कोशिमशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कोशिमशेत

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.७२८ चौ. किमी
जवळचे शहर मोखाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,२०७ (२०११)
• ३,०३२/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४२९ कुटुंबे राहतात. एकूण २२०७ लोकसंख्येपैकी १११५ पुरुष तर १०९२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

वनसंपदा

संपादन

आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[]

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

सातुर्ली,वाशाळा, पिंपळगाव,शिवाळी, धामणशेत, डोल्हारे, नाशेरा, शिरसगाव, आडोशी, पाथर्डी,पळसुंदे ही जवळपासची गावे आहेत.धामणशेत ग्रामपंचायतीमध्ये धामणशेत,आणि कोशिमशेत ही गावे येतात.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३