ग.रा.कामत (जन्म : चरी-अलिबाग, १२ मार्च १९२३; - मुंबई, ६ ऑक्टोबर२०१५) हे एक मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते. त्यांच्या पटकथा खूप गाजल्या.ते मराठी लेखक, समीक्षक आणि इतिहास संशोधक न.र. फाटक यांचे शिष्य होते. कामत हे मौज आणि सत्यकथा या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. नवसाहित्य या शब्दाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.[]

कौटुंबिक माहिती

संपादन

अलिबागमधील चरी या गावी १२ मार्च १९२३ रोजी कामत यांचा जन्म झाला.[] मराठी अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्‍नी होत. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. त्यांना माधवी आणि संजीवनी नावाच्या मुली आहेत.

ग.रा. कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट

संपादन

ग.रा. कामत यांची कथा/पटकथा असलेले हिंदी चित्रपट

संपादन
  • अनिता (१९६७)
  • कच्चे धागे (१९७३)
  • काला पानी (१९५८)
  • तेरी मॉंग सितारोंसे भर दूॅं (१९८२)
  • दो चोर (१९७२)
  • दो प्रेमी (१९८०)
  • दो बदन (१९६६)
  • दो रास्ते (१९६९)
  • पुकार (१९८३)
  • बंबई का बाबू,
  • बसेरा (१९८१)
  • मनचली (१९७३)
  • मेरा गॉंव मेरा देश (१९७१)
  • मेरा साया (१९६६)
  • मैं तुलसी तेरे ऑंगन की (१९७८)

पुस्तके

संपादन
  • जगदीशचंद्र बोस (चरित्र, इंग्रजी)
  • भीष्माचा डोंगर
  • रात्र थोडी सोंगं फार (अनुवादित, मूळ जर्मन लेखक - जोसेफ डब्ल्यू मीघर)
  • शमानिषाद (संपादित, द.ग. गोडसे आणि म.वि. राजाध्यक्ष यांच्या लेखांचे संकलन)
  • The Queen's Necklace (संपादित, मूळ लेखक - लुई फर्नांडिस)

सन्मान आणि पुरस्कार

संपादन
  • कामत यांची कथा असलेल्या ’शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
  • मुंबई दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीचा ’सह्यादी जीवनगौैरव पुरस्कार (एप्रिल २०१५)
  • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव’ पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://navshakti.co.in/mumbai/218184/[permanent dead link]
  2. ^ "ग. रा. कामत यांचे निधन". महाराष्ट्र टाइम्स. ७ ऑक्टोबर २०१५. ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]