सांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते.

सांवर
सांवर/ काटेसावरीची पाने

वर्णनसंपादन करा

सांवर बॉम्बॅक्स कुळातील इतर झाडांप्रमाणेच,कापसाचे झाड म्हणूनच ओळखले जाते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे. हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतूमध्ये नव्या पालवीपूर्वी याला आधी फुले येतात, व नंतर फळे. पिकलेल्या फळांमध्ये कापसासारखे तंतू असतात.

लागवडसंपादन करा

हे झाड मलाया देशात लावले जाते. इंडोनेशिया, दक्षिणचीन, हाँगकाँगतैवान इत्यादी ठिकाणी हे आढळते.भारतात बंगालमध्ये आणि हिंदी भाषा भागात याला सेमल म्हणून ओळखतात. याच्या सुंदर दिसणाऱ्या फुलांमुळे हे अनेक ठिकाणी लावतात. हा वृक्ष ६० मीटर उंचीपर्यंतसुद्धा वाढू शकतो.

वापरसंपादन करा

यातून निघणारा कापूस हा साध्या कापसास पर्याय म्हणून वापरता येतो.तो अत्यंत मऊ असतो. या झाडापासून काडेपेट्या तयार केल्या जातात. या झाडाचे संस्कृत नाव "शाल्मली" आहे.ऋग्वेदात,(ऋग्वेद-१०.८५.२०) यापासून रथ बनवीत असत असा उल्लेख आहे.

चित्र दीर्घासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहासंपादन करा