अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी)

(अमृतेश्वर मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीचे १८८० मधील चित्र
अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीचे सध्याचे छायाचित्र

मंदिराची रचना

संपादन

मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. [] मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठराविक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

संपादन

या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ हेन्री कझिन्स. मेडिईव्हल टेम्पल्स ऑफ दि दख्खन (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

चित्रदालन

संपादन