माणकेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील झोडगे या गावात असलेले शिवमंदिर आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे.

स्थान

संपादन

झोडगे गावाच्या दक्षिणेस हे शिवालय आहे. मंदिराच्या दक्षिणेस झुटुंबा डोंगर (झोटिंगाचा डोंगर) आहे. झुटुंबा ऊर्फ झोटिंगबाबा या नाथपंथीय साधूच्या वास्तव्यावरून या डोंगराला नाव पडलेम् असे मानले जाते [ संदर्भ हवा ].मंदिराविषयी अधिक जाणुन घेण्यासाठी "माझे गाव" येथे जा.

मंदिराची रचना

संपादन

बाहेरील रचना

संपादन

सारीपाटाच्या चौकटीसारखी देवालयाची रचना आहे. मंदिराच्या भिंतींवर पौराणिक विषयांवरील शिल्पे आहेत. शिवाय मुख्य मंदिराच्या छोट्या प्रतिकृतींप्रमाणे भासणारी उरुशृंगे कळसापर्यंत प्रमाणबद्धपणे बसवली आहेत. भिंतींवरील शिल्पांमध्ये काही कामशिल्पेही आढळतात. मंदिराला दर्शनी भागावर व डाव्या-उजव्या बाजूला प्राण्यांच्या शिल्पाकृती असलेली महिरप आहे. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला सन्मुख असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे. जमिनीपासून ४०-५० फुटांवर साधनेसाठी खोली आहे. माध्यान्हीच्या सूर्याची किरणे शिवलिंगावर पडू शकतील, असे छोटे छिद्र कळसावर आहे.

आतील रचना

संपादन

प्रवेशद्वार ते सभामंडपादरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. सभामंडपात दोन मोठे, अखंड खांब आहेत. सभामंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूला शिल्पशास्त्रात भोगमंडप संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या दोन खोल्या आहेत. या खोल्यांत देवाला अर्पण करावयाच्या वस्तू ठेवल्या जात. सभामंडप ते गाभारा यांदरम्यान दगडी कासव आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही उभ्या बाजूंना यक्ष-किन्नर-गंधर्वाचे शिल्प व वरील आडव्या बाजूच्या मध्यभागी गणपतीचे शिल्प आहे. गाभाऱ्यात उत्तराभिमुखी शिवलिंग आहे.