दाभेरी
दाभेरी हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक गांव आहे. हे जव्हार तालुक्यात असून तालुक्याच्या गांवापासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे. हे गांव गुजरात व दादरा नगर हवेलीच्या सीमेवरचे महाराष्ट्रातील शेवटचे गांव आहे. गावचा परिसर निसर्गसुंदर असून सदर गावात महाराष्ट्र शासनाची एक आश्रमशाळा आहे. गावाच्या पूर्वेस सुमारे १ कि.मी. अंतरावर एक धबधबा आहे.