मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले.
मुंबई मेट्रो | |||
---|---|---|---|
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
वाहतूक प्रकार | जलद परिवहन | ||
मार्ग |
१ चालू ३ निर्धारित | ||
मार्ग लांबी |
११.४ किमी (७.१ मैल) कार्यरत १६०.९ किमी (१०० मैल) निर्धारित कि.मी. | ||
एकुण स्थानके |
१२ चालू ९३ निर्धारित | ||
दैनंदिन प्रवासी संख्या | ५,१३,३३८ | ||
सेवेस आरंभ | ८ जून २०१४ | ||
संकेतस्थळ | अधिकृत व्हेबसाईट | ||
|
इतिहास
संपादनमुंबई भारतची वित्तीय राजधानी असून हे भारताच्या आर्थिक व व्यापारिक केंद्रस्थान समजले जाते. मुंबईतील अंदाजे ८८% व्यक्ती सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करतात. सध्या अस्तित्वात असणारी उपनगरीय रेल व्यवस्था मुंबईकरांच्या दळणवळणासाठी खूप महत्त्वाची आहे. दररोज ६० लाखांहूनही जास्त व्यक्ती या सेवेचा उपयोग करतात. यात बेस्ट बस सेवा, मुंबई उपनगरी रेल्वे समाविष्ट आहेत. आत्तापर्यंत मुंबईतील भौगोलिक आणि आर्थिक बाधांमुळे या सुविधा मागणीनुसार वाढू शकलेल्या नाहीत.
मुंबई उपनगरी रेल्वे एकोणिसाव्या शतकातच सुरू झालेली आहे पण ती जलद परिवहनासाठी बांधली गेलेली नही. मे २००३मध्ये मुंबई जलद परिवहन योजनेत मूलभूत बदल केले गेले व त्यात अंधेरी ते घाटकोपर यांमध्ये १० कि.मी. हलक्या रेल्वेमार्गाचा समावेश केला गेला. जानेवारी २००४ मध्ये एम.एम.आर.डी.ए. या संस्थेने आपली विकासयोजना जाहीर केली, ज्यात १४६ कि.मी.चा भुयारी रेल्वेमार्ग शामील होता. या १४६ कि.मी. मधील ३२ कि.मी. भाग भूमिगत असणार होता. जून २००४ मध्ये १३ स्थानके असलेला एक मेट्रो रेल मार्ग बांधण्यास सरकाराने अनुमती दिली. मुंबई मेट्रोचा भूमिपूजन सोहळा जून २१, इ.स. २००६ रोजी झाला. वेसावे-अंधेरी-घाटकोपर या ११ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम जवळजवळ दीड वर्षानंतर, फेब्रुवारी ८ इ.स. २००८ रोजी सुरू झाले.
योजना
संपादनमुंबई मुख्य उद्देश म्हणजे मुंबईत साधारण १-२ कि.मी. अंतरावर स्थानक असलेला रेल्वेमार्ग आधारित सार्वजनिक जलद परिवहन उपलब्ध करून देणे व ज्या क्षेत्रांत उपनगरीय रेल्वे नाही, तेथे ही सेवा उपलब्ध करणे व तसेच, त्या क्षेत्रांना एकत्र जोडणे. या योजनेत ३ टप्पे आहेत:
मार्ग | टर्मिनल | सुरुवात | लांबी | स्थानके | |||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
भुयारी | उन्नत | जमिनीवर | भुयारी | उन्नत | जमिनीवर | ||||
मार्ग १ | वर्सोवा | घाटकोपर | 8 जून 2014 | 0 km | 11.4 km | 0 km | 0 | 12 | 0 |
मार्ग २ | दहिसर | मानखुर्द | कंत्राट | 40.2 km | 0 km | 0 km | 36[१] | 0 | 0 |
मार्ग ३ | कुलाबा | सीप्झ | कंत्राट | 33 km | 0 km | 0 km | 26 | 0 | 1 |
तंत्रज्ञान
संपादनगाड्या
संपादनया प्रकल्पासाठी गाड्या पुरवण्यासाठी कावासाकी, सीमेन्स, ॲल्स्टॉम, बोम्बार्डिये व सी.एस.आर. नांजिंग या कंपन्यांनी तयारी दाखवली होती. पैकी सी.एस.आर. नांजिंगची निवड करण्यात आली.[२] सुरुवातीला सी.एस.आर. नांजिंगला ४ डब्यांच्या १६ गाड्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. यांची किंमत अंदाजे ६ अब्ज रुपये असेल. मेट्रोमार्गावर धावणाऱ्या या गाड्या वातानुकूलित असतील व त्यांमध्ये ब्लॅक-बॉक्स, सी.सी.टी.व्ही., यात्री-चालक संपर्क प्रणाली, दृक-श्राव्य माहिती प्रणाली, मार्गाचा इलेक्ट्रॉनिक नकाशा, अपंगांसाठीच्या सुविधा, इ. आधुनिक सुविधा असतील. साधारणतः चार डब्यांची असलेली प्रत्येक गाडी १५०० माणसं नेऊ शकेल. या गाड्या तयार करताना दिल्ली व हाँग काँग शहरांतील भुयारी रेल्वे कंपन्यांकडून सल्ला घेण्यात आला आहे.
क्षमता
संपादनचालक डबा | साधारण डबा | ४ डब्यांची गाडी | ६ डब्यांची गाडी | ८ डब्यांची गाडी | |||
साधारण अवस्था | गर्दीत | साधारण अवस्था | गर्दीत | गर्दीत | गर्दीत | गर्दीत | |
बसलेले | ४३ | ४३ | ५० | ५० | १८६ | २८६ | ३८६ |
उभे | १२० | २३९ | १२९ | २५७ | ९९२ | १५०६ | २०२० |
एकूण | १६३ | २८२ | १७९ | ३०७ | ११७८ | १७९२ | २४०६ |
२०११ | २०२१ | २०३१ | |
एका गाडीत असलेले डबे | ४ | ४ | ४ |
पुढच्या गाडीसाठी लागणारा वेळ (मिनिटांत) | ५ | ४ | ३ |
PHPDT क्षमता मागणूक | १५५६३ | २३५९० | ३०५४७ |
PHPDT उपलब्ध क्षमता | १४१३६ | १७६७० | २३५६० |
२०११ | २०२१ | २०३१ | |
एका गाडीत असलेले डबे | ४ | ६ | ६ |
पुढच्या गाडीसाठी लागणारा वेळ (मिनिटांत) | ३.५ | ३.५ | ३ |
PHPDT क्षमता मागणूक | २६४३२ | ३६२०८ | ४२४०९ |
PHPDT उपलब्ध क्षमता | २००२६ | ३०४६४ | ३५८४० |
वीज पुरवठा
संपादनमेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी 'ए.बी.बी. ग्रुप' या संघटनेला देण्यात आली आहे. वीज पुरवठा, वीज वितरण, कर्षण विद्युतीकरण व एस्.सी.ए.डी.ए., या सर्व प्रणाल्यांचे आपूर्ती, निर्माण, परीक्षण व कमिशनिंगचे काम हे संघटन करणार आहे.
संकेतन व संचार
संपादनसिग्नाल्लिंग प्रणाली सेमैंसने पुरवली असून, संचार प्रणाली थेलसने पुरवली आहये.
बाह्य दुवे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ http://www.thehindubusinessline.com/news/states/maharashtra-govt-clears-metro-projects/article6618208.ece?ref=relatedNews
- ^ "Mumbai Metro One Project updates". Mumbaimetro1.com. 2010-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-25 रोजी पाहिले.