इगतपुरी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इगतपुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव आहे. येथे महिंद्रा आणि महिंद्राचा इंजिने बनवण्याचा कारखाना आहे. तसेच ध्यानाचे शिक्षण देणारे विपश्यना केंद्र येथे आहे. हे मुंबई आग्रा महामार्गावरील गाव आहे.
हवामान
संपादनइगतपुरी आणि खंडाळा या दोहोंची उंची साधारण सारखीच म्हणजे जवळपास १९०० फुट आहे.इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदध झाले आहे.या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
पिके
संपादनभात हे येथील प्रमुख पीक. या शिवाय परिसरात नागली.तसेच भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.तसेच कडधान्य पिके देखील घेतली जातात. टोमॅटो, काकडी, दोडका, कारले, वांगी, शिमला मिरची, ज्वाला मिरची इत्यादी बागायती पिके पिकवली जातात.
पर्यटन स्थळे
संपादनइगतपुरीत मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण - २६ कि.मी.,भंडारदरा - ३५ कि.मी.,खोडाळा - ३० कि.मी.,सुंदरनारायण गणेश मंदिर देवबांध- ३५ कि.मी. कि.मी.,याशिवाय कुलंग,अलंग,मदनगड,कळसूबाई,रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी,रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे.कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली,उंट दरी,पाच धबधबे,असे सुंदर ठिकाणे आहेत.कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो.तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे .बौद्ध धर्मातील विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून,तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात.इगतपुरीहुन साधारण ४०-५० किमी अंतरावरील भंडारदरा धरण उत्तम ठिकाण आहे. (घोटी - सिन्नर मार्ग).तसेच घोटी या गावाजवळून कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत.घोटी येथील तांदूळ, मुरमुरे , व भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
इगतपुरी जवळच धनुष्यतीर्थ धबधबा, विपश्यना केंद्र पाहण्यासारखे आहे.
कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. [१]
लोहमार्ग
संपादनइगतपुरी हे मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
इगतपुरी तालुक्यातील काही गावे
संपादनम्हसूर्ली, टिटोली, बोरटेंभे, इंदोरे, टाकेघोटी, वाकी, कुर्णोली, बलायदुरी, तळोघ, तळोशी, माणिकखांब, मुंढेगांव, खैरगांव, देवळे, घोटी, नांदगांवसदो, पिंपरीसदो, मानवेढे, फांगुळगांव, धामणगाव, कावनई, मालुंजे, दौंडत, वैतरणा, धारगाव, कोरपगाव,कांचनगाव,काळूस्ते, शेनीत,साकुर, पिंपळगाव डुकरा,पिंपळगाव घाडगा, शेणवड बु,उंबरकोन, शिरसाठे,मोडाळे,सांजेगाव,नांदडगाव,आवळी दुमाला, कुशेगाव, आहुर्ली, शेवगेडांग, वांजुळे, मालुंजेवाडी, समनेरे, आशाकिरणवाडी, सोमज, मोगरे, वाघेरे, कानडवाडी, दरानेवाडी, बेलगावतऱ्हाळे, अधरवड,अडसरे खु,अडसरे बू,टाकेद बू, ठाकूरवाडी इत्यादी अनेक गावे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात आगरी समाज, मराठा समाज तसेच आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे.