पालघर जिल्हा

महाराष्ट्रातील ३६वा जिल्हा

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.

पालघर जिल्हा
पालघर
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१९° ४२′ ००″ N, ७२° ४६′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय पालघर
तालुके वसईवाडाजव्हारमोखाडापालघरडहाणूतलासरीविक्रमगड
क्षेत्रफळ ५,३४४ चौरस किमी (२,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या २९,९०,११६ (२०११)
लोकसंख्या घनता ५६० प्रति चौरस किमी (१,५०० /चौ. मैल)
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
लोकसभा मतदारसंघ पालघर
खासदार राजेंद्र गावित


नव्याने निर्माण झालेल्या या जिल्ह्यात खालील ८ तालुके असतील -

संदर्भसंपादन करा