दत्तात्रय रामचंद्र केतकर

दत्तात्रय रामचंद्र केतकर उर्फ द.रा. केतकर हे एक मराठी इतिहास अभ्यासक आहेत.[]

दत्तात्रय रामचंद्र केतकर
जन्म नाव दत्तात्रय रामचंद्र केतकर
टोपणनाव द.रा. केतकर
जन्म १९ जुलै, इ.स. १९४०
मुंबई
शिक्षण पदव्युत्तर रसायनशास्त्र, मुंबई विद्यापीठ
पीएच.डी इलेक्ट्रोफ्लोटेशन भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, विज्ञान
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकार इतिहास
विषय नौकानयनशास्त्र, मराठा इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती सरखेल कान्होजी आंग्रे... मराठा आरमार
माझी इतिहासातील मुशाफिरी
स्वाक्षरी दत्तात्रय रामचंद्र केतकर ह्यांची स्वाक्षरी

द. रा.केतकर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील विले पार्ले येथील पार्ले टिळक विद्यालय झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयात प्रवेश घेतला. इ.स. १९६१ साली तेथून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. इ.स. १९७४ साली त्यांनी रसायनशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८६ साली पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे "फाईन पार्टिकल फ्लोटेशन- इलेक्ट्रोफ्लोटेशन" या विषयावर पीएचडी प्रबंध सादर केला.

त्यानंतर ते भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे मेटॅलर्जी अँड मटेरियल सायन्स प्रयोगशाळा व्यवस्थापक या पदावर रुजू झाले. याच संस्थेत त्यांनी "ओअर ड्रेसिंग लॅबोरेटरी व फाईन पार्टीकल लॅबोरेटरी मध्ये काम केले. इ.स. २००३ साली ते सेवानिवृत्त झाले.[]

पुस्तके

संपादन
  • सरखेल कान्होजी आंग्रे... मराठा आरमार, १९९७ (हिंदी भाषांतर - भारत की अजेय नौसेना, मो.ग. तपस्वी, २००१)
  • माझी इतिहासातील मुशाफिरी, २०१५
  • रांगोळी- एक कला ( सहलेखिका- सुषमा द. केतकर)
  • भारतीय नौकानयनाचा इतिहास
  • Science and Technology in Ancient India. (सहलेखक- द.रा. केतकर)

संदर्भ

संपादन

नोंदी

संपादन
  • केतकर, दत्तात्रय. सरखेल कान्होजी आंग्रे... मराठा आरमार.