मनाली
मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर.या शहराची लोकसंख्या २२५४ (१९८१). हे शिमल्याच्या उत्तरेस सुमारे २५० कि.मी. समुद्रसपाटीपासून १७९८ मी. उंचीवर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.
मनाली | |
भारतामधील शहर | |
एक भूदृश्य |
|
देश | भारत |
राज्य | हिमाचल प्रदेश |
जिल्हा | कुल्लू जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६,७३० फूट (२,०५० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ८,०९६ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका, गुंफलेल्या आढळतात. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात.
मनालीपासून 3 कि.मी. वर वसिष्ठ कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. वसिष्ठ ऋषींनी तेथेच तप केल्याचे सांगितले जाते. हिमालयातील एक पुण्यक्षेत्र म्हणूनही ते विख्यात आहे. जगातील एक उंच रस्ता मनाली येथून निघून लडाखमधील लेह येथे जातो.
बाह्य दुवे
संपादन- विकिव्हॉयेज वरील मनाली पर्यटन गाईड (इंग्रजी)