कुमार केतकर

भारतीय राजकारणी

कुमार केतकर (जन्म : ७ जानेवारी १९४६) : हे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत.

कुमार केतकर

दैनिक लोकसत्ताचे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली आॅब्झर्वर'चे निवासी संपादक तसेच इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राचे संपादक होते.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन)
  • शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन)
  • विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन)
  • वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवलाआहे.[१]

पुरस्कार

संपादन
  • लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार - पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने.
  • पद्मश्री पुरस्कार- (इ.स. २००१)
  • राजीव गांधी पुरस्कार
  • नवरत्न पुरस्कार
  • रत्नदर्पण पुरस्कार
  • चिंतामणराव देशमुख पुरस्कार - अर्थविषयक लिखाणाबद्दल.