राष्ट्रीय महामार्ग ३
राष्ट्रीय महामार्ग ३ (National Highway 1) हा भारताच्या पंजाब, हिमाचल प्रदेश व लडाख ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील अटारी ह्या गावामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ५५६ किमी धावून लडाखची राजधानी लेह येथे संपतो. अमृतसर, कर्तारपूर, जालंधर, होशियारपूर, हमीरपूर, मंडी, कुलू, मनाली ही नगरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ३ | |
---|---|
राष्ट्रीय महामार्ग ३ चे नकाशावरील स्थान | |
लेह-मनाली महामार्गावरील कुलू | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | ५५६ किलोमीटर (३४५ मैल) |
देखरेख | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण |
सुरुवात | अटारी, पंजाब |
शेवट | लेह, लडाख |
स्थान | |
शहरे | श्रीनगर, बारामुल्ला, द्रास, कारगिल, लेह |
राज्ये | पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख |
इतिहास
संपादन२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील तीन महामार्गांचे भाग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ३ची निर्मिती करण्यात आली.
- अटारी - जालंधर पट्टा - राष्ट्रीय महामार्ग १
- जालंधर - मंडी पट्टा - राष्ट्रीय महामार्ग ७०
- मंडी - मनाली पट्टा - राष्ट्रीय महामार्ग २१
- मनाली - लेह पट्टा - लेह–मनाली महामार्ग
मार्ग
संपादनराष्ट्रीय महामार्ग ३चा मोठा हिस्सा हिमालय पर्वतरांगांमधून वाट काढत जातो. ह्या मार्गावरील मनाली ते लेह दरम्यान जगातील सर्वात उंचीवर असलेले काही घाट अस्तित्वात आहेत. ह्यांपैकी बरेचसे घाट हिवाळ्यामध्ये हिमवृष्टीमुळे बंद राहतात. सुमारे १३,००० फूट उंचीवर असलेला रोहतांग घाट कुलू जिल्ह्याला लाहौल आणि स्पिति जिल्ह्यासोबत जोडतो. रोहतांग घाटावरील ताण कमी करण्यासाठी २०१० साली अटल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच सुमारे १६,००० फूट उंचीवर असलेला लुंगालाचा घाट व १७,४८० फूट उंचावरील टगलांग ला हे दुर्गम घाट राष्ट्रीय महामार्ग ३ वर आहेत.
जुळणारे प्रमुख महामार्ग
संपादन- अमृतसर - राष्ट्रीय महामार्ग ५४
- जालंधर - राष्ट्रीय महामार्ग ४४
- लेह - राष्ट्रीय महामार्ग १