धामणशेत
धामणशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.
?धामणशेत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.१०९ चौ. किमी |
जवळचे शहर | मोखाडा |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
१,५३६ (२०११) • १,३८५/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/४८ /०४ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९८ कुटुंबे राहतात. एकूण १५३६ लोकसंख्येपैकी ७८९ पुरुष तर ७४७ महिला आहेत.गावाची साक्षरता ५८.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.४० आहे तर स्त्री साक्षरता ४८.४३ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या २९३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १९.०८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनसातुर्ली,वाशाळा, पिंपळगाव,शिवाळी, कोशिमशेत, डोल्हारे, नाशेरा, शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, बोटोशी ही जवळपासची गावे आहेत.धामणशेत ग्रामपंचायतीमध्ये धामणशेत,आणि कोशिमशेत ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036