जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता
जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता (Jogeshwari – Vikhroli Link Road; संक्षेप: जे.व्ही.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, पवई इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून आय.आय.टी. मुंबई ह्याच मार्गावर आहे.
जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता | |
---|---|
मुंबईच्या नकाशावर गडद निळ्या रंगात जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता | |
अंधेरी पूर्व येथील सीप्झजवळील एक फलक | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | १०.६ किलोमीटर (६.६ मैल) |
सुरुवात | पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी |
शेवट | पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी |
स्थान | |
शहरे | मुंबई |
जिल्हे | मुंबई उपनगर जिल्हा |
राज्ये | महाराष्ट्र |
१९९४ साली खुला करण्यात आलेल्या ह्या रस्त्याचे २०१२ साली मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले. ह्यासाठी विश्व बँकेने प्रायोजित केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील रुपये २२१.४५ कोटी इतका निधी वापरण्यात आला.