एस.डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहेत. हे कथालेखन, वैचारिक लेखन आणि समीक्षण करतात.

इनामदारांनी लिहिलेल्या रूपबंध या पुस्तकात त्यंनी पाश्चात्त्य आधुनिक कलेतील विविध तत्त्वप्रणाली, कलासंप्रदाय व चळवळींची माहिती तसेच त्यामागच्या सैद्धांतिक भूमिका मांडल्या आहेत. त्याशिवाय दृश्यकला-ललितकला, दृश्यकला-ललित साहित्य, आधुनिक कलेला वेगळा आयाम देणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृती यांच्याबद्दलही लिहिले आहे. या ग्रंथाला चिंतनात्मक बैठक आहे. रुपवेधला २०१७ सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार देण्यात आला.

पुस्तके संपादन

  • अरण्यरुदन (कथासंग्रह)
  • काचेचा पिंजरा (अनुवादित कादंबरी)
  • खेळिया (कथासंग्रह)
  • दिगंतराचे पक्षी (अनुवादित कादंबरी)
  • नागरिक (कथासंग्रह)
  • प्राक्तनाचे वेध (समीक्षाग्रंथ)
  • मर्मभेद (दिवंगत तत्त्वज्ञ मे.पुं. रेगे यांच्या वैचारिक लेखांचे संकलन-संपादन)
  • रंगसावल्या (कथासंग्रह)
  • रूपबंध (कलाविषयक समीक्षाग्रंथ)

पुरस्कार संपादन