बोरीवली (Borivali) हे मुंबईचे उपनगर आहे. हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटरवर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१० च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे. [ संदर्भ हवा ] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.

बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
बोरीवली
बोरीवली लोहमार्ग स्थानक

पुढील स्थानक : कांदिवली
मागील स्थानक : दहिसर

इतिहास

संपादन

पूर्वीच्या एक्सर, कांदिवली, शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून सध्याचे बोरीवली उपनगर तयार झाले आहे. "बोरीवली" हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाले असा समज आहे. कान्हेरी आणि मंडपेश्वर गुंफांमुळे बोरीवलीचा इतिहास खूप प्राचीन असावा असा मानायला हरकत नाही. ब्रिटीश याचा उच्चार बेरेवली (Berewlee) असा करत असतं.

महत्त्वाची ठिकाणे

संपादन

बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल, वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास जंगलातले उपनगर असे म्हणले जाते. शहराच्या वेढ्यात वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे. या जंगलात ४ थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते. पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.

बोरिवलीत अनेक उद्यानांपैकी एक म्हणजे वीर सावरकर उद्यानात सर्व वयोगटाच्या लोकांसाठी करमणुकीची साधने आहेत. बोटिंगसाठी तलाव , जॉगिंग पाथ इ .सोयी आहेत. अनेक जाती-धर्माचे लोक बोरिवलीत राहतात. गणेशोत्सव, नवरात्री, नाताळ, रमजान इ. सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरा केंद्र येथील दांडिया-रास प्रसिद्ध आहे.

वाहतूक व दळणवळण

संपादन

पश्चिम रेल्वेवरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात. बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे. मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये जाण्यासाठी बोरीवली पुर्वेला असणाऱ्या ओमकारेश्वर मंदिराच्या बस स्थानकावरून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या व्यक्ती

संपादन

जयवंत दळवी - मराठी लेखक
धोंडूताई कुलकर्णी - शास्त्रीय गायिका
रत्नाकर पै - शास्त्रीय गायक
रोहित शर्मा - फलंदाज, भारतीय क्रिकेट संघ
दृष्टी धामी - अभिनेत्री
अवधूत गुप्ते - मराठी गायक

करमणुकीची साधने

संपादन

१) उद्याने -

   १. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - (कान्हेरी गुंफा, लायन -टायगर सफारी , बोटिंग लेक,नेचर ट्रेल्स, तुळशी तलाव, वनराणी -रेल्वे )
   २. वीर सावरकर उद्यान - (जॉगिंग पाथ ,बोटिंग लेक)

२) नाट्यगृहे -

   १. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह

३) सिनेमा -

   १. डायमंड सिनेमा 
२. सोना गोल्ड
३. मॅक्सस मॉल (गोराई)

४) मॉल्स -

   १. ग़ोयल 
२. इंद्रप्रस्थ
३. मोक्ष

५) थीम पार्क्स -

   १. वॉटर किंग्डम 
२. एस्सेल वर्ल्ड

६) समुद्र किनारा -

   १. गोराई

७) ग्लोबल विपस्सना पॅगोडा