितलेत, हे माझे मत आहे.

४. एखाद्या चांगल्याप्रकारे लिहिलेल्या शब्दाचे मुखपृष्ठ सदर करावे म्हणजे विक्शनरी हा प्रकार काय आहे, कसे करावे हे सोदाहरण स्पष्ट होईल.

>>> ह्यावर विचार करून अशा लेखांची मालिका करता येईल.

यासाठी विकिपीडियासारखे नामनिर्देशन पान करावे.

तसेच काही महिन्यांपूर्वी माहितगार, श्रीहरी, इ. जाणकार मंडळींनी विक्शनरीवर लेख कसे असावे याचा आराखडा तयार केला होता. नवीन अनेक शब्दांचे लेख तयार करण्यापूर्वी जर असलेले लेख या आराखड्यात आणता आले तर ते अतिउत्तम होईल.

>>> ते आराखडे एखाद्या नवलेखकाला अधिक क्लिष्ट वाटल्यास तो लिखाणापासून परावृत्त होऊ शकतो ,असे नाही का वाटत? कदाचीत हेच कारण असावे कुणी विक्शनरी कडे वळत नाही,इतकेच काय त्यातले साचे आणि कित्येक माहिती अपडेट देखील होत नाही.असो,ह्यावर चर्चा होणे गरजेचे आहे

जर क्लिष्ट असतील तर ते सोपे करा पण नवीन लेखकांनी मनमानीपणाने पाहिजे ते साचे/आराखडे तयार केल्याने विक्शनरीवर विस्कळीतपणा येईल. विकिपीडियावरही हे थोड्या प्रमाणात दिसते, पण खाली म्हणल्याप्रमाणे विकिपीडियावरील माहितीचा आवाका प्रचंड आहे तसेच त्याची व्हरायटीही अनेकपटीने असल्यामुळे अनेक साचे/आराखडे सामावून घेता येतात.


असे करणे विकिपीडियापेक्षा विक्शनरीवर गरजेचे आहे कारण विक्शनरीवर एकच (किंवा मोजकेच) आराखडे असतील. जर हा आराखडा पक्का बसवला तर सदस्य अजून वेगवेगळे आराखडे तयार करणार नाहीत. यासाठी wikt:mr:विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम हे पान पहावे, तसेच wikt:mr:मुंगी हा शब्दही पहावा.

>>> आधी साचे ठरविणे आवश्यक आहे,त्यावर काम लवकरच सुरू होईल,आपणही मदत करावी ही अपेक्षा.

हे साचे ठरलेलेच आहेत. अधिक हवे असल्यास propose करा व मते मागा.

ता.क- मी नुकतेच तमिळ विक्शनरी विकिवरील श्री.सेल्वाकुमार ह्यांच्या सोबत १०००-तमिळ-मराठी शब्दसंग्रह करण्याचे योजिले आहे,त्यात हातभार लाऊ शकला तर अवश्य लावावा.

नेहमीप्रमाणे शक्य तितकी मदत मी करेनच पण विक्शनरीवर माझे योगदान लेख लिहिण्यापेक्षा साचे, पॉलिसी, इ.बद्दल आहे. विकिपीडियावर काम करता करता नाकी नऊ येतात तर अजून एखाद्या प्रकल्पात झोकावून देणे म्हणजे आगाउपणाच ठरेल. असे असताही विशिष्ट (specific) मदत लागली, प्रश्न असले तर त्यांना मी नक्कीच उत्तरे देईन किंवा मदत करेन याची खात्री बाळगावी.

अजुन एक सूचना- ह्यापूर्वी श्रीहरी आणि माहितगार ह्यासारख्या जाणकार मंडळींनी ज्या साच्यांची निर्मिती केली होती,किंवा लेखांच्या मांडणीचे स्वरूप तयार केले होते त्याची साधी झलक पाहिली असता माझ्यासारख्या १ वर्षाच्या अनुभव असणार्‍याला देखील धडकी भरते (अरे बापरे ! इतक्या सार्‍या गोष्टी भराव्या लागणार?),अर्थात इतकेच जर क्लिष्ट लिखाण करावयाचे असेल तर त्यापेक्षा असल्या भानगडीत नकोच पडायला असा विचार येतो,इतकेच नाही तर मराठी विकि आणि इतर प्रकल्पात हाच क्लिष्टपणा,नकोत्या जाचक अटी

यासाठी उपाय सुचवा, पण हे सुचवताना असलेल्या मार्गापासून अगदी विरुद्ध दिशा सुचवू नका. येथे (विकिपीडिया तसेच विक्शनरी) केलेले काम हे बर्‍याच विचारांती, चर्चा होउन मगच केले गेलेले आहे, त्याला तुच्छ लेखू नका. जर क्लिष्ट वाटत असेल तर सोपे उपाय करा. येथील अटी या अनेक वर्षांच्या अनुभवावरुन सुचवण्यात आलेल्या आहेत. एखाद्याने एके दिवशी सकाळी उठुन या अटींची यादी केलेली नाही हे लक्षात घ्या.

,त्यावरून जाणकार मंडळी सल्ले देतात परंतु त्यात बदल करत नाही (म्हणजे काय नको होते काय हवे होते हे सांगतील परंतु स्वतः मात्र अपवादानेच अगदीच वाटला तर त्या लेखात/पृष्ठात बदल करतील) असे अनेकवेळा पहावयास मिळते,हे सारे उत्तेजनावर्धक वाटत नाही.त्याने ह्या सर्व गोष्टींत पडणे कठिण वाटते,

अहो सल्ला देतात ना? कि दुर्लक्ष करतात? आणि माझ्या बघण्यात तरी आलेले आहे की येथील मंडळी नेहमी सोदाहरण सल्लेच देतात. आणि उदाहरण नसले तर अगदी सोप्या शोधाने ते सापडू शकते की! येथे इतके काम करावयाचे आहे की प्रत्येक नवीन लेखकाला प्रत्येक गोष्ट शिकवण्यात वेळ गेला तर काही होणारच नाही. आणि वेळ घालवून शिकवले तरीही हे लेखक येथे टिकून राहतील असेही नाही....मग सगळेच मुसळ केरात! असे असतानाही येथील बहुतांश (मला तर वाटते सगळेच) एकमेकांना मदत करण्यास अगदी तत्पर असतात....तुमचा हा ग्रह का झाला हे माहिती नाही.

आणि त्याचमुळे संपादक संख्या असुनही कुणी फारसे उत्साह दाखवित नाही.ह्यावर विचार होऊन एक काय ती नियमावली म्हणा,साचे म्हणा,वर्ग म्हणा,इत्यादी सर्वच ठिकाणी उत्साहवर्धक असे नुतनीकरण होणे गरजेचे आहे असे वाटते.

येथे संपादकसंख्या आहे? जेमतेम ३०-३५ लोक एकावेळी येथे असतात, पैकी १०-१२ भरीव काम करतात...असे असता सगळ्याच गोष्टी एकदम एकाच वेळी कशा पार पडणार? उत्साह दाखवित नाही म्हणजे काय? नाही कळले. तसेच नियमावली म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे हेही नाही कळले. जर तुमचा नियम, अटींना विरोध असेल तर मग हे कसे करणार?

असो. तुम्ही विकिपीडिया आणि आता विक्शनरी वर काम करीत आहात हे पाहून आनंदच होतो आणि अशा चर्चांतून या प्रकल्पांचेच भले होवो हीच तुमची इच्छा आहे हेही मी जाणून आहे. यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल ही आशा.

क.लो.अ.

अभय नातू १८:०३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

अंतरंग

संपादन

श्रीहरींचा शेवटचा लेख पहावा १८:०७, मे २९, २००८ ,उदा.म्हणून..http://mr.wiktionary.org/wiki/अंतरंग त्यात खाली जे काही वर्ग आहेत कानडी,पाहिजे फ्रेंच पाहिजे, अबक पाहिजे इत्यादी असे २५-३० वर्गात वर्गीकरण करून ठेवले आहे,अशा लेखांनी किंवा किचकटपणाने किती लोक लिखाणास प्रवृत्त होतील? निदान मी तरी नाही.त्याउलट त्यात एकमेव दुवा असलेल्या नेपाळी भाषेत माहिती एकाच ओळीची आहे (जे अपेक्षीत नाहिये)पण लेखसंख्या मात्र अफाट आहे

मला या साच्या, आराखड्यांमागची पूर्ण कारणमीमांसा माहिती नाही पण इतके सांगू शकतो की या आराखड्यातील सगळ्याच गोष्टी एकाच वेळी भरल्याच पाहिजेत असे नाही. जितके माहिती आहे ते भरा, उरलेले तुमच्यामागून आलेला लेखक लिहिल. पण म्हणून असलेला आराखडा धुडकावून अगदीच वेगळे लिखाण करू नका, इतकेच म्हणणे.

नेपाळी विक्शनरी बद्दल म्हणाल तर ते नेपाळी विकिपीडियाबद्दलही लागू आहे. लेखसंख्या अफाट पाहिजे, कि असलेले लेख नेटके पाहिजेत? यावर मराठी विकिपीडियावरही अनेकदा चर्चा झालेली आहे. माझे मत नेहमीच असे आहे की लेखसंख्येसाठी विस्तार टाळू नये व विस्तार करीत बसण्यात लेखसंख्येकडे दुर्लक्ष करू नये. तरी ही सूक्ष्मरेषा सांभाळीतच मार्गक्रमण केले पाहिजे.

अजून एक लक्षात घ्या. हे प्रकल्प १ महिना, १ वर्ष, १ दशकातही पूर्ण होणारे नाहीत. घाई करुन सोपे तेच केले तर त्याचा दर्जा सुमारच होईल.

अभय नातू १८:०८, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार प्रसन्नकुमार! मी मराठी भाषेचे मूळ् & अदगुल मदगुल ही विश्वनाथ खैरे यान्ची पुस्तके वाचलि आहेत्.

माझी मात्रुभाषा मराठी आहे & मी तमिळ् चा amture अभ्यासक आहे.

या विशयावर आपल्यासोबत आनख्इ चर्चा करता आलि तर आनन्द होइल.

आपनास सोइचे असल्यास आपला e-mail id कळवावा.
    
        भरतेश,सान्गली,महाराष्ट्र
         dbharatm@gmail.com

नमस्कार,भरतेश आपण विकिपीडियावर लेखन करता का? म्हणजे आपल्यास ऑनलाईन भेटणे सोयीचे होईल,आपण मला इथे कळवावे,आपल्याला विकिपीडियावर भेटायला नक्कीच आवडेल.कळावे.प्रसन्नकुमार १६:२२, २५ सप्टेंबर २०१० (UTC)

भाषांतर सहाय्य हवे

संपादन

en:Google translator toolkit या महत्वपूर्ण लेखाचे मराठी विकिपीडियात आणून भाषांतर करून हवे आहे. आपल्या सवडीने सहकार्य करावे हि नम्र विनंती माहितगार १०:४९, ७ सप्टेंबर २०१० (UTC) ( तो लेख गूगल ट्रांसलेशन टूलकिट‎ या नावाने मराठी विकिवर भाषांतरासाठी आणला आहे.) वि. नरसीकर (चर्चा) १६:०३, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद आणि तुम्हांलाही शुभेच्छा!

संपादन

नमस्कार!

माझ्या चर्चापानावर दिलेल्या शुभेच्छासंदेशाबद्दल धन्यवाद! आणि तुम्हांलाही ग्रेगोरियन नववर्षानिमित्त शुभेच्छा!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:४०, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

तुम्हाला २०११ साल सुख-समृद्धीचे जावो ही शुभेच्छा.

अभय नातू २२:४४, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

इ.स. २०१२

संपादन

नमस्कार ! इ.स. २०१२साठी तुम्हांला शुभेच्छा ! सध्या व्यग्र असता का ? --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:२५, ५ जानेवारी २०१२ (UTC)

  चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण  
नमस्कार, Prasannakumar


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi Prasannakumar,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

संपादन

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१०, १ जानेवारी २०१२ (UTC)

धन्यवाद

संपादन

नमस्कार ,संकल्प, सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा,काल विकीस्रोत विषयी टि.व्ही.वर बातमी ऐकुन पुन्हा एकदा उत्साहाने काम करावे असे वाटले आणि बर्याच दिवसांनी पुन्हा विकी कडे वळलो, कामानिमित्त फारसे लेखन करता आले नाही,असो ,आता पुन्हा जोमाने काम करण्याची इच्छा आहे,हो आपल्या उपक्रमांविषयी नक्कीच कल्पना /मत मांडण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद,कळावे,

प्रसन्नकुमार ०८:३०, २७ फेब्रुवारी २०१२ (IST) जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी भाषकांना हार्दिक शुभेच्छा ! मराठी शिका आणि मराठीत बोला...Reply

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

संपादन
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

संपादन

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:००, ११ जून २०१२ (IST)Reply

வணக்கம்..!

संपादन

திரு. பிரசன்ன குமார் அவர்களே, வணக்கம்..!

மராட்டிய விக்கிப்பிடியாவில் தங்கள் பங்களிப்புகள் கொண்ட கட்டுரைகள் படித்து மகிழ்ச்சி அடைந்தேன். தாங்கள் தமிழராக இருந்தாலும் மராட்டி மொழியும் அறியவர் என்று தங்களின் பங்களிப்புகளால் தெரிகிறது.

மும்பையில் நாம் சில பேர் மராட்டிய தமிழியலைப் பற்றி சில விடயங்கள் அப்பியாசித்து வந்து இருக்கிறோம். இவ்விடயத்தைப் பற்றி தங்களின் கருத்துகள் தெரிந்தால் நமக்கு முன்னேற்றம் அடைய நன்றாக இருக்கும். முடிந்தால் தங்களிடம் அலைபேசியில் ஒருவேளை பேச விரும்புகிறேன். தயவு செய்து தங்கள் அலைபேசி எண் அல்லது மின்னஞ்சல் முகவரி கொடுங்களேன்.

நன்றி. ஹமீது இலாட்டிவாலா. தமிழர்கள் சங்கம்

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार Prasannakumar,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार Prasannakumar,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.