जोगेश्वरी
मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक
जोगेश्वरी हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. अंधेरीच्या उत्तरेस वसलेले जोगेश्वरी येथील अनेक गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
वाहतूक
संपादनजोगेश्वरी रेल्वे स्थानक हे जोगेश्वरीमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवलीकडे जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरीच्या पूर्वेकडून धावतो. जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता जोगेश्वरीला विक्रोळीसोबत जोडतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडून पूर्व उपनगरांकडे जाणारी बव्हंशी वाहने ह्या रस्त्याचा वापर करतात.