किशोर आरस

एक मराठी ललित लेखक


किशोर आरस हे एक मराठी ललित लेखक आहेत. त्यांनी सातत्याने केलेले ललित लिखाण अंतर्नाद, अंबर, कालनिर्णय, पद्मगंधा, लोकसत्ता, दीपलक्ष्मी आदी दिवाळी अंकांतून प्रकाशित झाले आहे.

किशोर आरस यांचा जन्म कोकणात कोचरे गावात त्यांव्या आजोळी झाला. मुंबईत ते कानजी खेतसी चाळीत रहात. सिडनहॅम काॅलेजमधून शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबईत 'बेस्ट'मध्ये काही काळ नोकरी केली. व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी मुंबईतील गेस्ट कीन विल्यम्स, इंडियन टूल्स आणि कमानी इंजिनिअरिंग सारख्या काराखान्यांतून व्यवस्थापन सल्लागाराच्या नोकऱ्या केल्या.

मुंबई, मुंबईचा मराठी माणूस, एकूण समाजव्यवस्था, सामाजिक आणि वैचारिक मूल्ये आणि सामान्य मध्यमवर्गीय माणूस हे आरस यांच्या चिंतनाचे विषय राहिले आहेत. त्यांच्या लिखाणामधून या विषयांवरील भाष्य वाचायला मिळते.

पॉप्युलर प्रकाशनाच्या जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या लेखांचे संकलन ‘पॉप्युलरचं अंतरंग’ या नावाने प्रकाशित झाले आहे. संकलनाचे काम किशोर आरस यांनी केले आहे.

किशोर आरस यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • आठवणीतल्या आठवणी (आत्मनिवेदने)
  • बावाजींच्या सुरस कथा आणि इतर ललित लेख
  • भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत दुनियेत : व्यवस्थापन कसं नसावं याचा आदर्श वस्तुपाठ (अनुवादित; मूळ इंग्रजी, In the Wonderland of Indian Managers, लेखक - शरू रांगणेकर)
  • रेशीमबंध (ललित)
  • व्यवस्थापन कौशल्य संधी आणि सिद्धी (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - शरू रांगणेकर)



(अपूर्ण)