मोखाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?मोखाडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.४४१४५ चौ. किमी
जवळचे शहर मोखाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
८,२२४ (२०११)
• ५,७०५/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

मोखाडा गावाची लोकसंख्या २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८५४ कुटुंबे राहतात. एकूण ८२२४ लोकसंख्येपैकी ४०३७ पुरुष तर ४१८७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथील आदिवासी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून हा समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

हिरवे, बेरीस्ते,चास,घोसाळी,मोरहांडे,राजीवनगर,गोंडे खुर्द, पोशेरा, लक्ष्मीनगर,गोंडे बुद्रुक, चरणगाव ही जवळपासची गावे आहेत.मोखाडा ग्रामपंचायतीमध्ये घोसाळी,मोखाडा, आणि राजीवनगर ही गावे येतात.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/