अनंत ओगले
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय हे बव्हंशी ऐतिहासिक आहेत. त्यांनी अनेक चरित्रे लिहिली आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या कादंबरीकारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी काही नाटकांचे लेखनही केले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारक, समाज सुधारक, नेते यांच्यावर ओगले यांचा अभ्यास आहे. मराठेशाही हा त्यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यांचा महाराष्ट्राभिमान त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येतो. त्यांनी लिहिलेली चरित्रे व कादंबऱ्या यांचे विषय मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवा, सातारचे छत्रपती शाहू महाराज, हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, जोतीराव फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, नाना फडणवीस असे चरित्रात्मक आहेत. चिपळूणकरांवरील त्यांच्या कादंबरीस दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीदेखील गौरविले आहे. गांधीहत्या, होळकरशाही हे विषय काहीसे वादातीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित 'होय मी सावरकर बोलतोय' हे नाटक तर कौटुंबिक जीवन मांडणारे 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' हे नाटक ओगले यांनी लिहिले आहे. 'होय मी सावरकर बोलतोय' या राजकीय नाटकात अभिनेता आकाश भडसावळेने मुख्य भूमिका साकारली आहे; तसेच निर्मितीही त्याच्याच संस्थेची आहे. बालगंधर्व यांच्या आयुष्यावर 'तो एक राजहंस' आणि दीनानाथ मंगेशकर यांच्यावर 'संगीतरत्न दीनानाथ' या नाटकाचे लेखनही ओगले यांनी केले आहे.
त्त्यांचे पुत्र गोपाळ अनंत ओगले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र वृतपत्र सुरू झाले
अनंत ओगले यांची पुस्तके
संपादन- अजात शत्रू (छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरची चरित्र कहाणी)
- अठ्ठेचाळीसचा अग्निप्रलय
- अॅडॉल्फ हिटलर : एका झंझावाती गरुडाची कहाणी (कादंबरी)
- अस्त गांधीयुगाचा आणि नंतर
- आया मल्हार (मल्हारराव होळकर यांच्या जीवनावरची कादंबरी)
- करुणासागर (जोतिबा फुले यांच्या जीवनावरची कादंबरी)
- जळीत (महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या महाराष्ट्रातील जळिताच्या पार्श्र्वभूमीवरची कादंबरी)
- तो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावरील संगीत नाटक, सहलेखक - आकाश भडसावळे)
- ध्रुवाचा तारा (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)
- दयानंद (स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र)
- पहिला हिंदुहृदयसम्राट (सावरकरांचे व्यक्तिचित्रण)
- फाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची
- भाषाशिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर (आधीचे नाव वृत्तसुदर्शन)
- वृत्तसुदर्शन (विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या जीवनावरील कादंबरी); भाषाशिवाजी या नावाने पुनःप्रकाशित
- होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
- बखर मराठेशाहीची (लढवय्ये मराठ्यांचा इतिहास)
- बखर हिंदुमहासभेची (हिंदू महासभा या संस्थेचा इतिहास)