साचा:वनमाला चौकट

जाई फूल.

जाईची फुले


  • जाई हे एक प्रकारचे सुगंधी फूल असून तिच्या वेलीचा वेलवर्गीय कुळात समाविष्ट होतो.
  • शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L.
  • कुळ: Oleaceae
  • इतर भाषांमधील नावे: संस्कृत जातिका, चंबेली, हिंदी चंबाली, 'इंग्रजी Spanish jasmin, इतर- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा
  • वर्णन: सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.
    पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकारमानाच्या असतात.
    जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.
    जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे या फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.
  • उपयोग:
  1. अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे.
  2. जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.

हा हस्त नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

नवी चौकट प्रयोग

संपादन