जव्हार तालुका
जव्हार तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?जव्हार तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
आमदार | सुनील भुसारा |
तहसील | जव्हार तालुका |
पंचायत समिती | जव्हार तालुका |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच ४८,०४ |
जव्हार तालुक्यातील गावेसंपादन करा
- अडखडक,
- ऐने,
- आकरे,
- आखर,
- आल्याचीमेट,
- अनंतनगर,
- आपटाळे,
- आयरे,
- बारावडपाडा,
- बेहडगाव,
- भागाडा,
- भारसातमेट,
- भुरीटेक,
- बोपदारी,
- बोराळे,
- चांभारशेत,
- चांदगाव,
- चंद्रनगर,
- चंद्रपूर (जव्हार),
- चौक,
- दाभेरी,
- दाभलोण,
- दाभोसे,
- दादर कोपरापाडा,
- दाधरी,
- दाहुळ,
- दासकोड,
- देहरे,
- देंगाचीमेट,
- देवगाव,
- धानोशी,
- धरमपूर,
- डोंगरवाडी,
- गणेशनगर,
- गंगापूर (जव्हार),
- गराडवाडी,
- घिवंदे,
- गोरठण,
- हडे,
- हातेरी,
- हिरडपाडा,
- जांभुळमाया,
- जामसर,
- ग्रामीण जव्हार,
- जयेश्वर,
- जुनी जव्हार,
- कडाचीमेट,
- कलमविहिरा,
- करधण,
- कासटवाडी,
- काशिवळी तर्फे देंगाचीमेट,
- कौलाळे,
- कायरी,
- केळघर,
- खडखड,
- खंबाळे (जव्हार),
- खारोंदा,
- खिडसे,
- किरमिरे,
- कोगदे,
- कोरताड,
- कुतुरविहीर,
- माळघर,
- मानमोहाडी,
- मेढा (जव्हार),
- मेढे,
- मोर्चाचापाडा,
- नांदगाव (जव्हार),
- नंदनमाळ,
- न्याहाळे बुद्रुक,
- न्याहाळे खुर्द,
- ओझर (जव्हार),
- पळशीण,
- पाथर्डी (जव्हार),
- पिंपळगाव (जव्हार),
- पिंपळशेत,
- पिंपरुण,
- पोयशेत,
- राधानगरी (जव्हार),
- रायतळे,
- राजेवाडी (जव्हार),
- रामनगर,
- रामपूर (जव्हार),
- रुईघर,
- साखरशेत,
- साकुर (जव्हार),
- सारसूण,
- सावरपाडा,
- शिरसगाव,
- शिरोशी,
- शिवाजी नगर,
- श्रीरामपूर (जव्हार),
- सूर्यनगर,
- तळासरी,
- तिलोंदे,
- तुळजपूर,
- उंबरखेड,
- वांगणी (जव्हार),
- वावर,
- विजयनगर (जव्हार),
- वाडोळी,
- वाळवंडे,
- विणवळ,
- झाप
नद्यासंपादन करा
जव्हार तालुक्यातून कोंटबी, दाभोसा, देहरजा (तांबाडी), पंचधारा, पिंजाळ, वाघ,आणि सूर्या या सात प्रमुख नद्या उगम पावतात.लेंडी ही वाघ नदीची उपनदी असून तिचा उगम उंबरखेडा या गावाजवळ कोंब या डोहातून होतो.
वनसंपदासंपादन करा
आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[२]
लोकजीवनसंपादन करा
जव्हार तालुका हा आदिवासीबहुल आहे आणि येथे पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते.येथील काही शेतकऱ्यांनी सुधारित बी बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून गावंधपाडा येथे स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. जव्हार तालुक्याप्रमाणेच मोखाडा व विक्रमगड तालुक्यातसुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे.प्रत्येक शेतकऱ्याने दोन ते तीन गुंठ्यांत स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे.त्यामधून दिवसाआड एक ते दोन किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते.[३]
पर्यटनसंपादन करा
जव्हार हे एक निसर्गरम्य थंड ठिकाण आहे.हे समुद्रसपाटीपासून १७०० फूट उंचीवर आहे. येथील हनुमान व सनसेट हे पॉइंट्स तसेच भूपतगड आवर्जून पाहाण्याजोगा आहे. काही पर्यटन स्थळे *शिरपामाळ *काळमांडवी धबधबा *दाभोसा धबधबा *जय विलास पॅलेस नारळीदरा बिबवीदरा केळझिरा गायमुख जयसागर धरण जिजामाता उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जुना राजवाडा धाकटी जेजुरी खंडेरायाचे मंदिर खडखड धरण महादेव मंदिर बाळकापरा काळमांडवी धबधबा दादर कोपरा[४]
संदर्भसंपादन करा
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
साचा:दाभोसा धबधबा व काळमांडवी धबधबा
पालघर जिल्ह्यातील तालुके |
---|
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका |
- ^ #https://villageinfo.in/maharashtra/thane/jawhar.html
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३
- ^ #महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी,मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३
- ^ महाराष्ट्र टाईम्स मुंबई टाईम्स गुरुवार २० मे २०२१.