सय्यद अमीन मराठी लेखक होते. मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1915 सांगली येथे झाला. सांगली नगरीला मराठी साहित्याची परंपरा सुरू करण्यात सय्यद अमीन यांचा मोलाचा वाटा लाभला आहे.[] त्यांनी मराठी साहित्य क्षेत्राला मुस्लिम समाज जीवनाची ओळख करून दिली. भारताच्या संमिश्र म्हणजे गंगा-जमुनी संस्कृतीचे ते वाहक होते. अर्वाचीन काळात मुस्लिम मराठी साहित्याची सुरुवात सय्यद अमीन यांच्या पासूनच होते. 17 डिसेंबर 1973 रोजी त्यांचे सांगली येथे अपघाती निधन झाले.[]

सय्यद अमीन
जन्म 20 ऑक्टोबर 1915
मृत्यू 17 डिसेंबर 1973
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी

मुस्लिम मराठी साहित्य ही संज्ञा त्यांनी सर्वप्रथम सन 1936च्या दरम्यान वापरली 1935 ते 1936 मध्ये ‘मुस्लिम मराठी साहित्य पत्रिका’ त्यांनी संपादीत करून चालवली. महाराष्ट्रभर त्याचे वर्गणीदार होते. हीच सकल्पना राबवून 1990 साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

सय्यद अमीन एक थोर लेखक व विचारवंत होते. 10 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांची पुस्तके शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे अभ्यासक्रमासाठी लागलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेनेट तसेच मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकरी मंडळाचे सभासद होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.[]

राजकीय कारकीर्द

संपादन

सय्यद अमीन एक ख्यातकीर्त राजकारणी होते. ते 1936 ते 1942 पर्यंत सांगली नगरपालिकेचे लोकनियूक्त सदस्य होते. सांगलीच्या लोकल बोर्डामध्येही त्यांची वर्णी लागली होती. सांगली जिल्हा काँग्रेस कमेटीच्या पार्लेमेन्ट्री बोर्डातही त्यांनी काम केले. तत्कालान उद्योग मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजारामबापू पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

1949 ते 1952 अखेर ते मुंबई प्रातांचे आमदार होते. मुरारजी देसाई, काँग्रेसचे थोर नेते यशवंतराव चव्हाण, माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, माजी उपराष्ट्रपती राधाकृष्णन, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, बॅ. ए. आर. अंतुले, बॅ. जी.डी. पाटील, बॅ. गुलाबराव पाटील यांच्याशी घनीष्ठ संबध होते.

प्रकाशित साहित्य

संपादन

1) हजरत मुहंमद पैगंबर

2) इस्लाम आणि नीतिशास्त्र

‌3) अतातुर्क गाझी कमालपाशा (1942)

4) इस्लाम आणि संस्कृती (1950) []

5) महापुरुष छत्रपती शिवाजी (1974) []

6) आबला (कादंबरी)

7) इस्लाम संस्कृती

8) आदर्श खलीफा

9) हिंदू मुस्लिम सांस्कृतिक मिलाफ

10) ऐतिहासिक हिंदी मुसलमान

11) भारतीय शूर स्त्रिया

12) राष्ट्रपती ङाॅ.झाकीर हुसेन

राष्ट्रपती ङाॅ.झाकीर हुसेन

* महापुरूष छत्रपती शिवाजी

* सम्राट

* अबला

* आदर्श खलीफा

* प्राचीन भारतीय संस्कृती

  1. ^ http://kalimajeem.blogspot.com/2017/11/blog-post_15.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.lokmat.com/sangli/combining-literature-hindu-muslim-culture/. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://www.aksharnama.com/client/article_detail/1429. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://www.amazon.in/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF-CULTURE-Marathi-ebook/dp/B082T34PMT. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ "शिवचरित्राचा महाराष्ट्राबाहेरील प्रसार: एक आढावा".