पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो.

चर्चगेट हे पश्चिम मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल (लोकल)
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
मध्य मार्गाकडे
माहिम
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विले पार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
हार्बर मार्ग बोरीवलीपर्यंत नियोजित
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगांव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगांव
डहाणू रोड
मुंबई-अहमदाबाद मुख्य मार्ग

पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने जाताना सर्व स्थानकावर थांबतात.

चर्चगेट ते वांद्रे, चर्चगेट ते अंधेरी, चर्चगेट ते बोरिवली, चर्चगेट ते भाईंदर, चर्चगेट ते वसई रोड, चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते डहाणू रोड या स्थानकांदरम्यान जलद व धीम्या लोकल धावतात. दादर रेल्वे स्थानक पश्चिम व मध्य ह्या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव ह्यादरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

स्थानकेसंपादन करा

पश्चिम मार्ग
# स्थानक नाव स्थानक कोड उपनगर गती जोडमार्ग
1 चर्चगेट CCG चर्चगेट जलद, धिमी नाही
2 मरीन लाईन्स MEL मरीन लाईन्स धिमी नाही
3 चर्नी रोड CYR चर्नी रोड धिमी नाही
4 ग्रॅंट रोड GTR ग्रॅंट रोड. धिमी नाही
5 मुंबई सेंट्रल BCL मुंबई सेंट्रल जलद, धिमी नाही
6 महालक्ष्मी MX महालक्ष्मी धिमी नाही
7 लोअर परळ PL लोअर परळ धिमी नाही
8 प्रभादेवी EPR प्रभादेवी धिमी मध्य मार्ग
9 दादर DDR दादर जलद, धिमी मध्य मार्ग
10 माटुंगा रोड MRU माटुंगा धिमी नाही
11 माहिम MM माहिम धिमी हार्बर मार्ग
12 वांद्रे BA वांद्रे जलद, धिमी हार्बर मार्ग
13 खार रोड KHAR खार रोड धिमी हार्बर मार्ग
14 सांताक्रूझ STC सांताक्रूझ धिमी हार्बर मार्ग
15 विलेपार्ले VLP विलेपार्ले धिमी हार्बर मार्ग
16 अंधेरी ADH अंधेरी जलद, धिमी हार्बर मार्ग
17 जोगेश्वरी JOS जोगेश्वरी धिमी हार्बर मार्ग
18 राम मंदिर RMAR ओशिवरा धिमी हार्बर मार्ग
19 गोरेगाव GMN गोरेगाव धिमी हार्बर मार्ग
20 मालाड MDD मालाड धिमी नाही
21 कांदिवली KILE कांदिवली धिमी नाही
22 बोरीवली BVI बोरीवली जलद, धिमी नाही
23 दहिसर DIC दहिसर धिमी नाही
24 मीरा रोड MIRA मीरा रोड धिमी नाही
25 भाईंदर BYR भाईंदर जलद, धिमी नाही
26 नायगांव NIG नायगांव धिमी नाही
27 वसई रोड BSR वसई जलद, धिमी मध्य मार्ग
28 नालासोपारा NSP नालासोपारा धिमी नाही
29 विरार VR विरार जलद, धिमी नाही
30 वैतरणा VTN वैतरणा धिमी नाही
31 सफाळे SAH सफाळे धिमी नाही
32 केळवे रोड KLV केळवे धिमी नाही
33 पालघर PLG पालघर धिमी नाही
34 उमरोळी UOI उमरोळी धिमी नाही
35 बोईसर BOR बोईसर धिमी नाही
36 वाणगांव VGN वाणगांव धिमी नाही
37 डहाणू रोड DRD डहाणू धिमी नाही
38 घोलवढ GVD घोलवढ धिमी नाही
39 बोर्डी रोड BDR बोर्डी धिमी नाही

हेही पहासंपादन करा