सलील कुलकर्णी

मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि लेखक

डॉ. सलील कुलकर्णी (६ ऑक्टोबर, इ.स. १९७२; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे नावाजलेले मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि लेखक आहेत.

डॉ. सलील कुलकर्णी
Dr Saleel Kulkarni.jpg
टोपणनाव सलील
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९७२
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, वैद्यक
संगीत प्रकार मराठी पॉप संगीत
प्रशिक्षण डॉक्टर
प्रसिद्ध आल्बम आयुष्यावर बोलू काही
नामंजूर
प्रभावित पं. गंगाधरबुवा पिंपळखरे
जयमाला शिलेदार
प्रमोद मराठे
पत्नी अंजली कुलकर्णी
अपत्ये शुभंकर कुलकर्णी
अनन्या कुलकर्णी
पुरस्कार पुलोत्सव तरुणाई पुरस्कार

कारकीर्दसंपादन करा

सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.

गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरू केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.

झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.

नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम) आणि अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम) हे विशेष गाजले आहेत.

दूरचित्रवाणी वरील सा रे ग म प तसेच गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते सारेगमपमधील परिक्षकापर्यंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहानथोरांचे आवडते झाले आहेत.

वैयक्तिकसंपादन करा

डॉ. सलील कुलकर्णी यांचे लग्न सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांची मुलगी अंजली कुलकर्णी यांच्याशी झाले असून त्यांना शुभंकर कुलकर्णी आणि अनन्या कुलकर्णी ही अपत्ये आहेत. ते आणि अंजली कुलकर्णी पुण्यात कोथरूड मध्ये सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल चालवतात. [ कालसापेक्षता टाळा]


अल्बमसंपादन करा

चित्रपटसंपादन करा

 • एकदा काय झालं (पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार)
 • एक उनाड दिवस (संगीतकार)
 • चकवा (संगीतकार)
 • जन गण मन (संगीतकार)
 • चिंटू (संगीतकार)
 • वेडिंगचा शिनेमा (दिग्दर्शन)
 • हापूस (संगीतकार)

पुस्तकेसंपादन करा

 • लपवलेल्या काचा (आठवणी) - प्रकाशन एप्रिल २०११
 • शहाण्या माणसांची फॅक्टरी (संकीण ललित लेखन) - प्रकाशन २६ जानेवारी, २०१७

वृत्तपत्र लेखनसंपादन करा

लोकसत्ता तसेच सकाळ या वृत्तपत्रामध्ये ते स्तंभ लेखन करतात.

पुरस्कारसंपादन करा

 • स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेचा १९९८सालचा केशवराव भोळे पुरस्कार
 • आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने ४ नोव्हेंबर २०११ रोजी सन्मानित करण्यात आले. सलील कुलकर्णी यांचे आधीच्या वर्षातील काही साहित्य, काव्य, संगीत, चित्रपट, नाटक आदी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला.
पुरस्कार तारीख कारण
केशवराव भोळे पुरस्कार इ.स. १९९८ उत्कृष्ट संगीतकार
दत्ता डावजेकर फाउंडेशनचा पुरस्कार नोव्हेंबर २१, इ.स. २००९ उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक(चित्रपट- हाय काय नाय काय)
रोटरीचा पुरस्कार मार्च ११, इ.स. २०१० विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने - बालगंधर्व पुरस्कार ऑगस्ट १४, इ.स. २०११
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार नोव्हेंबर ४, इ.स. २०११
संस्कृती प्रतिष्ठानचा पुरस्कार मे २७, इ.स. २०१३ संस्कृती कला पुरस्कार

बाह्य दुवेसंपादन करा

[१] "डॉ. सलील कुलकर्णी पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने सन्मानित".[permanent dead link]

सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेली गाणी

सलील कुलकर्णी यांनी गायलेली गाणी