तलासरी तालुका
तलासरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.
?तलासरी तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
सभापती | नंदू हाडळ |
उपसभापती | राजेश खरपडे |
तहसील | तलासरी तालुका |
पंचायत समिती | तलासरी तालुका |
हवामान
संपादनतालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
तालुक्यातील गावे
संपादनतलासरी तालुक्यात खालील गावे येतात.
- आच्छाड,
- आमगाव (तलासरी),
- आंबेशेतगाव,
- अणवीर,
- आवरपाडा,
- बराडी,
- बोरीगाव,
- बोरमाळ (तलासरी),
- ब्राह्मणपाडा,
- डोल्हारपाडा,
- डोंगरी (तलासरी),
- गांधीनगर (तलासरी),
- घिमणिये,
- गिरगाव (तलासरी),
- गोरखपूर (तलासरी),
- इभाडपाडा,
- काजळी (तलासरी),
- कारजगाव,
- कावडे,
- खराडपाडा,
- कोचाई,
- कोदाड,
- कुर्झे (तलासरी),
- मानपाडा,
- मसणपाडा,
- पाटीलपाडा (तलासरी),
- सागरशेत,
- संभा,
- सावणे (तलासरी),
- सावरोळी (तलासरी),
- सुतारपाडा (तलासरी),
- सुत्राकार,
- तलासरी,
- ठाकरपाडा,
- उधवा,
- उपलाट,
- वाडवळी,
- वरवडे,
- वासा,
- वेवजी,
- विलाटगाव,
- झाई,
- झारी,
वनसंपदा
संपादनआदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[२]
नागरी जीवन
संपादनतलासरी तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १५७९ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[३]
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पालघर जिल्ह्यातील तालुके |
---|
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका |