ज्या वृक्षाची आराधना / पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व आजारपणात आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार प्रत्येक वृक्ष हा कोणत्याना कोणत्या स्वरूपात औषधीच आहे. विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशिष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी. हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीही तोडू नये. याच तत्त्वावर भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत. वृक्ष देवक पण असतात.[]

वेगवेगळ्या जन्मनक्षत्रासाठी असलेले आराध्यवृक्ष

संपादन
नक्षत्र आराध्य-
वृक्ष
संस्कृत हिंदी बंगाली गुजराती मळ्यालम् तमिळ तेलुगू इंग्रजी लॅटीन
अश्विनी कुचला विषद्रुम - कुंचिला झेरकोचला - एट्टेमारं मुसिडी Poison nut Strychnos nux-vomica
भरणी आवळा आमलकी आमल/ अमरो आमलकी आमळानुं झाड आमलकं नेल्लि नेल्लिमार उसरकाय वेल्ली Emblic myroblan Phylanthus Amblica
कृत्तिका उंबर उदुंबर उदुंबर /गुलर यशडुमुर उंबरो अति फा अतिमार अत्तिमानु Fig tree Ficus glomirata
रोहिणी जांभुळ जम्बूफलम् - - - - - - - -
मृग खैर खदिर खदिर - खेर - - - - -
आर्द्रा कृष्ण अगरू /कृष्णागरु कृष्णागरु कृष्णागरु कृष्णागरु अकिल - - कृष्णागरु Eaglewood(Black) Aquilaria agallocha
पुनर्वसु वेळु वंश बांस - - - - - Bamboo cane Bambusa vulgaris
पुष्य पिंपळ अश्वत्थ पीपर पीपलो - - - - - -
आश्लेषा नागचाफा - - - - - - - - -
मघा वड वट बड/ वट - - - - - Banyan tree Ficus bengalensis
पूर्वा फाल्गुनी पळस पलाश पलाश - खाखरो - - - - Butea monosperma
उत्तरा फाल्गुनी पायरी वृक्ष - - - - - - - - -
हस्त जाई मालति चंबेली - चमेली - - - Spanish Jasmine Jasminum Grandifloram
चित्रा बेल /बिल्व बिल्व बेल - बिली - - - Bengal Queens Eagle Marmalose
स्वाती अर्जुन वृक्ष अर्जुन कौहा / कोह अर्जुन अर्जुन-
साजडा
-मारुत मारुड मदिचट्ट - Terminalia Tomentosa/ Serculiaurens
विशाखा नागकेशर - - - - - - - - -
अनुराधा नागकेशर - - - - - - - Cubeb -

Piper cubeba

ज्येष्ठा सांवर /सांवरी शाल्मली शाल्मली / सेवर - शेमळो - - - Silk cotton tree Bombax malabaricum
मुळ राळ अजकर्ण साल/हेंद - राल - - - Shorearobustra Veteria Indica
पूर्वाषाढा वेत वेतस् बैंत - नेतर - - - Rattan(cane) Calamas rotang
उत्तराषाढा फणस पनस कटहर - फनस - - - - -
श्रवण रुई अर्क आंकडा - आंकडो - निलाजि ल्लीटे - Gigantic Swallow wart Calotropis Gigantea
धनिष्ठा शमी शमी समी/ सफेद कीकर - खिजडी - - शमी/ चेट्ट Spung tree Prosopis Sticigero
शततारका कळंब वृक्ष कदंब कदंब - कदंब - - - kadamb Anthokefalas indicus
पूर्वभाद्रपदा आंबा आम्रम् आम आंबो मावु मामरं मवि Mango Mangifer indica
उत्तराभाद्रपदा कडुलिंब निम्ब/ तिक्तक/ अरिष्ट नीम नीमगाछ लींबडो वेप्पु/ अतितिक्त कड्डपगै/ अरुलुंदी निम्बमु Indian Lilak Azadirachta Indica
रेवती मोह मधुक महुवा - महुडो - - - Ellopa Tree Bassia Latifolia

संदर्भ

संपादन