रामचंद्रशास्त्री किंजवडेकर
रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर हे एक मराठी विद्वान शास्त्री होते. त्यांनी अनेक संकृत ग्रंथांचे मराठी आणि इंग्रजी अनुवाद केले.
रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी 'रघुवंश,मेघदूत' या संस्कृत काव्यांवर जी सार्थ-सटीप पुस्तके लिहिली, त्यांचे संपादन रामचंद्रशास्त्री किंजवडेकर ह्यांनी केले होते.
पुस्तके
संपादन- अष्टांग संग्रह
- अष्टांग संग्रह : निदानस्थानम्
- श्रीसंत एकनाथ महाराजांची अभंगाची गाथा (संपादित, १९५३, सहसंपादक - द.अ आपटे)
- अभंगाची गाथा (एकनाथ) (संपादित, १९५६, सहसंपादक - द.अ आपटे)
- कणिक नीति
- निदानस्थानम् (संपादित)
- प्रबोधसुधाकर
- प्रार्थना प्रयोजन आणि सिद्धि
- भक्तिरस नवनीत (संपादन)
- संपूर्ण महाभारत (किमान ७ भाग, मराठी अनुवाद)
- श्रीः महाभारतम् : चतुर्धरवंशावतंस श्रीमन्नीलकण्ठविरचितभारतभावदीपाख्यटीकया समेतम् (रामचंद्रशास्त्री किंजवडेकर इत्येतैः पाठान्तरटिप्पण्यादियोजनया समलङ्कृतम्)
- मीमांसापरिभाषा
- मीमांसापरिभाषा : अर्थदीपिका रहस्यबोधिनीसह (संस्कृत-मराठी)
- मेघदूत मूळ श्लोक संस्कृत, मल्लिनाथ संजीवनी संस्कृत टीका, मराठी अन्वयार्थ, सरलार्थ सूचि इत्यादीसह (संपादन) (अनुवाद - रामचंद्र गणेश बोरवणकर
- योगतारावली.
- रघुवंश (भाग १ ते ५, मराठी अनुवाद)
- मराठी लघुसिद्धान्तकौमुदी : संधी आणि सुबन्त प्रकरण भाग १, २.
- मराठी लघुसिद्धान्तकौमुदी :सुबन्त प्रकरण
- श्रीशंकराचार्य-ग्रंथमाला, प्रथम पुष्प : प्रबोधसुधाकर
- शंकराचार्यांचे पाच ग्रंथ
- हरिवंशावरील नीलकंठ याच्या भावदीप नावाच्या टीकेचा मराठी अनुवाद
- सार्थ हितोपदेश
- सार्थ हितोपदेश - मित्रलाभ (मराठी अनुवाद, सहलेखक - रामचंद्र गणेश बोरवणकर)