नमस्कार, मराठी विकिपीडियावर नट व नटी ऐवजी अभिनेता, अभिनेत्री हे शब्द रूढ आहेत. कृपया ते वापरावे. अभय नातू २०:२६, ४ ऑक्टोबर २००९ (UTC)

सुचने बद्दल धन्यवाद

संपादन

प्रिय मित्र, आपल्या सुचनेचे मी स्वागत करतो. विकिपिडिआ वरील रुढ शब्द वापरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन परंतु एक शंका होती म्हणुन विचारतो. कारण पुर्वी पासुन मराठीत प्रचलीत शब्द नट व नटी असा आहे..आजकाल हिंदीच्या अधिक वापराने मराठीतील जुने वैशिष्ट्यपुर्ण शब्द कालबाह्य होत आहेत,ते आपल्या इतर बांधवांना समजावेत किंवा निदान वाचण्यात तरी यावे यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो का?कारण आज बर्याच ठिकाणी हिंदी देवनागरी शब्द जशेच्या तसे उचलुन मराठीच ( अनवधानाने ) आहेत असे लिहिले जातात.ह्यावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद, आपला स्नेहांकित, प्रसन्नकुमार.

जरी नटअभिनेता यांच्यात अर्थसाधर्म्य असले तरी काही बारीक फरकही आहेत.
चित्रपट, नाटके, इ. मध्ये आपली कला दाखविणार्‍यांसाठी अभिनेता/अभिनेत्री हा शब्द वापरला जातो. सहसा त्यांचा कलाविष्कार पूर्वयोजित ठिकाण, वेळेस असते. उदा. चित्रपट (चित्रणाच्या वेळी किंवा सिनेमागृहात), नाट्यअभिनेता, इ.
नट हा शब्द इतर ठिकाणी अभिनय करणार्‍यांसाठी वापरतात, उदा. डोंबारी, पथनाट्यातील कलाकार, तमाशा. इ. कडकलक्ष्मी, वासुदेव, गोंधळी, यांसाठीही नट शब्द वापरावा. नाट्यकलाकारांसाठी दोन्ही शब्द उपयुक्त आहेत.
जेथे उचित तेथे इतर शब्दांपासून पुनर्निर्देशन असावे, म्हणजे दोन्ही शब्दांचा अर्थ (साधारण तरी) एकच आहे हे कळते तसेच एकाच विषयावरचे दोन लेख होत नाहीत.
जेथे मराठी शब्द चपखल बसतात तेथे हिंदी शब्द जसेच्या तसे मराठीत मुळीच आणू नये, असे माझे मत आहे. मुंबईतील स्लो लोकल मंद गतीच्या नसून धीम्या गतीच्या का असतात हे मला अजूनही कळलेले नाही :-)
अभय नातू १८:५५, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

नमस्कार

संपादन

आपल्या सदस्य पानावरून आपल्याला तमीळ आणि मल्याळम सुद्धा अवगत आहे असे दिसते.तमीळ आणि मल्याळम विकिपीडियात काही चांगल्यागोष्टी असतील तर त्यांची कल्पना येथे जरूर द्यावी.सोबतच विक्शनरी सहप्रकल्पाच्या माध्यमातूनही अधून मधून काही तमीळ आणि मल्याळम शब्दांचा परिचय जरूर करून द्यावा. Mahitgar ११:३६, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

अभिनंदन

संपादन

नमस्कार Prasannakumar/जुनी चर्चा १,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

एकत्रित खाते व नावबदल

संपादन

प्रसन्नकुमार,

सगळ्या विकिमीडिया प्रकल्पांवर एकाच नावाने प्रवेश करण्यासाठी -- १. वर उजवीकडील माझ्या पसंती वर टिचकी मारा.

२. तेथील (तुमच्या एकत्रीत खात्याच्या पसंती बदला) वर टिचकी मारा.

३. आवश्यक ते बदल करा.

४. झाले!!!

जर तुम्हाला मराठी विकिपीडियावरील सदस्यनाव बदलून हवे असेल तर येथील प्रशासक/प्रचालकपदाच्या अधिकाराने मी ते बदलू शकतो, तरी मला कळवावे.

क.लो.अ.

अभय नातू १५:१७, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

sadasya naav badalane babat.

संपादन

नमस्कार, इतर विकिज वर असणारे सदस्यनाव सारखे असल्याने व सदस्य भिन्न असल्याने तेथील बदल अनावश्यक वाटतो त्यामुळे आपण माझे सदस्यनाम् बदलुन देणे. ते खालीलप्रमाणे. सध्याचे : प्रसन्नकुमार नविन नाव: ए.प्रसन्न.कुमार

Error - User Prasannakumar has been migrated to the unified login system. Renaming it will cause the local user to be detached from the global one.
Do you really want to detach your id's?
अभय नातू १६:०३, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)

कृपया आराध्यवृक्ष हा लेख बघावा. त्यात मल्याळमतमिळ भाषेतील काही शब्द आहेत. ते तपासुन कृपया आवश्यक असेल तेथे शुद्धलेखन करावे ही विनंती.

अल्पमती ०१:२६, ८ ऑक्टोबर २००९ (UTC)

Translation request

संपादन

Hi Prasannakumar, would you be so kind to help me translate this article into the wonderful Marathi language? Please. It's about a Chinese philosopher and is listed as one of the articles every Wikipedia should have. If you think that article is too long, here is a short version: "Confucius was a Chinese thinker and social philosopher, whose teachings and philosophy have deeply influenced Chinese, Korean, Japanese and Vietnamese thought and life. His philosophy emphasized personal and governmental morality, correctness of social relationships, justice and sincerity." Thanks a lot! --Amaqqut

reply to translation

संपादन

Thank you for your request ,sure I will try my best to translate it in to marathi as soon as possible.Looking forward to your comments and suggestions,Thanks again. Prasannakumar.

Hi. I saw an IP User had created that article. Is that you? Thank you very much:)--Amaqqut १४:३८, १९ ऑक्टोबर २००९ (UTC)

You are welcome.well about the IP user ,I have no idea at all,but yes I have created a page in Marathi attached to the same article. bytheway, I have began to translate that page in to Marathi,more "translated text" will be added in next few days ,I hope to do it early.

प्रबंधक कि व्यवस्थापक

संपादन

खरे सांगायचे तर मलाही नक्की माहिती नाही की कोणता शब्द जास्त योग्य आहे. प्रबंधक हा शब्द संस्कृतोद्भभव आहे असे वाटते तरी तोही वापरण्यास हरकत नाही. माझा कल व्यवस्थापक वापरण्याकडे आहे.

अभय नातू १७:५६, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)

अभिनेता नावे

संपादन

एकाच नावाच्या व्यक्तींबद्दलचे लेख लिहिताना शीर्षकात त्यांचा व्यवसायही लिहावा - उदा- स्नेहा (अभिनेत्री), श्रीकांत (क्रिकेट खेळाडू), इ.

अभय नातू १९:०७, १ डिसेंबर २००९ (UTC)

वर्ग चर्चा:अभिनेते

संपादन

वर्ग चर्चा:अभिनेते येथील चर्चेत काही शंका विचारलेल्या दिसतात आपण चर्चेत सहभागी होऊन मत आणि सूचना व्यक्त करावे अशी विनंती आहे. माहितगार ०८:१४, २ डिसेंबर २००९ (UTC)

शब्द-अक्षर

संपादन

प्रसन्नकुमार,

तुमच्या मदतीच्या ऑफरसाठी आभारी आहे. त्याचा फायदा मी अधूनमधून घेईनच. त्याच बरोबर जर तुम्हाला दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणार्‍या चुका असा एखादा छोटा लेख लिहिता आला तर तो आपण विकिपीडिया मदतकेंद्रात घालूयात म्हणजे या चुका मुळातच कमी होतील.

अभय नातू १६:५९, ३ डिसेंबर २००९ (UTC)

कूल आयडिआ ! भन्नाट कल्पना

संपादन

नक्कीच मी त्यासाठी एक लेख तयार करतो आणि तुम्हास पाठवुन देतो. त्यात शक्य तितकी माहिती अंतर्भुत करण्याचा प्रयत्न करिन.

अभिनेत्यांची गावे

संपादन

अभिनेत्यांच्या गावांनुसार वर्ग करण्यास पाठिंबा. पलक्कडचे चित्रपटअभिनेते -->पलक्कड-->केरळमधील शहरे असे वर्गीकरण असावे. तसेच पलक्कडचे चित्रपटअभिनेते -->गावांनुसार चित्रपटअभिनेते-->चित्रपटअभिनेते हेही वर्गीकरण करावे.

अभय नातू १८:३५, ३ डिसेंबर २००९ (UTC)

Return to the user page of "Prasannakumar/जुनी चर्चा १".