कुलाबा

मुंबईमधील एक परिसर

कुलाबा दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीज या भागास कांदिल म्हणत, तर १७व्या शतकात ब्रिटिशांनी याला कोलियो असे नाव दिले.

कुलाबा
एकत्र होण्यापूर्वी मुंबईची सात द्वीपे

कुलाबा हा शब्द कोळीभाषेतील कोळभात ह्यावरून आलेला आहे. हे कोळी पोर्तुगीज येण्याआधीपासूनच येथे राहत असलेले मूळ रहिवासी आहेत. आता असलेले कुलाबा पूर्वी दोन विभागांत विभागलेले होते. ते म्हणजे कुलाबा आणि धाकटा कुलाबा. कुलाबा हे मुंबईच्या सात बेटांपैकी एक बेत असून ज्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलेले आहे.

संपूर्ण मुंबई हा प्रांत पोर्तुगीजांनी कथरीन ब्रेगांझा हिच्या लग्नात इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला आंदण म्हणून दिली. नंतर ह्या दुसऱ्या चार्ल्सने मुंबईला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला काही नाममात्र वार्षिक भाडे करारानुसार दिली. गेराल्ड ओंगियर ह्या मुंबईच्या दुसऱ्या राज्यपालाने (१६७२) आणि सुरतमधून ब्रिटिशांचा राज्यकारभार पाहणाऱ्या अध्यक्षाने कुलाबा आणि ओल्ड वूमन्स आईसलंड ब्रिटिशांच्या वतीने काबीज केले (१६७२).

पोर्तुगीजांनी धाकट्या कुलाब्यावर ते १६७२ मध्ये त्याच्या हवाली करण्यापूर्वीपासून कित्येक शतके त्याच्यावर अंमल कायम ठेवून होते. गोव्यातील पोर्तुगीज सरकारने येथील सर्व घरे मुंबईतील पाद्रोआडो पार्टीचे प्रमुख बिशप ऑफ दमाओ ह्यांना भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिली. १७४३ मध्ये, ब्रिटिश कुलाबा रिचर्ड ब्रीटन यांच्याकडे वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर भाडेपट्टीवर देण्यात आले तसेच भाडेपट्टी १७६४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.

१७९६ पर्यंत कुलाबा एक लष्करी छावणी बनले होते. कुलाबा माशांच्या विविधतेसाठी जसे बोंबील (बॉम्बे डक), रावस, हलवा, कासव, खेकडे, कोळंबी व शेवंड (लाॅलॅबस्टर) प्रसिद्ध होते.

कुलाबा वेधशाळा, एक हवामानशाळा वेधशाळा १८२६ मध्ये ज्या भागात स्थापन झाली त्याला अप्पर कुलाबा असे संबोधले जात होते. कुलाबा कॉजवे १८३८ मध्ये पूर्ण झाले, आणि अशा प्रकारे उर्वरित दोन बेटे इतरांना जोडण्यात आली. १८४४ मध्ये कॉटन ग्रीन येथे कापूस एक्सचेंज उघडल्यानंतर, हळूहळू कुलाबा हे व्यावसायिक केंद्र बनले. सदर परिसरातील जागांच्या किंमती वाढू लागल्या. पुढे कुलाबा कॉजवे १८६१ आणि १८६३ मध्ये विस्तृत झाले.

कुलाबा १८७२ मध्ये एक स्वतंत्र नगरपालिका विभाग बनला. १९ व्या शतकात सिक बंगला (आता आयएनएसएस अश्विनी म्हणून ओळखले जाणारे) बांधण्यात आले. अँग्लिकन चर्चचे बांधकाम इ.स. १८३८ मधील पहिल्या अफगाण युद्धानंतर (अफगाण चर्च म्हणून ओळखले जाणारे) सेंट जॉन द इव्हॅजिएललिस्टचे बांधकाम १८४७ पासून सुरू झाले. १८५८ मध्ये चर्च अधिकृतरीत्या पवित्र करून धार्मिक विधींसाठी खुले करण्यात आले.

१८७३ मध्ये अश्वचलित ट्राम-कार्स ह्यांची ओळख स्टर्न्स आणि कीटरेड्ज ह्यांनी करून दिली, त्यांचे कार्यालयही कॉजवेच्या पश्चिम बाजूला होते. तेथे आता इलेक्ट्रक हाऊस आहे.

प्रोंग हे दीपगृह १८७५ मध्ये ह्या बेटाच्या अगदी दक्षिण टोकाकडे बांधण्यात आले. अगदी असंच डेव्हिड ससून ह्यांनी ससून डॉक ह्याच वर्षी बांधले. बी बी आणि सीआय रेल्वेने कुलाबा रेल्वे स्थानक किंवा टर्मिनसची स्थापना केली. त्या जागी आता बधवार पार्क आहे. कुलाबाच्या विकासामुळे स्थानिक कोळी अगदी बेटाच्या किनाऱ्यावर फेकले गेले.

कुलाबाच्या पश्चिम किनारपट्टीवर ९०,००० चौरस फूट बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने पुन्हा मिळवले. जमीन सुधारणेमुळे जमीनच्या किंमतीवर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीमुळे मुंबईतील तत्कालीन प्रख्यात नागरिकांनी जसे की फिरोजशहा मेहता यांनी या कार्याचा विरोध केला. तरीही पुनःप्राप्तीचे काम चालू राहिले व १९०५ मध्ये पूर्ण करण्यात आले. जमीन किमतींमध्ये घसरण नव्हती. १९०६ मध्ये आताचे कफ परेड तयार झाले.

द गेटवे ऑफ इंडिया, आर्ट डेको स्टाईल रिगल थिएटर, कॅफे (कॅफे मोंन्गर, रॉयल आणि लिओपोल्ड कॅफे) आणि ताज महल पॅलेस अँड टॉवर हॉटेल, बॅडेमी रेस्टॉरन्ट आणि बगदादी रेस्टॉरंट, तसेच अनेक आधुनिक पब, रेस्टॉरंट्स आणि क्लब हे सर्व आज कुलाब्याच्या वातावारणाचा भाग आहे.