राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई-आग्रा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ११६१ किमी धावणारा हा महामार्ग भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आग्रा ह्या शहराशी जोडतो[]. ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नाशिकठाणे ही रा. म. ३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ३ वरील आग्रा ते ग्वाल्हेर हा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ३
लांबी ११६१ किमी
सुरुवात आग्रा
मुख्य शहरे आग्रा - ग्वाल्हेर - इंदूर - धुळे - नाशिक - मुंबई
शेवट मुंबई
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - आग्रा
रा. म. ११ - आग्रा
रा. म. ७५ - ग्वाल्हेर
रा. म. ७६ - शिवपुरी
रा. म. १२ - बिओरा
रा. म. ५९ - इंदूर
रा. म. ६ - धुळे
रा. म. २११ - धुळे
रा. म. ५० - नाशिक
रा. म. ४ - ठाणे
रा. म. ८ - मुंबई
राज्ये उत्तर प्रदेश: २६ किमी
राजस्थान: ३२ किमी
मध्य प्रदेश: ७१२ किमी
महाराष्ट्र: ३९१ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

रा. म. ३ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे

संपादन

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन
  1. ह्या महामार्गावरील ग्वाल्हेर ते आग्रा या शहरांमधिल २५३ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[]
  2. ह्या महामार्गावरील ३७५ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ३चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-30 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग ३चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ