प्रभाकर कृष्णाजी कुंटे

डॉ. प्रभाकर कृष्णाजी कुंटे (जन्म : इ.स. १९३०; - पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५ [ संदर्भ हवा ] ) हे एक मराठी खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते. त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अंतरिक्ष वारकरी
  • खग्रास सूर्यग्रहण
  • ताऱ्यांचे अंतरंग
  • दुर्बिणींचे विश्व’ या कै. सुनील जोगळेकर यांनी १९८९ साली लिहिलेल्या पुस्तकातले ’रेडिओ खगोलशास्त्र' हे अकरावे प्रकरण
  • धूमकेतूची स्वारी
  • भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र)
  • मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक)
  • व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)