मोखाडा तालुका
मोखाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
?मोखाडा तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
भाषा | मराठी |
आमदार | सुनील भुसारा |
तहसील | मोखाडा तालुका |
पंचायत समिती | मोखाडा तालुका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 401604 • +०२५२९ • MH 04 |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वैशिष्ट्य
संपादन१.येथे 'सूर्यमाळ' हे थंड हवेचे ठिकाण आहे. २.मध्य वैतरणा धरन. ३.खोडाळा नजीक ३ कि.मी.अंतरावर असलेले निसर्ग रम्य सिद्धीविनायक मंदिर.
४.मोखाडा तालुक्यात सह्याद्रिच्या पुर्व उताय्रावर तांबडी गाळाची माती आढळते. तसेच मोखाडा तालुक्यातील जमिन ही डोंगराळउतारावर आढळणारी वरकस जमिन म्हणून ओळखली जाते.
हवामान
संपादनतालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
वनसंपदा
संपादनआदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[२]
लोकजीवन
संपादनयेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुका भात, नागली, आणि वरई उत्पादनात अग्रेसर आहे. भात, नागली आणि वरईची शेती करण्यासाठी प्रथम शेतातील एका खाचरात राब पेटवून तेथील जमीन भाजून भुसभुशीत केली जाते. जमीन भाजल्यामुळे तेथे उपद्रवी गवत वगैरे जळून जाते आणि अनावश्यक तण वगैरे उगवत नाहीत. राब भाजण्याची एक विशिष्ट पद्धत अनुसरली जाते.शेतीच्या आजुबाजूला असलेल्या झाडांचा पालापाचोळा, गोवऱ्या, झाडांच्या तुटलेल्या फांद्या,भाताचा तूस वगैरे व्यवस्थित एका खाचरात पसरवला जातो आणि मग वाऱ्याच्या दिशेने आग लावली जाते. ही जमीन भाजल्यावर दोन तीन दिवसांनी किंवा पाऊस पडल्यावर भाताचे चांगले बियाणे पेरले जाते आणि साधारणपणे २०-२५ दिवसानंतर त्याची संपूर्ण शेतात आवणी अथवा रोपणी केली जाते.[३] मोखाडा तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ५३५ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[४]
बोहाडा उत्सव
संपादनआदिवासी संस्कृती जोपासणारा बोहाडा उत्सव होळी पौर्णिमा संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी ह्या उत्सवाची सुरुवात होते. फाल्गुन वद्य प्रतिपदा ते अष्टमी पर्यंत हा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवशी गणरायाची मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या दिवशी मत्स्यावतार, तिसऱ्या दिवशी कुर्मावतार, चौथ्या दिवशी वराहावतार, पाचव्या दिवशी भीम-हिडींबा विवाह व बकासूर युद्ध दाखवले जाते. सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठीला लहान बोहाडा आणि सप्तमीला रात्री आठ ते अष्टमीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत रात्रभर मुख्य बोहाडा उत्सव साजरा करतात. अष्टमीला सकाळी जगदंबा देवीची महापूजा केली जाते आणि देवी × महिषासुर,शुंभ-निशुंभ ह्यांच्या युद्धाचा प्रसंग दाखवतात.[५]
तालुक्यातील गावे
संपादन- आडोशी,
- आमाळे,
- आसे,
- बेरीस्ते,
- बोटोशी,
- ब्रह्मगाव,
- चरणगाव,
- चास (मोखाडा),
- दांडवळ,
- धामणी (मोखाडा),
- धामणशेत,
- धोंडमारायचीमेट,
- धुडगाव,
- डोल्हारे,
- घाणवळ,
- घोसाळी (मोखाडा),
- गोमघर,
- गोंडे बुद्रुक,
- गोंडे खुर्द,
- हिरवे,
- जोगळवाडी,
- कडूचीवाडी,
- कलमगाव,
- कारेगाव,
- कारोळ,
- काष्टी,
- केवनाळे,
- खोच,
- खोडाळा,
- किणीस्ते,
- कोचळे,
- कोशिमशेत,
- कुरलोड,
- लक्ष्मीनगर,
- मोखाडा,
- मोरहांडे,
- नाशेरा,
- निळमाती,
- ओसरवीरा,
- पाचघर (मोखाडा),
- पळसुंदे,
- पाथर्डी (मोखाडा),
- पिंपळगाव (मोखाडा),
- पोशेरा,
- पळसपाडा,
- ठाकूरवाडी,
- राजीवनगर,
- साखरी,
- सातुर्ली,
- सावर्डे,
- सायडे,
- शास्रीनगर,
- शिरसगाव (मोखाडा),
- शिरसोण,
- शिवाळी,
- सुर्यमाळ,
- स्वामीनगर,
- उधाळे,
- वाशिंद (मोखाडा),
- वाकडपाडा,
- वाशाळा
संदर्भ
संपादनस्थानिक
जि.प.पालघर आपत्ती व्यवस्थापन आराखडा
बाह्यदुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पालघर जिल्ह्यातील तालुके |
---|
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका |
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक २२ मे २०२३
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार, दिनांक २४ जुलै २०२४
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३
- ^ #https://villageinfo.in/maharashtra/thane/mokhada.html