डहाणू रोड रेल्वे स्थानक
डहाणू रोड हे पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. डहाणू रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील शेवटचे स्थानक असून उपनगरी सेवा येथे संपते. डहाणू येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात.
डहाणू रोड मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
डहाणू रोड रेल्वे स्थानक यार्ड (पूर्व) | |
स्थानक तपशील | |
पत्ता | डहाणू, पालघर जिल्हा |
गुणक | 19°59′29.5″N 72°44′36.8″E / 19.991528°N 72.743556°E |
मार्ग | पश्चिम |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गाची उपनगरी सेवा विरारपर्यंत अनेक वर्षांपासून चालू होती. ही सेवा डहाणूपर्यंत वाढवण्याची प्रवाशांची व स्थानिक नेत्यांची मागणी सातत्याने चालू होती. पालघर, सफाळे, बोईसर, केळवे इत्यादी गावांमध्ये राहणाऱ्या व मुंबईमध्ये व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या रहिवाशांना लोकल सेवेसाठी विरारपर्यंत यावे लागत असे. अखेर अनेक दशकांच्या वाटाघाटींनंतर १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू ते चर्चगेट ही उपनगरी सेवा सुरू झाली. परंतु पुरेशा गाड्या डहाणूपर्यंत धावत नसल्याने डहाणू लोकल सेवा अपुरी असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. अपुऱ्या लोकल सेवेमुळे डहाणू, पालघरचे प्रवासी हैराण आहेत.
डहाणू रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: वाणगाव |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: घोलवड | |
स्थानक क्रमांक: ३७ | चर्चगेटपासूनचे अंतर: १२४ कि.मी. |