राष्ट्रीय महामार्ग १

राष्ट्रीय महामार्ग १ (National Highway 1) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीरलडाख ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १ डी ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग श्रीनगरला लेहसोबत जोडतो. हिमालयामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेच्या जवळून धावतो. बारामुल्ला, सोनमर्ग, झोजी ला, द्रास, कारगिल इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

राष्ट्रीय महामार्ग १
Map
राष्ट्रीय महामार्ग १ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ५३४ किलोमीटर (३३२ मैल)
सुरुवात श्रीनगर
शेवट लेह
स्थान
शहरे श्रीनगर, बारामुल्ला, द्रास, कारगिल, लेह
राज्ये जम्मू आणि काश्मीर, लडाख

लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: लेह-मनाली महामार्ग).

जुळणारे प्रमुख महामार्ग

संपादन